स्मार्टफोन आपल्या आयुष्यात फार महत्वाचा हिस्सा झाला आहे. मात्र हळूहळू याची सवय व्यक्तीला धोक्यात टाकत आहे. नुकत्याच हैदराबाद मध्ये स्मार्टफोनमुळे एका महिलेला डोळ्याने पाहणे बंद झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. हैदराबादचे डॉ. सुधीर कुमार यांनी ट्विटवरवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्यांनी सविस्तर सांगितले आहे की, कशा प्रकारे अंधारात स्मार्टफोन वापरल्याने ३० वर्षीय महिलेला अंधत्व आले आहे. डॉक्टरांच्या मते, मंजू नावाची महिलेला खुप प्रकाश आणि एकाग्रतेसाठी त्रास व्हायचा. काही वेळा असे व्हायचे की, महिलेला काहीच दिसायचे नाही.(Digital Vision Syndrome)
मंजूला बहुतांशवेळा काहीच दिसायचे नाही. खासकरुन रात्रीच्या वेळी काही सेकंदासाठी काही दिसायचे नाही. अशा स्थितीत ती डोळ्यांच्या डॉक्टरांकडे गेली असता तिचे डोळे बरे होते. न्यूरोलॉजिकल कारणे शोधण्यासाठी तिला रेफर केले गेले. डॉक्टरांच्या बातचीत मध्ये असे कळले की, महिला ब्युटीशियनची नोकरी करायची. जी तिने सोडली होती. त्यानंतर ती गेल्या दीड वर्षापासून प्रतिदिन काही तासांपर्यंत स्मार्टफोनवर वेळ घालवायची. खासकरुन रात्रीच्या वेळी लाइट बंद केल्यानंतर ती सातत्याने स्मार्टफोनचा वापर करायची.
महिलेला होता डिजिटल विजन सिंड्रोम
तपासात असे कळले की, महिला स्मार्टफोन विजन सिंड्रोममुळे पीडित आहे. हे सिंड्रोम कंप्युटर, स्मार्टफोन किंवा अन्य डिजिटल उपकरणे अधिक वेळ वापरण्यामुळे होऊ शकते. याला कंप्युटर विजन सिंड्रोम किंवा डिजिटल विजन सिंड्रोमच्या रुपात ओळखळे जाते. ज्यामुळे डोळ्यांना पाहणे कमी होण्याची शक्यता असते.
डिजिटल विजन सिंड्रोम म्हणजे काय?
डिजिटल विजन सिंड्रोमला कंप्युटर विजन सिंड्रोम असे म्हटले आहे. याला डिजिटल आय स्ट्रेनच्या नावाने ओळखले जाते. डोळ्यांवर अधिक ताण पडल्याने हा सिंड्रोम होऊ शकतो. या व्यतिरिक्त डोके दुखी, मान दुखणे आणि खांदे दुखणे अशा समस्या होऊ शकतात. अमेरिकन ऑप्टोमेट्रिक एसोसिएशनच्या मते, जर एखादा व्यक्ती कंप्युटर किंवा अन्य डिजिटल स्क्रिनचा वापर दोन तास किंवा त्यापेक्षा अधिक काळापर्यंत केल्यास तर हा सिंड्रोम होण्याची शक्यता वाढते.(Digital Vision Syndrome)
डॉक्टर सुधीर यांच्या मते त्यांनी कोणताही तपास करण्यास सांगितले ना कोणते औषध दिले. ती डोळ्यांबद्दल अधिक काळजीत होती. डॉक्टरांच्या मते, स्मार्टफोन विजन सिंड्रोमवर काही औषध नाही केवळ मोबाईलचा कमी वापर हाच एक उपाय आहे. यासाठी मंजूला स्मार्टफोनचा कमीत कमी वापर करण्यास सांगितले. मंजुने सुद्धा तसेच केले. एका महिन्यात तिच्या डोळ्यांना थोडं व्यवस्थितीत दिसू लागले होते.
हे देखील वाचा- एका महिन्यात ३६ लाख भारतीयांच्या WhatsApp वर बंदी, ‘ही’ चुक करणे पडेल महागात
सिंड्रोम पासून बचाव करण्याचे उपाय
ट्विटरवर डॉ. सुधीर यांनी सिंड्रोम पासून बचाव करण्यासाठी असे लिहिले की,डिजिटल उपकरणांचा अधिकाधिक वापर केल्याने डोळ्यांना अंधुक दिसू लागते. यासाठी डिजिटल स्क्रिनचा कमीत कमीत वापर केला पाहिजे. त्याचसोबत जेव्हा तुम्ही स्क्रिन पाहता तेव्हा ती २० फूट दूर असावी. २०-२० सेकंदानंतर ब्रेक घ्यावा.