झोप पूर्ण न होणे किंवा हेल्दी डाएटचे सेवन न केल्यने त्याचा सर्वाधिक परिणाम हा चेहऱ्यावर दिसून येतो. हळूहळू चेहऱ्याचा ग्लो कमी होऊ लागतो आणि डोळ्यांखाली डार्क सर्कल येऊ लागतात. दीर्घकाळापर्यंत लॅपटॉपवर काम करणे किंवा फोनवर खुप वेळ घालवणे या कारणामुळे ही डोळ्यांवर परिणाम होतो. अशातच डोळ्यांखाली काळे डाग पडू लागतात. हे डार्क सर्कल तुमचे सौंदर्य बिघडवण्यास कारणीभूत ठरतात. मेकअपच्या मदतीने तुम्ही हे डार्क सर्कल लपवू शकता. मात्र त्यावर काही परमानेंट उपाय नाही. (Diet for dark circle)
तुम्हाला सुद्धा डार्क सर्कलची समस्या असेल तर चिंता करू नका. आपल्या डाएटमध्ये काही हेल्दी फूड्सचा समावेश करून डार्क सर्कलच्या समस्येपासून दूर राहू शकता. हेल्दी डाएटसोबत तुम्ही पुरेशी झोप सुद्धा घेतली पाहिजे. यामुळे डार्क सर्कल कमी होण्यास मदत होईल.
टोमॅटो

Diet for dark circle
टोमॅटो आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो. यामध्ये लाइकोपेन असते, जे आपल्या डोळ्यांखाली ब्लड सर्कुलेशन वाढवते. याच कारणास्तव डार्क सर्कलची समस्या दूर होऊ शकते. टोमॅटो तुम्ही भाजीत टाकून खाण्यासह सॅलेडच्या रुपात ही खाऊ शकता.
बीट

Diet for dark circle
बीटात काही पोषक तत्वे असतात जे आरोग्याला हेल्दी ठेवण्यास मदत करतात. बीटात मॅग्नेशिअम आणि व्हिटॅमिन असतात, जे डार्क सर्कल दूर करण्यास मदत करू शकतात. बीटाचे सेवन काही प्रकारे तुम्ही करू शकता. यामुळे शरिरात रक्त वाढण्यास ही मदत होते आणि त्वचा ही उजळ होते.
काकडी

Diet for dark circle
काकडीचा वापर आपण डोळ्यांवर लावण्यासाठी करतो. यामुळे डार्क सर्कलची समस्या दूर होण्यास मदत होते. डोळ्यांवर काकडी लावण्यासह तुम्ही ती खाऊ शकता. काकडीत काही पोषक तत्वे असतात, जे डार्क सर्कल दूर करण्यास फायदेशीर असतात. काकडीची स्मूदी किंवा रायता तुम्ही खाऊ शकता.
बदाम

Diet for dark circle
व्हिटॅमिन ई त्वचेसाठी उत्तम असते. काही लोक व्हिटॅमिन ई च्या कॅप्सुल्स त्वचेवर लावतात. डार्क सर्कल सुद्धा व्हिटॅमिन ई च्या मदतीने कमी होतात. बदामात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई असते. जे डार्क सर्कल कमी करण्यास मदत करतात. दररोज तुम्ही भिजवलेले बदाम खा.
संत्र

Diet for dark circle
व्हिटॅमिन सी त्वचेसाठी फायदेशीर असते. यामुळे त्वचेला ग्लो येते. संत्र्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असल्याने डार्क सर्कल दूर होण्यास मदत होते. त्याचसोबत स्किन ग्लो होण्यासाठी तुम्ही दररोज एका संत्र्याचे सेवन करू शकता. (Diet for dark circle)
हेही वाचा- Beauty Blender असा करा स्वच्छ
हिरव्या भाज्या

Diet for dark circle
शरीराला हेल्दी ठेवण्यााठी तुम्ही आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करावा. त्वचेसाठी सुद्धा हिरव्या भाज्या फायदेशीर ठरतात. जर तुम्ही पालक, मेथी सारख्या हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या तर डार्क सर्कल दूर होण्यास मदत होईल.