Home » कोल्ड्रिंक्सच्या अतिसेवनाने कर्करोगाचा धोका वाढतो का? जाणून घ्या अभ्यासात काय आढळले

कोल्ड्रिंक्सच्या अतिसेवनाने कर्करोगाचा धोका वाढतो का? जाणून घ्या अभ्यासात काय आढळले

by Team Gajawaja
0 comment
cold drinks
Share

या कडक उन्हात शरीराला हायड्रेट ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. शरीराला ताजेतवाने करण्यासाठी बहुतेक लोक कोल्ड्रिंक्सचे(cold drinks) सेवन करतात. सोडा असलेले हे कोल्ड्रिंक्स तुम्हाला ताजेतवाने आणि पोटात थंडगार वाटतात. परंतु त्याचे दररोज किंवा जास्त प्रमाणात सेवन करणे तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकते. विशेषत: तरुणांमध्ये कोल्ड ड्रिंक्सची वाढती आवड पाहता तज्ज्ञांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.

आरोग्याच्या दृष्टीने, कोल्ड्रिंक्सच्या अतिसेवनाने अनेक आरोग्य समस्यांचा धोका वाढू शकतो, ज्याबद्दल प्रत्येकाने जागरूक असणे आवश्यक आहे.

संशोधनात असे दिसून आले आहे की, कोल्ड ड्रिंक्समुळे शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढते. ज्याचे विविध दीर्घकालीन दुष्परिणाम होऊ शकतात. या कडक उन्हाळ्यात कोल्ड्रिंक्स (cold drinks) प्यायल्याने तुम्हाला फ्रेश जाणवत असले, तरी आतून ते शरीराला अनेक प्रकारे हानी पोहोचवू शकते. वजन वाढण्यापासून ते मधुमेहाच्या जोखमीपर्यंत, नियमितपणे कोल्ड्रिंक्सचे सेवन करणे तुमच्यासाठी खूप हानिकारक असू शकते. याचे दुष्परिणाम जाणून घेऊया.

टाईप-२ मधुमेहाचा धोका 

संशोधनानुसार, कोल्ड ड्रिंक्समध्ये(cold drinks) फ्रुक्टोजचे प्रमाण जास्त असते. जास्त प्रमाणात फ्रुक्टोजचे सेवन केल्याने इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढू शकते, ज्यामुळे तुम्हाला टाइप-२ मधुमेह होण्याचा धोका असू शकतो. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, दररोज एक कॅन कोल्ड्रिंक प्यायल्याने तुमचा टाइप २ मधुमेहाचा धोका अनेक पटींनी वाढू शकतो. मधुमेह हा सायलेंट किलर आजारांपैकी एक मानला जातो, ज्यामुळे इतर अनेक आजारांचा धोका वाढतो.

=====

हे देखील वाचा – ‘या’ आजारांमध्ये बटाटे खाणे टाळा, जास्त सेवनाने निर्माण होऊ शकतात समस्या

=====

कॅन्सरचा धोका 

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, काही अभ्यासात असेही दिसून आले आहे की, कोल्ड्रिंक्सचे(cold drinks) जास्त सेवन करण्याच्या सवयीमुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो. ६०,००० हून अधिक प्रौढांच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जे लोक दर आठवड्याला २ किंवा त्याहून अधिक कॅन कोल्ड्रिंक्स पितात, त्यांना स्वादुपिंडाचा कर्करोग होण्याची शक्यता ८७ टक्के जास्त असते.

लठ्ठपणा आणि बेली फॅटलठ्ठपणा आणि बेली फॅट धोका

संशोधन असे सूचित करते की, बहुतेक कोल्ड्रिंक्स(cold drinks) कॅनमध्ये ८ चमचे साखर असते. याच्या अतिसेवनाने शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढते, त्यामुळे लठ्ठपणाचा धोकाही वाढतो. विविध प्रकारच्या आरोग्य समस्यांसाठी जास्त वजन असणे, हा एक प्रमुख जोखीम घटक असल्याचे अभ्यासात दिसून आले आहे. त्यामुळे कोल्ड्रिंक्सचे सेवन कमी प्रमाणात करावे.

यकृताशी संबंधित समस्या 

नियमितपणे किंवा जास्त प्रमाणात कोल्ड्रिंक्सचे सेवन केल्याने, यकृताशी संबंधित अनेक आरोग्य समस्यांचा धोका वाढू शकतो. विशेषतः फॅटी लिव्हर रोगाचा धोका लक्षणीय वाढतो. संशोधनात असे दिसून आले आहे की, जास्त प्रमाणात फ्रुक्टोज कॉर्न सिरप असलेल्या पदार्थांचे सेवन यकृतावर अतिरिक्त दबाव वाढवते, ज्यामुळे या अवयवाशी संबंधित अनेक रोगांचा धोका वाढतो.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.