Home » DigiYatra App च्या माध्यमातून करता येणार विमानाने पेपरलेस तिकिटाचा प्रवास

DigiYatra App च्या माध्यमातून करता येणार विमानाने पेपरलेस तिकिटाचा प्रवास

by Team Gajawaja
0 comment
DigiYatra App
Share

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत भारतात डिजीयात्रा अॅपचे (DigiYatra App) बीटा वर्जन लॉन्च करण्यात आले आहे. लेटेस्ट बीटा वर्जन हे बंगळुरुतील केम्पेगौडा इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्टसाठी जारी करण्यात आले आहे. आजादी का अमृतमोहत्सवासह भारताने सुद्धा कॉन्टेकलेस आणि पेपरलेस विमान प्रवासाच्या क्षेत्रात एक पाऊल पुढे ठेवले आहे. म्हणजेच दोन ठिकाणांमधील देशाअंतर्गत प्रवासासाठी प्रवाशांना कोणत्याही कागदाची गरज पडणार नाही. त्यांना ई-गेट बोर्डिंग सिस्टिमच्या माध्यमातून आपला विमान प्रवास पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना बायोमॅट्रिक वेरिफिकेशनच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे.

बंगळुरु आणि दिल्लीत सुरु झाली सेवा
सध्या बंगळुरु आणि दिल्ली विमानतळावरच डिजियात्रा बोर्डिंग सिस्टिम आणि ई-गेटची व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, टप्प्याटप्प्याने ही सेवा देशभरातील संपूर्ण देशाअंतर्गत विमानतळांसाठी सुद्धा सुरु केली जाणार आहे. म्हणजेच प्रवाशाला आपली ओळख आणि आपला बोर्डिंग पास मान्य करण्यासाठी फक्त बायोमॅट्रिक वेरिफिकेशन करु शकतात. त्यानंतर चेक इन आणि सिक्युरिटी चेकमधून गेल्यानंतर आपल्या विमानात त्यांना चढण्याची परवानगी दिली जाणार आहे.

हे देखील वाचा- Android फोन वापरणाऱ्यांनी व्हा सावध! युट्युब सारख्या App मध्ये ‘या’ वायरसचा धोका

DigiYatra App
DigiYatra App

प्रायव्हेसीची घेतली जाणार काळजी
डिजियात्रा फाउंडेशनच्या मते, डिजियात्रा सेंट्रल इकोसिस्टिम वर्ल्ड वाइड वेब कंसोर्टियम स्टँडर्डवर तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये वेरिफिएबल क्रेडेंशियल्स आणि डिसेंट्रलाइज्ड आयडेंटिफायर्ससह सेल्फ सॉवरेन आयडेंटिटी यांचा समावेश आहे. या उपयांचा उद्देश असा की, डेटासह प्रायव्हेसीच्या मुद्द्यावर सुरक्षितता ठेवली जाईल. फाउंडेशनने दावा केला आहे की, प्रवाशाने प्रवास केल्यानंतर २४ तासात त्यांचा डेटा डिलीट होईल.(DigiYatra App)

‘या’ एअरलाइन्समध्ये आधीपासूनच होती उपलब्धता
डिजियात्रा अॅपची सर्विस ही आधीपासून विस्तारा आणि एअर एशिया यांच्यासाठी उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्हाला वाटल्यास तुम्ही सहज डिजियात्रा अॅपमध्ये स्वत: रजिस्ट्रेशन करु शकता. हा अॅप अॅन्ड्रॉइड युजर्ससाठी प्ले स्टोरवर उपलब्ध आहे. तर आयओएस युजर्ससाठी हे नवे वर्जन एका महिन्यात उपलब्ध करुन दिले जाण्याची शक्यता आहे. पेपरलेस प्रक्रियेच्या मदतीने युजरला अत्यंत सहजपणे विमान प्रवास करता येणार आहे.

असे करा रजिस्ट्रेशन
सध्या डिजियात्रेच्या अॅपवर रजिस्ट्रेशन करायचे की नाही हा प्रत्येक प्रवाशाचा प्रश्न आहे. परंतु ज्या प्रवाशाला याचा वापर करायचा आहे त्याने हा अॅप डाऊनलोड करावा. रजिस्ट्रेशनसाठी आधाराचे डिटेल्स द्यावे लागणार आहेत. या व्यतिरिक्त कोविड१९ सर्टिफिकेट सुद्धा माहितीसाठी द्यावे लागणार आहे. त्याचसोबत तुमचा एक पासपोर्ट साइज फोटो ही तुम्हाला या अॅपवर रजिस्ट्रेशन करताना अपलोड करावा लागणार आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.