Home » जाणून घ्या दिवाळीचे पौराणिक महत्व

जाणून घ्या दिवाळीचे पौराणिक महत्व

by Jyotsna Kulkarni
0 comment
Diwali 2024
Share

दिवाळी दिव्यांचा, प्रकाशाचा सण. आपण प्रत्येक महिन्यात लहान मोठा एक सण साजरा करतच असतो. मात्र दिवाळीची बातच न्यारी आहे. पाच दिवस साजऱ्या होणाऱ्या दिवाळीची प्रत्येक जणं आतुरतेने वाट बघत असतो. दिवाळीमध्ये पणत्या, दिवे, रोषणाई, फराळ, रांगोळ्या आदी सर्वच गोष्टीची रेलचेल असते. संपूर्ण कुटुंब देखील या दिवसांमध्ये एकत्र येते. आपण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने दिवाळी दरवर्षी साजरी करतो, मात्र दिवाळी साजरी करण्यामागे अनेक गोष्टी आहेत, कारणं आहेत. ती आपण आज या लेखातून जाणून घेणार आहोत.

कार्तिक महिन्यातील त्रयोदशीपासून दिवाळीची सुरुवात होते. कार्तिक महिन्याच्या अमावस्येला मुख्य दिवाळी अर्थात लक्ष्मीपूजन असते. वसुबारस ते भाऊबीज असे जवळपास पाच दिवस दिवाळी सण साजरा केला जातो. दिवाळी साजरी करण्यामागे अनेक पौराणिक कारणं आहेत ती कोणती पाहूया.

श्री राम आणि दिवाळी

दिवाळी साजरी करण्यामागचे सगळ्यांना माहित असलेले आणि प्रसिद्ध कारण म्हणजे श्रीमांचे घरी पुनरागमन. अशी मान्यता आहे की, भगवान श्री राम यांनी दसऱ्याला रावणाचाच वध केला आणि १४ वर्षांचा वनवास संपवून ते पुन्हा अयोध्येला परतले होते. असे म्हणतात की ते थेट अयोध्येला जाण्याऐवजी प्रथम नंदीग्रामला गेले आणि तेथे काही दिवस राहिल्यानंतर त्यांनी दिवाळीच्या दिवशी अयोध्येत प्रवेश केला. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण अयोध्या शहर दिव्यांनी सजले होते. लोकांनी दिवे लावून श्रीरामांचे अयोध्येमध्ये जल्लोषात स्वागत केले. तेव्हापासून दिवाळीला दीपोत्सव साजरा करण्याची पद्धत सुरू झाली.

Diwali 2024

बळी राजा आणि दिवाळी

दिवाळी साजरी करण्यामागे बाली राजाची कथा देखील प्रसिद्ध आहे. असे म्हटले जाते की, दिवाळीचा सण सर्वात आधी राजा महाबली यांच्या काळातच सुरू झाला. भगवान विष्णू यांनी जेव्हा वामन अवतारामध्ये दानवीर राजा बळीकडे तीन पाऊले जमीन मागितली तेव्हा त्याने होकार दिला आणि भगवान विष्णू यांनी त्यांच्या तीन चरणात संपूर्ण जग व्यापले. राजा बळीच्या दातृत्वाने प्रभावित होऊन भगवान विष्णूने त्याला पाताळाचे राज्य दिले आणि पृथ्वीवरील लोक त्याच्या स्मरणार्थ दरवर्षी दिवाळी साजरी करतील असे आश्वासनही दिले. तेव्हापासून दिवाळीचा सण साजरी करण्याची रीत सुरू झाली.

यक्ष आणि दिवाळी

असे सांगितले जाते की सुरुवातीला दिवाळी हा सण यक्ष आणि गंधर्व फक्त यांचाच सण होता. यक्ष त्याचा राजा कुबेर सोबत दिवाळीची रात्र आरामात चैनीमध्ये घालवत असत आणि त्यांच्या यक्षिणींसोबत मजा करत असे. पुढे हा सण सर्वच लोकांचा मुख्य सण बनला.

लक्ष्मी आणि दिवाळी

संपत्तीची देवता कुबेराऐवजी लक्ष्मी देवीची या धनाची देवता म्हणून पूजा केली जाऊ लागली, कारण कुबेरजी फक्त यक्ष जातींमध्येच पूजनीय होते, परंतु लक्ष्मी जी देव आणि मानव यांच्यात पूजनीय होती. त्यामुळे देखील ही दिवाळी साजरी केली जाऊ लागली.

कुबेर, लक्ष्मी आणि गणपतीची पूजा आणि दिवाळी

भगवान कुबेर हे केवळ संपत्तीचे स्वामी आहेत तर गणपती संपूर्ण संपत्ती, बुद्धी, कला आणि समृद्धी देणारा देव मानला जातो. त्याचप्रमाणे देवी लक्ष्मी केवळ संपत्तीची देवता नाही तर ऐश्वर्य, सुख आणि समृद्धीची देवता मानली जाते. त्यामुळे कालांतराने लक्ष्मी-गणेश यांचे नाते लक्ष्मी-कुबेर यांच्यापेक्षा जवळचे असल्याचे वाटी लागले आणि दिवाळीच्या निमित्ताने या तिन्ही देवतांची पूजा होऊ लागली.

लक्ष्मी विवाह दिवस

लक्ष्मीपूजनाचा दिवाळीशी संबंध असण्याचे कारण म्हणजे या दिवशी लक्ष्मी आणि विष्णूजींचा विवाहही पूर्ण झालेला मानला जातो.

देवी लक्ष्मी आणि काली

असे म्हणतात की समुद्रमंथन झाल्यानंतर दिवाळीच्या दिवशीच देवी लक्ष्मी आणि धन्वंतरी देव यांचे या पृथ्वीवर आगमन झाले होते. शिवाय याच दिवशी माता कालीही पृथ्वीवर प्रकट झाली होती. म्हणून या दिवशी काली आणि लक्ष्मी या देवीची पूजा केली जाते.

श्री कृष्ण आणि दिवाळी

असे म्हटले जाते की दिवाळीच्या एक दिवस आधी श्रीकृष्णाने अत्याचारी नरकासुराचा वध केला होता याला नरक चतुर्दशी म्हणतात. या आनंदात अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी गोकुळवासीयांनी दिवे लावून आनंदोत्सव साजरा केला. दुसरी घटना श्रीकृष्णाने सत्यभामेसाठी पारिजात वृक्ष आणण्याशी संबंधित आहे. श्रीकृष्णाने इंद्रपूजेला विरोध करून गोवर्धन पूजेच्या रूपात अन्नकूटची परंपरा सुरू केली होती.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.