Diwali 2025: दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह घराघरात फराळ, लाडू, बर्फी, शंकरपाळे आणि विविध गोडधोड पदार्थांची रेलचेल असते. पण याच गोडधोडाच्या ओढीत साखरेचे प्रमाण . अधिक गोड सेवन केल्याने वजन वाढणे, मधुमेहाचा धोका, हृदयविकार आणि इतर अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. तज्ज्ञांच्या मते, थोडी काळजी घेतली आणि योग्य नियोजन केले, तर दिवाळीचा आनंदही घेता येतो आणि साखरेच्या प्रमाणवरही नियंत्रणा राहते. याशिवाय मर्यादित प्रमाणात गोड खाणे, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम यामुळे तुम्ही सणाचा आनंद घेत असताना आरोग्याची काळजीही घेऊ शकता. सण म्हणजे फक्त तोंड गोड करणे नव्हे, तर निरोगी राहून आनंद साजरा करणे — हेच खरे सुख! अशातच सणांवेळी वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी खालील टिप्स नक्कीच कामी येतील.
१. प्रमाण मर्यादित ठेवा
दिवाळीच्या काळात गोड खाण्यापासून पूर्णपणे दूर राहणे जवळपास अशक्य असते, पण त्याचे प्रमाण मर्यादित ठेवणे हेच आरोग्यदायी पाऊल ठरते. प्रत्येकवेळी गोड दिसल्यावर हात पुढे न करता फक्त एक-दोन तुकडे चाखण्याचा नियम स्वतःसाठी ठरवा. तज्ज्ञ सांगतात की, आपल्या प्लेटमध्ये लहान प्रमाणात गोड ठेवले तर जास्त खाण्याची शक्यता कमी होते. तसेच, गोड खाताना सावकाश चावून आणि आस्वाद घेत खाल्ल्यास लवकर पोट भरल्याची जाणीव होते आणि जास्त खाण्याची गरज वाटत नाही.
२. घरगुती आणि आरोग्यदायी पर्याय वापरा
बाजारातील गोड पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते आणि त्यात प्रिझर्व्हेटिव्ह्स किंवा कृत्रिम रंगही असू शकतात. म्हणूनच घरगुती पदार्थ बनवणे आणि त्यात नैसर्गिक गोडवा आणणारे घटक वापरणे चांगले ठरते. उदाहरणार्थ, साखरेऐवजी खजूर, मध, गूळ किंवा स्टीव्हिया यांचा वापर करा. हे नैसर्गिक गोड पदार्थ शरीराला ऊर्जा देतात आणि रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढवत नाहीत. तसेच बेसन, सुकेमेवे, रवा, नारळ यांसारख्या पौष्टिक घटकांनी बनवलेले लाडू आणि बर्फी हे बाजारातील मिठाईपेक्षा अधिक आरोग्यदायी ठरतात.(Diwali 2025)

३. संतुलित आहार आणि नियमित व्यायाम महत्त्वाचे
दिवाळीच्या दिवसांत गोड पदार्थ खाताना संतुलित आहाराचे महत्त्व अजून वाढते. गोड खाल्ल्यानंतर भरपूर पाणी पिणे, ताजे फळे आणि भाज्या आहारात समाविष्ट करणे आणि प्रोटीन्सने समृद्ध अन्न घेणे आवश्यक आहे. दिवसभरात किमान ३० मिनिटे चालणे, योगा करणे किंवा हलका व्यायाम करणे हे शरीरातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवण्यात मदत करते. व्यायामामुळे अतिरिक्त कॅलरीज खर्च होतात आणि रक्तातील ग्लुकोज पातळी नियंत्रित राहते.
============
हे देखील वाचा:
Walking Benefits : फिटनेससाठी रोज किती चालावे? तज्ज्ञ सांगतात योग्य अंतर
Skin Care : सणासुदीच्या दिवसात गुलाबजल वापरून सुंदर दिसण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स
Health Care : चिया, सब्जा आणि अळशी…ऋतूनुसार कोणत्या बिया कधी खाव्यात?
====================
४. वेळेचे नियोजन (Diwali 2025)
गोड पदार्थ खाण्याचा वेळ देखील महत्त्वाचा असतो. तज्ज्ञ सांगतात की, जेवणानंतर लगेच गोड खाण्यापेक्षा दुपारी किंवा सकाळी खाणे चांगले. त्या वेळी शरीरातील मेटाबॉलिझम जास्त असतो आणि साखर अधिक चांगल्या प्रकारे खर्च होते. तसेच, सर्व गोड पदार्थ चाखण्याऐवजी फक्त आवडते आणि पौष्टिक पर्याय निवडण्यावर भर द्या. उदाहरणार्थ, तळलेले शंकरपाळे टाळून भाजलेले चिवडे किंवा सुक्यामेव्याचा लाडू निवडा.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending TopicMarathi News
