Home » दिग्पाल लांजेकरांची महाराजांवरील ‘ती’ कविता व्हायरल

दिग्पाल लांजेकरांची महाराजांवरील ‘ती’ कविता व्हायरल

by Jyotsna Kulkarni
0 comment
Digpal Lanjekar
Share

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. अवघ्या आठ महिन्यात हा पुतळा कोसळल्याने विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि कॉन्ट्रॅक्टर चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी असून, हा पुतळा कोसळल्यानंतर सगळ्याच शिव प्रेमींना मोठा धक्का बसला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पूर्णाकृती पुतळा कोसळला. त्यानंतर सगळ्यांनीच अनेक प्रश्न उपस्थित केले. विरोधकांनी तर सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील सरकारवर, कॉन्ट्रॅक्टरवर टीका होताना दिसत आहे. संपूर्ण हिंदू लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर कलाकारांनी देखील यावर त्यांचे मत मांडले आहे.

यावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. अशातच मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय आघाडीचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी देखील एक मनाला भिडणारी कविता पोस्ट करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विविध पराक्रम ‘शिवरायांचे अष्टक’ मधून प्रेक्षकांसमोर मांडणाऱ्या दिग्पाल यांच्यासाठी देखील महाराज म्हणजे दैवत. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले,

““क्षमा धनी…
गलबलला दर्या,
त्याचे अश्रू कुणा दिसेना
बाप कोसळता माझा,
वेदना उरी ती मावेना
चूक कुणाची कुणाची,
सारे भांडती भांडती
पण भाव स्वराज्याचा,
बघा सारेच सांडती

रे माझ्या बापा शिवराया
तुमच्यासाठी उरे काया
नको मूर्ती ती लौकिक
नको स्मारक भौतिक
देवा शक्ती द्या लेकरा
तव कवतिक सांगाया
तव पराक्रमाचा तो
दीप लागू दे तेवाया
श्वास माझा हो संपू दे
तुमची स्मृती ती कोराया
मनामनाच्या अंतरी
तुमची मूर्ती साकाराया”

दिग्पाल लांजेकर यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. “शप्पत कॅपशन वाचताना डोळ्यात पाणी आलं, राजं खरचं माफ करा…”, “मनाला भिडणारे लेखन आणि त्यातील भाव”, “माफ करा राज” आदी अनेक सुंदर कमेंट्स या पोस्टवर आल्या आहेत. दिग्पाल यांचे महाराजांवरील प्रेम हे वारंवार दिसून येते. त्यांच्या जीवनावरील चित्रपट, त्यांच्या आयुष्यावर असलेला त्यांचा अभ्यास सर्वश्रुत आहे. त्यामुळे हा पुतळा कोसळल्यानंतर त्यांना अतीव दुःख झालेले आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या या 35 पुतळी फुट्याचे लोकार्पण करण्यात आले. मात्र, केवळ आठच महिन्यांत हा पुतळा कोसळल्याने त्याची बांधणी निकृष्ट असल्याचा आरोप होत आहे.

या पुतळ्याला काही दिवसांपूर्वी गंज लागला होता. ही बाब लक्षात येताच सार्वजनिक बांधकाम खात्याने पत्र लिहून ही गोष्ट नौदलाला कळवली होती. मात्र, त्यानंतर नौदलाकडून योग्य ती कार्यवाही झाली नाही आणि शिवाजी महाराजांचा हा पुतळा मुळापासून कोसळण्याचा दुर्दैवी प्रकार घडला.

शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट केतन पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.