दिवाळी वर्षातला मोठा आणि महत्वाचा सण असतो. या सणासाठी वर्षभर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खूपच उत्सुक असतात. पाच दिवस चालणारा दिवाळीचा सण म्हणजे सुख, समृद्धी, भरभराट. अनेकदा आपण आपल्याला पाहिजे असलेल्या लहान मोठ्या गरजेच्या महत्वाच्या गोष्टी ‘दिवाळीमध्ये घेऊ’ असे म्हणत राखून ठेवतो. कारण दिवाळीमध्ये घेतलेल्या वस्तू मग ते लहान असो किंवा मोठी त्याची भरभराट होते आणि ती वस्तू टिकते देखील जास्त दिवस. म्हणूनच दिवाळीमध्ये खरेदी करण्याची मोठी परंपरा आहे.
दिवाळीमध्ये कपड्यांपासून ते सोने, घर, गाडी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू अन्य मोठ्या लहान गोष्टी खरेदी केल्या जातात. शिवाय या दिवसांमध्ये घरात काहीतरी छोटी का असेना पण खरेदी करावी असे देखील सांगितले जाते. दिवाळीची अजून एक मोठी अनेक वर्ष जुनी परंपरा म्हणजे मुहूर्त ट्रेंडिंगची. या दिवशी दिवाळीनिमित्त भारतीय शेअर बाजारात मुहूर्तावर खरेदी करण्याची परंपरा आहे. वास्तविक, या दिवशी स्टॉक एक्सचेंजमध्ये सुट्टी असते. पण सुट्टीच्या दिवशीही ते फक्त एक तासासाठी उघडले जाते, विशेषत: संध्याकाळी, ज्याला मुहूर्त ट्रेडिंग म्हणतात.
मुहूर्त ट्रेडिंग एक पारंपारिक ट्रेडिंग असते. हा दिवस अत्यंत शुभ दिवस आहे. आणि या दिवशी गुंतवणूकदार भाग्यवान वर्षाच्या शुभेच्छा देऊन काही काळ व्यापार करतात. असे मानले जाते की मुहूर्त किंवा शुभ मुहूर्तावर ट्रेडिंग केल्याने भागधारकांना समृद्धी लाभते आणि वर्षभर त्यांना आर्थिक भरभराट होते. याकारणामुळे दिवाळीच्या दिवशी सुट्टी असूनही बाजार एक तासांसाठी उघडते.
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर संपूर्ण देश शेअर बाजारातील मुहूर्त ट्रेडिंगची वाट पाहत आहे. गुंतवणूकदारांची अशी मान्यता आहे की, ‘मुहूर्त’ किंवा शुभ मुहूर्तावर ट्रेडिंग केल्याने गुंतवणूकदारांना वर्षभर समृद्धी लाभते. “मुहूर्त” हा एक शुभ काळ आहे जेव्हा व्यापारी आणि गुंतवणूकदार आगामी वर्षासाठी संपत्ती आणि चांगले नशीब मिळविण्याच्या आशेने शेअर्सची खरेदी आणि विक्री करतात.
आज मुहूर्त व्यापार सांस्कृतिक पेक्षा एक प्रतीकात्मक हावभाव बनला आहे कारण लोकांचा असा विश्वास आहे की हा काळ शुभ आहे. बहुतेक हिंदू गुंतवणूकदार लक्ष्मी पूजन करतात आणि नंतर मजबूत कंपन्यांचे शेअर्स खरेदी करतात जे दीर्घकाळात चांगले परतावा देऊ शकतात.
यंदा शुक्रवार, १ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत स्टॉक एक्सचेंज BSE आणि NSE वर एक तासाचे विशेष मुहूर्त ट्रेडिंग सत्र चालू करण्यात येणार आहे. मुहूर्त ट्रेडिंगचे प्री-ओपनिंग सत्र संध्याकाळी ५.४५ ते ६ वाजेपर्यंत असेल. मुहूर्त ट्रेडिंग टाइम स्लॉटमध्ये इक्विटी, कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज, करन्सी डेरिव्हेटिव्ह्ज, इक्विटी फ्युचर्स आणि ऑप्शन्स आणि सिक्युरिटीज लेंडिंग अँड बोरोइंग (SLB) यांसारख्या अनेक विभागांमध्ये ट्रेडिंग देखील दिसेल. बीएसई-एनएसईने २० ऑक्टोबर रोजी स्वतंत्र परिपत्रकाद्वारे याची घोषणा केली होती.
शेअर बाजारात दिवाळीला मुहूर्त खरेदी करण्याची परंपरा सुमारे ६८ वर्षे जुनी आहे. हिंदू कॅलेंडर वर्षानुसार, हिंदू विक्रम संवत वर्ष २०८१ या वर्षी दिवाळीच्या दिवसापासून सुरू होत आहे. संपूर्ण भारतामध्ये हा सण संपत्ती, समृद्धी आणि सौभाग्य यांचे स्वागत करण्याचा सर्वात शुभ काळ मानला जातो. त्याचप्रमाणे या मुहूर्ताच्या व्यवहाराशीही अशीच एक संकल्पना जोडलेली आहे. शेअर बाजारातील गुंतवणूकदार गुंतवणूक सुरू करण्यासाठी हा दिवस खूप खास मानतात.
हिंदू रीतिरिवाजांमध्ये, मुहूर्त हा एक काळ आहे जेव्हा ग्रहांची हालचाल अनुकूल मानली जाते. शुभ मुहूर्तावर कोणतेही काम सुरू केल्याने त्याचे सकारात्मक परिणाम निश्चित होतात. म्हणूनच दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर शेअर बाजार तासभर उघडला की अनेक हिंदू धर्मीय लोक आपली गुंतवणूक सुरू करतात. बहुतेक लोकांना देवी लक्ष्मीचे प्रतीक म्हणून स्टॉक खरेदी करणे आवडते. मान्यतेनुसार, जे लोक या एका तासात व्यापार करतात त्यांना वर्षभर पैसा कमावण्याची आणि समृद्धी मिळविण्याची चांगली संधी असते.