पाकिस्तानची निर्मिती कोणत्या फॅक्टरवर झाली तर इस्लाम… त्यामुळे तिथल्या सगळ्या फिल्डमध्ये जास्त करून आपल्याला मुस्लिमच दिसतात. तशी हिंदू लोकसंख्या सुद्धा पाकिस्तानात बरीच आहे. पण हिंदूवर होणारे अत्याचार किंवा इतर गोष्टींमुळे हिंदू आणि शिखांची मोठी संख्या पाकिस्तानात निघून गेली. आता पाकिस्तानात मुस्लिमांचं वर्चस्व पहायचं झालं तर पाकिस्तान क्रिकेट टिमचंच उदाहरण घ्या. आता वैर जरी असलं तरी तुम्हाला पाक प्लेयर्सची नावं कुणी विचारली तर तुम्ही हमखास सांगणार… इम्रान खान, वसीम अक्रम, इंझमाम उल हक, शोएब अख्तर, शहीद आफ्रिदी, बाबर आजम वगैरे वगैरे… यामध्ये एक कॉमन काय… सगळेच मुसलमान… पण पाकिस्तानकडून फक्त मुस्लिमच प्लेयर्स खेळले आहेत का ? तर नाही… मुस्लीम खेळाडूंव्यतिरिक्त असे दोन हिंदू खेळाडू आहेत जे पाकिस्तानच्या टीमकडून खेळलेले आहेत आणि एकाने तर अनेक रेकॉर्ड्स सुद्धा केले आहेत. पण कोण आहेत हे खेळाडू जाणून घेऊ. (Pakistan Cricket)
तर पाकिस्तानच्या टीमकडून खेळलेले दोन हिंदू खेळाडू म्हणजे अनिल दलपत सोनवरिया आणि दानिश कनेरिया…! तसं कनेरियाचं नाव अनेकांनी ऐकलच असेल पण अनिल दलपत फारसे कोणाला माहिती नाहीत. एक खास गोष्ट म्हणजे दानिश कनेरिया या अनिल दलपत यांचाच भाचा आहे. अनिल दलपत हे पाकिस्तानकडून इंटरनॅशनल लेव्हलवर क्रिकेट खेळणारे पहिले हिंदू खेळाडू. हे मूळचे राजस्थानी आणि राहतात कराचीमध्ये… दलपत यांनी १९८४ मध्ये इंग्लंडविरुद्ध टेस्ट डेब्यू केला होता. विकेटकीपर बॅट्समन असणाऱ्या अनिल यांनी ९ टेस्ट मॅचमध्ये पाकिस्तानचं प्रतिनिधित्व करताना १६७ रन्स केले आहेत, ज्यात एका फिफ्टीसोबत २२ कॅचेस अन ३ स्टम्पिंग्सचा समावेश आहे. (Top Stories)
त्यांच्या वनडे करियरबद्दल बोलायचं झालं तर १९८४ मध्ये इंग्लंडविरुद्धच त्यांनी वनडे डेब्यू केला होता. १५ वनडेमध्ये पाकिस्तानचं प्रतिनिधित्व करताना त्यांनी ३७ रन्स केले. सोबतच १३ कॅचेससुद्धा पकडल्या होत्या. तसं अनिल दलपत यांचं इंटरनॅशनल करियर छोटसंचं राहिलं. १९८५ मध्ये त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध आपली शेवटची टेस्ट तर १९८६ मध्ये वेस्टइंडीज विरुद्ध शेवटची वनडे खेळली. रिटायरमेंटनंतर त्यांनी कॅनडाच्या टीमचं काही काळ कोच म्हणून काम पाहिलं. पुढे स्वतःचा बिझनेस सुरु केला आणि आज अनिल दलपत कॅनडामध्येच राहतात. (Pakistan Cricket)
दलपत यांच्यानंतर स्पिनर दानिश कनेरिया हा पाकिस्तानकडून खेळणारा दुसरा हिंदू खेळाडू. तशी दानिश ची कारकीर्द चांगली राहिली. २००० ते २०१० अशी १० वर्ष तो पाकिस्तानच्या टीममध्ये खेळला. दानिशने ६१ टेस्टमध्ये २६१ विकेट्स तर १८ वनडेमध्ये १५ विकेट्स पटकावल्या आहेत. पाकिस्तानकडून सर्वाधिक टेस्ट विकेट्स घेण्याच्या यादीत तो चौथ्या नंबरवर आहे. पाकिस्तानव्यतिरिक्त दानिश कौंटी क्रिकेटमध्येसुद्धा खेळला आहे. पण २०१० साली तो मॅच फिक्सिंगच्या रॅकेटमध्ये सापडला. त्याच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप लागल्यानंतर इंग्लंड & वेल्स क्रिकेट बोर्डाने दानिशला लाइफटाईम बॅन करून टाकलं. (Top Stories)
=================
हे देखील वाचा : Anna Mani : ओझोनचं रहस्य उलगडणारी वेदर वुमन ऑफ इंडिया!
