एखाद्या ठिकाणी नोकरी करण्यापूर्वी तुमचा सीव्ही किंवा रेज्युम मागितला जातो. याची गरज सर्व नोकऱ्यांसाठी लागते. मात्र तुम्हाला सीव्ही आणि रेज्युम मधील फरक माहिती आहे का? कारण या गोष्टीवरुच तुम्हाला नोकरीवर घ्यायचे की नाही हे समोरचा व्यक्ती ठरवतो. मात्र यावर कोणीही जास्त लक्ष देत नाहीत. बहुतांश वेळा काहीजण सीव्ही आणि रेज्युम संदर्भात गोंधळतात आणि नक्की त्यांना काय बनवायचे आहे याचा विचार करावा लागतो. त्यामुळे तुम्हाला सुद्धा सीव्ही आणि रेज्युममधील फरक माहिती नसेल तर घाबरु नका. कारण आम्ही तुम्हाला सविस्तरपणे सीव्ही आणि रेज्युम मधील फरक सांगणार आहोत.(Difference between CV & Resume)
Resume म्हणजे काय?
रेज्युम हा फ्रेंच शब्द असून त्याचा अर्थ असा होतो की, सारांथ (Summary). यामध्ये तुम्ही तुमची कलाकौशल्ये आणि स्वत:बद्दल, शिक्षणाबद्दल काही गोष्टींची माहिती देता. जर तुम्ही एखाद्या गोष्टीत स्पेशलाइजेशन केले असेल तर तुमचा रेज्युम हा दोन-तीन पानांमध्ये तयार होते. असे ही मानले जाते की, रेज्युममध्ये थोडक्यात माहिती जरी असली तरीही ती महत्वपूर्ण असावी. याच कारणास्तव रेज्युम हा थोडक्यात लिहिलेला असतो.
एखाद्या नोकरीसाठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर तुम्ही तेथे तुमचा रेज्युम पाठवा. त्यानंतर जर तुम्हाला इंटव्यूसाठी बोलावले गेल्यास तेव्हा सोबत रेज्युम ऐवजी सीव्ही घेऊन जा. रेज्युममध्ये तुम्ही केलेल्या गोष्टींसंदर्भातील माहिती योग्य आणि पद्धतशीर मांडली पाहिजे. कारण तुमच्या करियर संदर्भातील सर्व माहिती ही रेज्युममध्ये तुम्ही देता.
हे देखील वाचा- ऑफिसच्या धावपळीत व्यायामासाठी वेळ नसेल, तर चिंता नको…ऑफिसमध्ये बसल्या जागीही करू शकता काही सोपे योगप्रकार
CV म्हणजे काय?
CV चा पूर्ण अर्थ असा होतो की, Carriculum Vitae. हा शब्द लॅटिन भाषेतून घेण्यात आला आहे. एकाबाजूला रेज्युम हा संक्षिप्त रुपात लिहिला जातो तर सीव्हीमध्ये तुमच्या बद्दल सविस्तर माहिती दिली देतो. थोडक्यात सीव्ही म्हणजे तुमचा बायोडेटा. यामध्ये तुम्ही तुमच्या संदर्भातील शाळा, महाविद्यालय, अवॉर्ड्स, डिग्री याबद्दलच्या गोष्टी सविस्तरपणे लिहू शकता. काही वेळेस तुमचा सीव्ही हा 4-5 पानांचा सुद्धा होऊ शकतो. जर तुम्ही एखाद्या मोठ्या पदासाठी अर्ज करणार असाल तर तुमच्याबद्दलची अधिक माहिती ही सीव्हीच्या माध्यमातूनच द्या.(Difference between CV & Resume)
लक्षात असू द्या, सीव्हीमध्ये लिहिताना घटनाक्रमानुसार काही गोष्टी लिहा. जसे की, तुमचे शिक्षण, नोकरी आणि तुम्हाला कोणत्या पदावर काम करायला आवडेल असे सर्वकाही. नोकरी न करणाऱ्यांसाठी बहुतांशवेळा सीव्ही मागितला जातो. असे अशासाठी केले जाते की, त्यांच्याकडे आतापर्यंत कोणताही अनुभव नसतो. त्यामुळे ते नोकरी करु शकतात की नाही हे सुद्धा ठरवले जाते.
