Diabetes Care : सकाळच्या नाश्तामध्ये हेल्दी पदार्थांचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते. यामुळे शरिराला उर्जा मिळते. मधुमेहाच्या रुग्णांनी खासकरुन आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावे. नाश्तामध्ये मधुमेहाच्या रुग्णांनी अशा पदार्थांचे सेवन करू नये ज्यामुळे ब्लड शुगर अचानक वाढली जाईल. नाश्तामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन, हेल्दी फॅट्स आणि फायबरचे प्रमाण पुरेसे असावे. जाणून घेऊया मधुमेहाच्या रुग्णांनी सकाळी उपाशी पोटी काय खावे आणि काय खाऊ नये…
लिंबाचा रस आणि आवळा
मधुमेहाच्या रुग्णांनी सकाळच्या नाश्तानंतर लिंबू आणि आवळ्याच्या ज्यूस प्यावा. खरंतर हे एक अल्काइन ड्रिंक असून यामुळे गट हेल्थ उत्तम राहते. याशिवाय पचनक्रियाही सुरळीत राहण्यास मदत होते.
दालचिनीचे पाणी
दालचिनीचा वापर चहा तयार करण्यासाठी केला जाते. पण दालचिनीच्या पाण्याचे मधुमेहाच्या रुग्णांनी सेवन केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते. ब्लड शुगरचा स्तर कमी ठेवायचा असल्यास सकाळी उपाशी पोटी दालचिनीचे पाणी प्यावे.
मोड आलेले मूग
ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यासाठी मोड आलेले मूग खाऊ शकता. यामुळे शरिराला भरपूर प्रमाणात प्रोटीन्सही मिळतील. मोड आलेल्या मूगामध्ये फायबरही उत्तम प्रमाणात असतात. (Diabetes Care)
मेथी दाण्याचे पाणी
मेथी दाण्याचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. मधुमेहाच्या रुग्णांनी मेथी दाण्याचे पाणी पायल्यास ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होईल. यासाठी रात्रभर एक चमचा मेथी दाणे भिजत ठेवून सकाळी त्याचे पाणी पिऊ शकता. याशिवाय भिजवलेले मेथीचे दाणेही खाऊ शकता.