Home » Diabetes ची राजधानी भारत !

Diabetes ची राजधानी भारत !

by Team Gajawaja
0 comment
Diabetes In India
Share

भारताची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई आहे. पण भारत सध्या Diabetes ची राजधानी म्हणून जगभरात चर्चेत आहे. कारण भारतात १०१ दशलक्ष लोकांना Diabetes हा आजार आहे. इंटरनॅशनल जर्नल ऑफ फूड सायन्स अँड न्यूट्रिशन यांनी पब्लिश केलेल्या एका स्टडीनुसार भारतात प्रत्येकी १० पैकी १ भारतीय Diabetes म्हणजेच मधूमेहाने ग्रस्त आहेत. २०४५ पर्यंत भारतातील Diabetes च्या रुग्णांचा आकडा १३५ दशलक्षावर पोहचण्याची शक्यता आहे. भारतात Diabetes चे रुग्ण वाढण्याचं कारण काय आहे? हे जाणून घेऊया. (Diabetes In India)

जेवल्यानंतर आपल्या पोटात अन्नातील कार्बोहायड्रेटचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होतं असतं, तेव्हा स्वादुपिंडात तयार होणाऱ्या इन्सुलिन या हॉर्मोनमुळे आपल्या शरीरातील पेशी हे ग्लुकोज शोषून घेतात आणि ऊर्जा तयार करतात. स्वादुपिंडातून इन्सुलिनचं पुरेसं उत्पादन न झाल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. जेव्हा आपल्या शरीरात इन्सुलिन कमी होते किंवा ते नीट काम करत नाही, तेव्हा पेशी रक्तातील साखरेचे प्रमाण शोषून घेण्यास असमर्थ होतात. या अवस्थेमुळे Diabetes होते. यात सुद्धा दोन प्रकार पडतात. एक टाइप १ Diabetes, ज्यामध्ये रुग्णाच्या स्वादुपिंडात इन्सुलिन तयार होणं थांबतं. तर टाइप २ या प्रकारात रुग्णाच्या स्वादुपिंडात इन्सुलिन तयार होतं नाही किंवा काम करत नाही. (Social News)

हे असं का होतं, याचा शोध अजूनतरी लागलेला नाही. आनुवंशिकता याला कारणीभूत मानलं जात. त्यासोबत, आता इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि मद्रास डायबिटीज रिसर्च फाउंडेशन यांच्या अंतर्गत झालेल्या क्लिनिकल ट्रायल आणि अभ्यासात असं लक्षात आलं की, काही विशिष्टप्रकारचे खाद्यपदार्थ पचनादरम्यान ग्लीकेशन प्रक्रियेतून जातात, तेव्हा हानिकारक एंड प्रॉडक्ट तयार होतात, जे Diabetes होण्यास किंवा Diabetes आणखी प्रबळ बनवण्यास कारणीभूत ठरतात. ज्यांना एजीई म्हणजे Advanced Glycation End Products म्हणतात. एजीई हे हानिकारक कंपाऊंड ग्लीकेशन दरम्यान शरीरात प्रोटीन आणि फॅट्स साखरेसह एकत्रित होऊन तयार होतात. (Diabetes In India)

हे एंड प्रोडक्टस तयार करणारे विशिष्ट खाद्यपदार्थ म्हणजे केक, चिप्स, तळलेले पदार्थ, मेयोनीज, अल्ट्रा प्रोसेस्ड पदार्थ. यासारख्या गोष्टी भारताला Diabetes राजधानी बनवण्यामागे असल्याचं समोर आलं आहे. हे पदार्थ खाण्याचं प्रमाण भारतात वाढल्यामुळे आणि निरोगी जीवनशैलीमुळे भारतात Diabetes रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भारतात १०१ दशलक्ष लोक मधूमेहासह जगत आहेत आणि १३६ दशलक्ष लोक मधुमेहपूर्व अवस्थेत आहेत. Diabetes ग्रस्त लोकांना हृदय विकाराचा झटका, Paralysis, अंधत्व, किडणी निकामी होणे यासारखे गंभीर परिणाम होऊ शकतात. (Social News)

======

हे देखील वाचा :  ‘हे’ पदार्थ खा आणि व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता करा दूर

======

एवढे धोके असूनही, ज्यांना हा आजार आहे त्यांच्यापैकी निम्म्या लोकांना याबाबत माहिती नसते. एवढा हानिकारक आजार होण्यापासून आपण स्वत:ला वाचूवू शकतो, ते आरोग्यदायी आहार आणि Active Lifestyle चा अवलंब करून  Processed Sugar असलेले पदार्थ आहारतून टाळून. चमचमीत चवीच्या मोहात बाहेरच अचरपचर खाऊन आपण स्वत:च आरोग्य बेचव करत आहोत. धावत्या रूटीनमुळे आपले खिसे भरत असतील, पण त्यामुळे आपल्या आरोग्याचे खिसे मोकळे होतं आहेत याकडे आपलं लक्षच नाहीये. आपल्या देशाला एखाद्या आजारची राजधानी म्हणून ओळखं मिळणं ही नक्कीच अभिमानाची गोष्ट नाहीये. त्यामुळे स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या निरोगी अन्न खा, निरोगी रहा. (Diabetes In India)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.