Digital Arrest: गेल्या काही महिन्यांपासून डिजिटल अरेस्ट हा शब्द वारंवार ऐकू येतोय. सोशल मीडियावर, बातम्यांमध्ये किंवा अगदी व्हॉट्सअॅप मेसेजेसमध्ये लोक सांगताना दिसतात की त्यांना पोलीस किंवा सरकारी अधिकारी असल्याचं सांगणाऱ्या लोकांकडून धमक्या आल्या आणि काहींना तर फोनवरूनच अटक केली गेल्याचं भासवलं गेलं! पण नेमकं हे डिजिटल अरेस्ट म्हणजे काय आणि यापासून कसं वाचायचं? चला, जाणून घेऊया या नवीन ऑनलाइन फसवणुकीचा संपूर्ण खेळ.
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे प्रत्यक्ष अटक नव्हे, तर सायबर क्रिमिनल्सकडून बनावट कायदेशीर कारवाईचं भय निर्माण करून पैसे उकळण्याची फसवणूक. या स्कॅममध्ये फसवणूक करणारे स्वतःला पोलीस अधिकारी, सायबर सेल अधिकारी, किंवा कोणत्या तरी सरकारी एजन्सीचे प्रतिनिधी म्हणून सादर करतात. ते पीडित व्यक्तीला सांगतात की तिचं एखादं पार्सल, खाते किंवा डॉक्युमेंट गुन्ह्यात वापरलं गेलंय,आणि तपास सुरू आहे. यानंतर व्हिडिओ कॉलवर ऑफिस दाखवून, बनावट ओळखपत्रं दाखवून आणि कायदेशीर भाषेत बोलून लोकांना घाबरवतात. काही वेळा तुमच्यावर FIR दाखल होणार आहे असं सांगून ऑनलाइन जामीन किंवा क्लिअरन्स फी म्हणून पैसे मागतात. या भीतीत लोक पैसे ट्रान्सफर करून फसवले जातात. (Digital Arrest)

Digital Arrest
कशी चालते ही फसवणूक? सायबर गुन्हेगार सर्वप्रथम तुमचा मोबाईल नंबर, ईमेल किंवा सोशल मीडिया आयडी मिळवतात. नंतर फोन करून सांगतात की, तुमचं पार्सल ड्रग्जसह पकडलं गेलं आहे किंवा तुमचं बँक खाते मनी लाँडरिंगमध्ये वापरलं गेलंय. यानंतर ते व्हिडिओ कॉलवर बनावट पोलिस स्टेशन किंवा कोर्टाचं वातावरण दाखवतात. काही वेळा तुमचा केस दिल्ली पोलिसांकडे गेला आहे असं सांगतात आणि तुम्हाला कॉलवरच थांबून तपास सहकार्य करण्यास सांगतात. हीच वेळ असते जिथं व्यक्ती भीतीपोटी गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकते. (Digital Arrest)
======================
हे देखील वाचा:
Unique village: संध्याकाळनंतर रडण्यास बंदी! कोकणातील या गावात आजही जपली जाते अनोखी प्रथा
Office Rangoli Designs: ऑफिसमध्ये रंगोली स्पर्धा? काही मिनिटांत तयार करा हे सोपे आणि सुंदर डिझाईन्स!
===================
कायदा सांगतो पोलिस कधीच ऑनलाइन अटक करत नाहीत भारतामध्ये कोणत्याही प्रकारचं अटक आदेश किंवा चौकशी नोटिस केवळ अधिकृतरित्या दिली जाते. कोणतीही सरकारी संस्था, पोलिस विभाग किंवा न्यायालय **फोनवर, ईमेलवर किंवा व्हिडिओ कॉलवर** अटक करत नाहीत. त्यामुळे अशा कॉल्सवर घाबरू नका, आणि त्यांना वैयक्तिक माहिती, OTP, बँक डिटेल्स किंवा पैसे कधीच देऊ नका.जर कोणी स्वतःला अधिकारी म्हणून सादर करत असेल, तर त्यांचा **ओळख क्रमांक मागा, अधिकृत पत्र मागा किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधा. (Digital Arrest)
वाचण्यासाठी घ्या या खबरदारीच्या उपाययोजना
अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉल्सना लगेच विश्वास ठेवू नका.
कोणीही सरकारी अधिकारी असल्याचं सांगत असेल, तर थेट सायबर हेल्पलाइन नंबर 1930 वर संपर्क करा.
तुमची वैयक्तिक माहिती, आधार क्रमांक, बँक तपशील किंवा OTP कोणालाही देऊ नका.
व्हिडिओ कॉलवर चौकशी” ही फक्त फसवणुकीची पद्धत आहे ती खऱ्या चौकशीसाठी वापरली जात नाही.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics