आपल्याबद्दल कोणी चांगले बोलावे, आपले कौतुक करावे असे सगळ्यांनाच वाटत असते. वरवर असे स्पष्ट कोणी बोलत नाही, मात्र कोणी कौतुक केलेले कोणाला आवडणार नाही. त्यात आपल्या वाढदिवसाच्या खास दिवशी सोशल मीडियावर आपल्याबद्दल पोस्ट शेअर करत आपले कौतुक केल्यावर तर आपला आनंद गगनात मावणार नाही. असेच काहीसे झाले आहे अभिनेता समीर परांजपेंच्या बाबतीत. ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ फेम समीरने नुकताच त्याचा वाढदिवस साजरा केला.
समीर परांजपेला वाढदिवसाच्या दिवशी असंख्य शुभेच्या मिळाल्या. सोशल मीडियावर देखील त्याच्या चाहत्यांनी त्याला शुभेच्छा देण्याचा सपाटा लावला होता. मात्र यातच एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ती पोस्ट अर्थातच समीरसाठीच होती. त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’या मालिकेच्या दिग्दर्शकांनी चंद्रकांत कणसे यांनी त्याच्याबद्दल खूपच सुंदर पोस्ट लिहिली होती. ही पोस्ट सध्या खूपच गाजत असून, चर्चेचा विषय ठरत आहे.
चंद्रकांत कणसे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “टेलिव्हिजनच्या दुनियेत फक्त डायलॉग बोलून पर डे भरणारे अनेक नट जन्माला आलेत. त्यांना इंडस्ट्रीत कामं ही भरपूर मिळतायत कारण हल्ली गुणवत्ता (quality) नाही तर प्रमाण (quantity) फार महत्वाचं झालीय…अशा या नॉन अॅक्टर्स ना सोडून काही जण आहेत ज्यांना खरंच अभिनय कळतो, अभिनयाची जाण असते, तो जमतो आणि जमत नसेल तर खूप सारे प्रयत्न करून, लाज लज्जा सोडून, कोणाची ही तमा न बाळगता ती लोकं अभिनयाला हरवून त्याला आपलंस करून घेतात…त्यापैकीच एक उत्तम अभिनेता म्हणजे समीर परांजपे.
View this post on Instagram
सेटवर आल्यापासून मेकअप होईपर्यंत त्याचं एनर्जीने काम करताना अजिबात कसलीच तक्रार नाही की वेळेचं भान नाही. सगळ्या सहकलाकारांबरोबर मज्जा मस्ती करत (विशेषतः – आभा आणि दिनेश) कोणाबरोबर कसलेच हेवेदावे न ठेवता सेटचं वातावरण हलकं करून उत्तम काम करणारा आमचा समीर आणि त्याचा आज वाढदिवस…नेमका मतदानाच्या दिवशी.
समीर तुला भाजपाकडून कमळाच्या सुवासिक शुभेच्छा…शिवसेनेकडून धनुष्य बाणासारख्या ध्येयाचा निशाणा बरोबर साधण्याच्या शुभेच्छा…मनसेकडून आगगाडी सारख्या वेगवान पुढे जाण्याच्या शुभेच्छा…उबाठाकडून मशाली सारख्या ज्वलंत विचारांच्या शुभेच्छा…काँग्रेसच्या हाताकडून आशीर्वादाच्या शुभेच्छा…राष्ट्रवादीकडून घड्याळासारख्या नेहमी वेळ पाळण्याच्या शुभेच्छा…तर माझ्याकडून फक्त मनापासून खूप खूप शुभेच्छा.”
ही पोस्ट सध्या त्यातील लिखाणामुळे खूपच गाजत आहे. या पोस्टमधून चंद्रकांत यांनी समीरचे भरभरून कौतुक केले आहे. दरम्यान या पोस्टवर देखील अनेक कमेंट्स आल्या आहेत. सर्वानीच समीरला शुभेच्छा देताना चंद्रकांत कणसे यांच्या लिखाणावर देखील भरभरून स्तुतीसुमने उधळली आहेत.
तत्पूर्वी समीर हा मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याला आपण याआधी ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत आणि ‘गोठ’ या शोमध्ये देखील पाहिले आहे. समीर जितका सुंदर नट आहे तितकाच तो उत्तम गायक देखील आहे. त्याने सूर नवा ध्यास नवा या शोमध्ये देखील सहभाग घेतला होता.