Home » OYO ने अचानक नियम का बदलले ? कपल्सचं की ओयोचं नुकसान ?

OYO ने अचानक नियम का बदलले ? कपल्सचं की ओयोचं नुकसान ?

by Team Gajawaja
0 comment
Share

OYO हे नाव घेतलं की, आपल्या डोळ्यांसमोर एकच गोष्ट येते, ती म्हणजे कपल डेस्टीनेशन ! हो… कारण कपल्ससाठीच हे हॉटेल्स फक्त भारतात नाही जगात प्रसिद्ध आहेत. प्रेमात असणाऱ्या अनेकांना थोडीशी प्राय्वेसी हवीच असते, मग काय… ओयो जिंदाबाद ! पण आता अचानक ओयोने एक अजब निर्णय काढून रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या जोडप्यांसमोर एक संकटच उभं केलं आहे. हा निर्णय ओयोमध्ये येण्याच्या आधी आता मॅरेज सर्टिफिकेट दाखवण कंपल्सरी असणार आहे. याचा अर्थ आता फक्त लग्न झालेल्या कपल्सनाच ओयोवर जाता येणार आहे. पण मुळात कपल्ससाठीच फेमस असणाऱ्या या ओयोने हा निर्णय घेऊन स्वत:ला घाट्यात घालण्याचा चंग बांधलाय का? अशा प्रतिक्रिया सोशल मिडियावर उमटत आहेत. यामुळेच ओयो सध्या trending आहे, पण ही ओयो उभारली तरी कोणी… हॉटेल इंडस्ट्रीमध्ये ओयोने इतकं नाव कमावलं कसं जाणून घेऊ.

रितेश अग्रवाल…(Ritesh Agarwal) हे नाव तुम्ही क्वचितच ऐकलं असेल. याच ३१ वर्षाच्या तरुणाने ओयो हॉटेल्स सुरु केले होते, ज्याची फ्रेंचायजी आज जगात पोहोचली आहे. आज याच रितेशची एकूण संपत्ती १ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. OYO चा अर्थ होतो On Your Own ! त्याचं आधी नाव ठरवलं गेलं होत, ‘ओरावल’! सध्या ओयो ही भारतातली सर्वात मोठी स्टार्टअप कंपनी ठरली आहे आणि यासोबतच एक Multinational Hospitality चेन झाली आहे. २०१२ ला ओयोची स्थापना झाली होती. पण ओयो तयार व्हायच्या आधी जे घडलं, ते जाणून घेण फार महत्त्वाच आहे.

ओयो तयार करणाऱ्या रितेशचा जन्म १९९३ चा… family साधी सिंपल मिडल क्लास… पण आपला मुलगा इंजिनिअर व्हावा, असं त्यांना वाटत होत. त्यामुळे त्याला घरच्यांनी दहावीनंतर कोटाला पाठवलं. पण त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळ होत. नोकरीपेक्षा व्यवसाय जास्त फायदा मिळवून देतो. डोक्यावर कोणाचीच झंझट नाही. असं त्याला वाटायचं, त्याने दिल्ली गाठली, पण स्वतःच्या खिशातच पैसे नसताना व्यवसाय सुरु तरी कसं करायचा, हा प्रश्न त्याच्यासमोर होता. त्यामुळे त्याने आधी पैसे बिल्ड अप करायला सुरुवात केली आणि दिल्लीच्या रस्त्यांवर सीम कार्ड विकायला लागला. इथूनच आपण आता बिजनेसमन व्हाव, हे त्याने मनात पक्कं केलं.

यावेळी तो बिजनेसच्या काही गोष्टी शिकून घेत होता. त्याचं बिजनेस नॉलेज बघून २०१३ मध्ये रितेशची थीएल फेलोशिपसाठी निवड झाली होती, ज्यातून त्याला जवळपास ७५ लाख रुपये मिळाले. रितेश खुश… काहीतरी फायनान्स आलं म्हणून त्याने ठरवलं की, आपण hospitality management मध्ये काहीतरी करुया. आपल्याला मिळालेल्या पैशात रितेशने स्टार्टअप सुरू केलं, त्याने कपल्स रूम सुरू केल्या. खूप रिसर्च करून त्याने कंपनीच नाव Oreval Stays ठेवलं. या प्लॅटफॉर्मच्या मदतीने तो स्वस्त दरात हॉटेल बुकिंगची सोय उपलब्ध करून देत होता. पण त्याला अपेक्षेनुसार यश मिळत नव्हतं.

पण नंतर रितेशला कळल की, या नावासोबत लोकं जोडली जात नाहीयेत, त्यामुळेच आपण काहीतरी नवीन नाव सुचवूया आणि मार्केटमध्ये आलं ओयो  आणि त्यानंतर ओयोने आणि रितेश अग्रवालने कधीही मागे वळून पाहिलं नाही. २०१३ मध्ये सुरू झालेल्या या कंपनीने अवघ्या ८ वर्षांत घवघवीत यश मिळवल आणि आज ही ७५ हजार कोटींची कंपनी बनली आहे. तर स्वतः रितेश हा १६ हजार कोटींचा मालक आहे. ओयोचा बिजनेस जगातल्या ८० देशांमधल्या ८०० शहरांमध्ये पसरला आहे. आज ओयोचे जगात जवळपास १० लाख रूम्स आहेत. आज कपल्सपासून सर्वच पर्यटकांची ती पहिली पसंती बनली आहे. पण आता अचानक ओयोने एक असा निर्णय घेतला जो कपल्ससाठीही धक्कादायक होता.

कंपनीच्या नव्या नियमांनुसार अविवाहित कपल्सना आता Oyo हॉटेल्समध्ये एन्ट्री दिली जाणार नाही. हा नवा नियम उत्तर प्रदेशच्या मेरठमधून लागू करण्यात आला आहे. आणि यानंतर हा नियम संपूर्ण देशात लागू केला जाणार आहे. परंतु, Oyo कंपनीने हे पाऊल नेमकं कोणत्या कारणांमुळे उचलल, असा प्रश्न अनेकांना पडला असेलच… तर Oyo सर्वात जास्त रूम्स कपल्सलाच पुरवत, ज्यामुळे सोशल मीडियावर अनेक मिम्स व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत. ओयो केवळ कपल्स नाही तर पर्यटकांनाही रूम्स प्रोव्हाईड करतात. त्यामुळे आता मार्केटमध्ये ही इमेज न रहावी, असं ओयो management च म्हणण आहे. आणि हेच कारण आहे, ओयोने इतका मोठा निर्णय घेतला आहे.

================

हे देखील वाचा : केवळ एका रुपयात विमान प्रवास घडवून आणणारे G. R. Gopinath

================

त्यामुळे आता रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या कपल्सचं फेव्हरेट डेस्टीनेशन ओयो त्यांनाच रूम देणार नाही. आता लग्न न झालेले कपल्स ओयोमध्ये गेले की ओयो management तुम्हाला नक्कीच ‘ब्या हो गया है ? असं सरदार खानसारखं नक्कीच विचारतील. मात्र तरीही या निर्णयामुळे ओयोला मोठ्या नुकसानाला सामोर जावं लागेल, अशीही सोशल मिडीया आणि विविध platforms वर चर्चा आहे. पण यावर तोडगा काढण्यासाठीही ओयो management काही निर्णय घेईल का ? की हाच नियम कायमस्वरूपी लागू राहणार आहे, हे आता महत्त्वाच ठरेल.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.