Home » Hotel : जाणून घ्या 5 स्टार आणि 7 स्टार हॉटेलमधला नेमका फरक

Hotel : जाणून घ्या 5 स्टार आणि 7 स्टार हॉटेलमधला नेमका फरक

by Jyotsna Kulkarni
0 comment
Hotel
Share

आपण जेव्हा कुठे बाहेर फिरायला जातो तेव्हा आपण फिरण्याचे प्लॅनिंग करण्यासोबतच कुठे राहायचे हे देखील बघत असतो. आता बाहेर गेल्यावर हॉटेलमध्येच राहणे योग्य असते. यासाठी आपण विविध हॉटेल्सची माहिती काढायला लागतो. आता जेव्हा जेव्हा आपण हॉटेल्सची माहिती काढतो तेव्हा आपल्याला हॉटेलच्या नावापुढे त्या हॉटेलला किती स्टार्स मिळाले आहेत हे देखील आपल्याला दिसते. ५ स्टार हॉटेल, ७ स्टार हॉटेल याबद्दल अनेकदा आपण ऐकत असतो. मात्र यात राहणे आपल्यासारख्या सामान्य माणसांना अजिबातच शक्य नसते. कारण या मोठ्या हॉटेलमध्ये राहण्याचा एक दिवसाचा खर्च म्हणजे आपल्या एका महिन्याच्या पगाराएवढा असतो. त्यामुळे आपण टीव्हीवर, व्हिडिओमध्ये, सिनेमांमध्येच असे आलिशान हॉटेल बघत असतो. (Marathi News)

५ स्टार हॉटेल्स आपल्याला कायम भुरळ घालत असतात. या हॉटेल्समध्ये ग्राहकांना मिळणाऱ्या सुविधा या स्वप्नवत असतात. मग जर ५ स्टार हॉटेल्सचे इतक्या भारी आणि आकर्षक सुविधा देत असतील तर ७ स्टार हॉटेलमध्ये काय काय सुविधा असतील असा प्रश्न कायम आपल्या भाबड्या मनाला पडत असतो. हॉटेलचे हे रेटिंग खरे तर, खोलीचा आकार, सुविधा, कर्मचारी, इंटिरियर या आधारावर ठरवले जाते. या दोन्ही हॉटेलमध्ये नक्की काय फरक असतो? याचे उत्तर तुम्हाला माहित आहे का? नाही चला मग जाणून घेऊया. (Top Stories)

हॉटेल्सना रेटिंग कसे मिळते?
प्रत्येक हॉटेल्सला स्टार रेट दिले जातात. मात्र हे रेटिंग कोण देते आणि एखाद्या हॉटेलला 5 स्टार किंवा 7 स्टार म्हणायचे हे कसे ठरवले जाते? जगात खूप कमी हॉटेल्स आहेत जी 7 स्टार आहेत. स्वत:ला 7 स्टार म्हणवणाऱ्या हॉटेल्समध्ये 5 स्टार हॉटेल्सपेक्षा अधिक आलिशान सुविधा दिल्या जातात. आग्राचा ताज फलकनुमा पॅलेस हे भारतातील एकमेव 7 तारांकित हॉटेल आहे. रूम, बाथरूम, लॉबी, रेस्टॉरंट, फूड, हेल्थ क्लब, स्विमिंग पूल इत्यादी सुविधांनुसार हॉटेलचे रेटिंग दिले जाते. (Marathi News)

कोणत्याही हॉटेलला 1 ते 5 स्टारपर्यंतचे स्टार दिले जातात. मात्र काही हॉटेलं पंचतारांकित अर्थात 5 स्टार हॉटेलांहूनही अधिक आलिशान सुखसोई देतात. त्यामुळेच त्यांची गणती ही सप्ततापरांकित अर्थात 7 स्टार हॉटेलांमध्ये केली जाते. पर्यटन विभागाची कमिटी हॉटेलला भेट देऊन सुविधांच्या आधारे हे रेटींग ठरवते. अधिकृतपणे, HRACC (भारत), AA किंवा Forbes सारख्या संस्था 1-5 स्टार देतात. 7 स्टार ही हॉटेल्सची स्वतःची जाहिरात असते. खरे तर 7 स्टार अशा प्रकारची अधिकृत श्रेणी नसते. पण काही हॉटेल्स त्यांच्या लक्झरी सुविधांच्या आधारे 7 स्टार हॉटेल असल्याचा दावा करतात. (Todays Marathi News)

Hotel

5 स्टार हॉटेलमध्ये मिळणाऱ्या सुविधा
* 24×7 रिसेप्शन आणि डोरमेन सर्विस
* वॅले पार्किंग, पेज बॉय सुविधा
* रुम सर्विस आणि इंटरनेट कनेक्शन
* पर्सनलाईज्ड वेलकम ड्रींक आणि मिनी बार
* उत्तम, प्रिमियम कटलरी
* स्पा, जीम, स्विमिंग पूल, गार्डन एरियात प्रवेश
* लॉन्ड्री, आयर्निंग, शू पॉलिश सेवा
* उशी निवडण्याचं स्वातंत्र्य, लिमोजिन पिकअप सेवा
* सुबक सजावट, ताज्या फुलांचा सुगंध आणि प्रीमियम भांडी (Latest Marathi Headline)

7 स्टार हॉटेलमध्ये मिळणाऱ्या सुविधा
* प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र रिसेप्शन आणि प्रायव्हेट चेक-इन
* सूटमध्ये जकूजी, रेन शॉवर आणि राजेशाही इंटिरियर्स
* वैयक्तिक २४x७ बटलर सर्विस
* रोल्स रॉयस, प्रायव्हेट लिमोझिन किंवा हेलिकॉप्टर ट्रान्सपोर्ट
* हेलिपॅड, पाण्याखालील रेस्टॉरंट अशा हाय-एंड सुविधा
* खास प्रायव्हसी आणि गेस्टसाठी सरप्राइज अनुभव (Top Trending News)

=======

ITR : इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे काय? ते भरण्याचे फायदे कोणते?

=======

एकूणच काय तर 5 स्टार हॉटेलमध्ये राहणे आणि तिथला अनुभव घेणे हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. कारण या हॉटेलमध्ये राहणे म्हणजे थोड्या काळासाठी का होईना मात्र एक आलिशान जीवन जगण्याचा कायमस्वरूपाचा अनुभव देते. 5 हॉटेलमध्ये कोणीही जाऊन राहू शकते. अर्थात त्याला तेवढा पैसा मोजावीच लागतो. मात्र 7 स्टार हॉटेल काही मोजक्या आणि निवडक लोकांसाठीच खास बनवली जातात. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.