Home » डिजिटल ब्लॅकफेस म्हणजे काय? सोशल मीडियात सध्या यावरुन सुरु आहे वाद

डिजिटल ब्लॅकफेस म्हणजे काय? सोशल मीडियात सध्या यावरुन सुरु आहे वाद

by Team Gajawaja
0 comment
Digital Blackface
Share

सध्याच्या दिवसात डिजिटल ब्लॅकफेसची जोरदार चर्चा सुरु आहे. याबद्दल लोक विविध मतं मांडत आहेत. काही लोक याच्या बाजूने बोलतायत तर काही यावर टीका ही करतायत. अशातच डिजिटल ब्लॅकफेस म्हणजे काय आणि त्याबद्दल ऐवढी का चर्चा केली जातेय हे जाणून घेऊयात. खरंतर समाजातील काही गोष्टींना जवळून पाहिल्यानंतर त्याबद्दल आपली मतं निर्माण केली जातात. अशातच आपण जेव्हा डिजिटलच्या रुपात अॅक्टिव असते त्वाह सुद्धा या गोष्टी दिसून येतात. (Digital Blackface)

डिजिटल ब्लॅकफेस म्हणजे काय?
गोऱ्या लोकांकडून इंस्टाग्राम किंवा टिकटॉकवर रील आणि व्हिडिओ बनवण्यासाठी काळ्या लोकांच्या मिम्सचा वापर केला जात आहे. काही वेळा ब्लॅक आर्टिस्टच्या ऑडिओचा सुद्धा वापर केला जातो. यालाच सर्वसामान्यपणे डिजिटल ब्लॅकफेस असे म्हटले जाते. ट्विटरवर सुद्धा त्याचा वापर केला जातो. बहुतांशवेळा याचा वापर गोष्टी मनोरंजनात्मक पद्धतीने दाखवण्यासाठी केला जातो. जसे की, अमेरिकन रॅपर कार्ड बी चा ऑडिओ आणि RaPaul च्या ड्रॅग शो च्या मिम्सचा वापर.

डिजिटल ब्लॅकफेस वादात का?
दीर्घकाळापासून काही लोकांकडून असा तर्क लावला जात आहे की, याचा वापर हा ब्लॅक लोकांच्या प्रति असंवेदनशील आहे. ऐवढेच नव्हे तर त्या लोकांच्या प्रति तथ्यांना पुढे नेले जात आहे. अशातच जर तुम्ही काळे आहात आणि असे फोटो सोशल मीडियात बचाव करण्यासाठी पास मिळतो. तर जर तुम्ही गोरे आहात आणि तुम्ही अज्ञातपणे रेसिज्मला प्रोत्साहन दिले तर असे असू शकते ही तुम्ही ब्लॅकफेस घातलेला असेल.

काही टीकाकरांचे असे म्हणणे आहे की, डिजिटल ब्लॅकफेस आधुनिक काळात मिनस्ट्रेल शो आहे. १९व्या शतकाच्या सुरुवातीला वर्णद्वेषी नाटके सुरुवातीला एक अमेरिकन मनोरंजन म्हणून विकसित झाली. 19व्या शतकात, गोरे कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी जळलेल्या कॉर्कचे काळे चेहरे असलेल्या लोकांचा वापर करत. ही प्रथा 20 व्या शतकात ‘अमोस एन अँडी’ सारख्या हिट रेडिओ शोसह चालू राहिली.(Digital Blackface)

हे देखील वाचा- ट्विटरवरील सोर्स कोड ऑनलाईन लीक

या संदर्भात सीएनएनने एक लेख लिहिला आहे ज्यामध्ये गोरे लोक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही प्रथा इतकी हानिकारक का आहे? काही वेळातच सोशल मीडियात त्याच्या बाजूने आणि विरोधाची चर्चा सुरू झाली. काहींचे म्हणणे आहे की ते फक्त मनोरंजनासाठी आहे आणि त्यावर जास्त लक्ष केंद्रित करू नये, तर काही लोक म्हणतात की हे काळ्या लोकांना अमानुषपणे दाखवते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.