हे देखील वाचा- मुलांची अभ्यासातील एकाग्रता वाढवायची असेल, तर त्यांना आवर्जून करायला लावा हे योगप्रकार
सीव्ही आणि रेज्युममधील फरक काय?
-रेज्युम मध्ये तुम्हाला संक्षिप्त रुपात लिहावे लागते तर सीव्ही मध्ये तुम्हाला सविस्तरपणे माहिती द्यावी लागते
-रेज्युममध्ये तुम्ही तुमची शैक्षणिक योग्यता, आपले अनुभव याबद्दल सांगू शकता. सीव्ही मध्ये तुम्हाला शिक्षणाबद्दल अधिक सविस्तर लिहावे लागते.
-रेज्युम हा तुमच्या प्रोफाइलनुसार बदलू शकतो आणि सीव्ही मध्ये सर्व नोकरीनुसार तो सारखाच राहतो. जॉब प्रोफाइलनुसार कोणताही त्यात बदल होत नाही.
-रेज्युममध्ये तुम्हाला तुमची कलाकौशल्य आणि अनुभव सांगावी लागतात. तर सीव्हीमध्ये तुमच्या आयुष्यातील सर्व अनुभवांबद्दल सांगावे लागते.
रेज्युममध्ये कोणत्या गोष्टी लिहाव्यात?
तुमचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी शिवाय तुमचे उद्देश, शिक्षण, व्यावसायिक कौशल्य, भाषा, शिक्षणासह अन्य अवॉर्ड्सबद्दल अधिक, आवड, सामान्य माहिती आणि व्यावसायिक अनुभव.
सीव्हीमध्ये कोणत्या गोष्टी लिहाव्यात?
तुम्ही ज्या नोकरीसाठी अर्ज करणार असाल त्यात तुमचा यापूर्वीचा कामाचा अनुभव, तुमचे पद, जबाबदाऱ्या, कंपनीबद्दल माहिती आणि किती वर्षांचा अनुभव आहे हे लिहावे लागेल. याव्यतिरिक्त शिक्षणासह अन्य संधींबद्दल अधिक माहिती व व्यावसायिक अनुभव, अवॉर्ड्स.
जर तुमचा रेज्युम हा योग्य पद्धतीने तयार केला असेल तर त्याला अधिक महत्व प्राप्त होतेच. पण समोरच्या व्यक्तीवर ही तुमच्याबद्दलची उत्तम छाप त्यामधून पडते. नोकरी मिळण्यासाठी तुम्हाला प्रथम रेज्युमच पाठवावा लागणार आहे. कारण नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला रेज्युम विचारला जातो. याउलट इंटरव्यूसाठी जाताना तु्म्ही तुमचा सीव्ही नक्कीच सोबत घेऊन जा. तुमच्य सीव्हीवर तुमचा फोटो असून द्या पण सविस्तरपणे ही तुमच्याबद्दल त्यात लिहिण्यास विसरु नका. जेणेकरुन समोरच्या व्यक्तीला तुमच्याबद्दल अधिक स्पष्टता येईलच पण तुमच्या व्यक्तीमत्वाबद्दल ही कळेल.
अशाप्रकारे तुम्ही तुमचा सीव्ही आणि रेज्युम तयार करु शकता. पण आता तुम्हाला सीव्ही आणि रेज्युममधील सुद्धा फरक कळला असेल. या गोष्टी तयार करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर करता येतोच. मात्र प्रत्येक जॉब प्रोफाइलनुसार तुम्ही तुमचा सीव्ही आणि रेज्युम तयार करु शकता.