=================
दानिशकडे तसं आणखी ५-६ वर्षांचं क्रिकेट करिअर शिल्लक होतं. यामध्ये त्याने निश्चितच अनेक रेकॉर्ड्स मोडले असते. पण स्वतःच्या चुकीमुळे त्याला मात खावी लागली. मॅच फिक्सिंगचे आरोप सुरुवातीला फेटाळून लावल्यानंतर ऑक्टोबर २०१८ मध्ये आपण त्या स्कॅन्डलमध्ये सहभागी होतो अशी कबुली दानिश यांनी दिली होती. आज दानिशला क्रिकेट सोडून १५ वर्ष झाली… पण या १५ वर्षात त्याने अनेक खुलासेसुद्धा केले होते. दानिशने मध्यंतरी एका मुलाखतीत सांगितलं होत की शाहिद आफ्रिदीने त्याला धर्मांतर करण्यासाठी जबरदस्ती केली होती. टीममध्ये असताना त्याच्यासोबत भेदभाव केला जात होता, तसेच हिंदू असल्यामुळे सर्व प्लेयर्स त्याला डीवचायचे, असंही त्याने सांगितलं. पाकिस्तान टीममध्ये असताना कधीच आदर मिळाला नाही. असे दानिश म्हणाला होता. पण यासोबत त्याने अजून एक गोष्ट सांगितली की, टीममध्ये इंझमाम उल हक आणि शोएब अख्तर हेच मला नेहमी सपोर्ट करायचे. इतर लोकं तर माझ्यासोबत जेवत सुद्धा नव्हते. (Pakistan Cricket)
अनिल दलपत आणि दानिश कनेरिया यांच्याव्यतिरिक्त आजपर्यंत एकही हिंदू खेळाडू पाकिस्तानकडून खेळला नाही. पण इतर धर्मांबाबत पहायचं झालं तर ४ ख्रिश्चन खेळाडू पाकिस्तानकडून खेळले आहेत. यामध्ये वालिअस मथिआस, एंताओ डिसूझा, डंकन शार्प आणि युसूफ योहाना हे आहेत. युसुफ योहाना यांनी पुढे इस्लाम धर्म स्वीकारला आणि ते मुहम्मद युसूफ झाले. तर एंताओ डिसूझा यांचा एक व्हिडिओ आम्ही मागे बनवला होता तो नक्की पाहा. पाकिस्तानच्या तुलनेत बांगलादेशकडून बरेच हिंदू क्रिकेटर्स खेळलेले आहेत. यामध्ये आलोक कपाली, धीमान घोष, लिटन दास, सौम्य सरकार असे बरेच आहेत आणि पुढेसुद्धा दिसतील. पण पाकिस्तानकडून हिंदूंचे खेळण्याचे चान्स सध्यातरी खूपच कमी दिसत आहेत…