Home » धोनीचा ‘तो’ गगनचुंबी षटकार होणार ऐतिहासिक!

धोनीचा ‘तो’ गगनचुंबी षटकार होणार ऐतिहासिक!

by Team Gajawaja
0 comment
MS Dhoni
Share

२ एप्रिल २०११… भारत-श्रीलंका फायनल…आणि क्रिकेटवेड्यांनी खचाखच भरलेला वानखेडे स्टेडियम ! सर्वांनी आपला श्वास रोखून धरला होता. श्रीलंकेचा गोलंदाज नुवान कुलसेकरा आपल्या ८व्या षटकाचा दुसरा चेंडू टाकण्यासाठी पुढे सरसावला आणि चेंडू थेट प्रेक्षकांमध्ये टोलावला गेला. शांतचित्त असलेली मनं अक्षरशः उत्सव साजरा करू लागली. भारतभर एकच विजयी जल्लोष सुरु झाला. समालोचक रवी शास्त्री यांच्या मुखातून निघालेले हे ऐतिहासिक शब्द भारतीय क्रिकेटविश्वाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी कोरले गेले, “Dhoni finishes off in style ! A magnificent strike into the crowd! India lift the World Cup after 28 years!”

भारताचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने (MS Dhoni) तो आयकॉनिक वर्ल्ड कप विनिंग षटकार फटकावला आणि भारताने दुसऱ्या क्रिकेट विश्वचषकावर आपली मोहोर उमटवली. तो सुवर्ण क्षण आजही प्रत्यके भारतीयाच्या स्मरणात आहे. या क्षणाला १२ वर्ष उलटून गेल्यानंतर एमसीएने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. धोनीचा गौरव करण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर एक स्मारक तयार करण्यात आले आहे. धोनीने गगनचुंबी षटकार मारल्यानंतर चेंडू ज्या ठिकाणी लँड झाला होता, त्याच जागी हे विजय स्मारक उभारले आहे.

आज ८ एप्रिल रोजी आयपीएल २०२३च्या मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स या सामन्यापूर्वी या मेमोरियलचे धोनीच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता आहे. आजपर्यंत अनेक क्रिकेटर्स आणि व्यक्तिमत्त्वाच्या नावाने क्रिकेट स्टँड आहेत, पण पहिल्यांदाच एखाद्या क्रिकेटरने मारलेल्या षटकाराच्या जागी स्मारक उभं राहणार आहे. या स्मारकाच्या उद्घाटनासह एमसीए धोनीचा सन्मानदेखील करणार आहे.

वानखेडे स्टेडियमवर सध्या नॉर्थ स्टँड, सुनील गावसकर पॅविलियन, विठ्ठल दिवेचा पॅविलियन, एमसीए पॅविलियन, ग्रँड स्टँड, गरवारे पॅविलियन, विजय मर्चंट पॅविलियन आणि सचिन तेंडुलकर स्टँड आहेत. त्यात आता धोनीच्या नावाचं हे स्मारक वानखेडेमध्ये उभं राहत आहे. यापूर्वीही आयसीसी आणि बीसीसीआयने धोनीचा गौरव केला आहे. त्यातच आता एमसीएनेही धोनीच्या सन्मानार्थ हे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

=======

हे देखील वाचा : WWE मधील असा कुस्तीपटू ज्याने ७३ लीटर बियर प्यायला

=======

धोनीच्या नेतृत्वात भारताने २००७ टी-२० विश्वचषक, २०११ क्रिकेट विश्वचषक, २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी तसेच २०१० आणि २०१६ आशिया कप जिंकण्याची कामगिरी केली आहे. विश्वचषक २०११च्या अंतिम सामन्यात धोनीने ७९ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह ९१ धावा केल्या होत्या, यासोबतच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच’देखील धोनीच ठरला होता.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.