Home » धीरेंद्र शास्त्रींवर येतोय ‘द बागेश्वर सरकार’ चित्रपट

धीरेंद्र शास्त्रींवर येतोय ‘द बागेश्वर सरकार’ चित्रपट

by Team Gajawaja
0 comment
Dhirendra Shastri
Share

धीरेंद्र शास्त्री अर्थात बाबा बागेश्वर सरकार (Dhirendra Shastri) यांचे नाव भारतातच नव्हे तर जगभर प्रसिद्ध झाले आहे. कथावाचक असलेले धीरेंद्र शास्त्री त्यांच्या अनोख्या स्टाईलनं आणि सडेतोड भूमिकांनी जेवढे प्रसिद्ध झाले आहेत, तेवढेच वादातही राहिले आहेत. असे असले तरी धीरेंद्र शास्त्री यांचे लाखो चाहते आहेत. त्याच्या कथावाचनासाठी अशीच लाखो भक्तांची गर्दी होते. यामध्ये परदेशातील भक्तांचाही मोठा सहभाग असतो. धीरेंद्र शास्त्री या आपल्या लाखो भक्तांपैकी काही भक्तांची नावं घेऊन त्यांना स्टेजवर बोलवतात आणि त्यांची अडचण काय आहे, हे त्यांनी न सांगताच एका कागदावर लिहून देतात. हनुमानाचे भक्त असलेले धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) आपल्या भक्तांना संकटापासून वाचण्याचा उपायही सांगतात.  त्यांच्या या अनोख्या दरबाराची माहिती सर्वदूर पसरली आहे. आता याच धीरेंद्र शास्त्रींवर ‘द बागेश्वर सरकार’ नावाचा चित्रपट येत आहे.  दिग्दर्शक विनोद तिवारी यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे.  

मध्यप्रदेशमधील धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Shastri) हे छतरपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक तीर्थक्षेत्र, बागेश्वर धाम सरकारचे महाराज आहेत. पंडित कृष्ण शास्त्री हे बागेश्वर वाले महाराज म्हणूनही ओळखले जातात. सध्या सर्व सोशल मिडीयावर बाबा बागेश्वर धाम यांची धूम चालू आहे. धीरेंद्र शास्त्री हे तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. कडवे हिंदुत्ववादी म्हणूनही त्यांची ओळख आहे. धीरेंद्र शास्त्री यांचे लाखो भक्त आहेत. त्यामध्ये अनेक सेलिब्रिटी आणि राजकारण्यांचाही समावेश आहे. धीरेंद्र शास्त्री यांच्या कथावाचनाचा कार्यक्रम परदेशातही होतो, आणि तेव्हाही हजारो भारतीय त्यांच्या कथेला हजेरी लावतात. याच धीरेंद्र शास्त्रींवर आता चित्रपट येत आहे. दिग्दर्शक विनोद तिवारी यांनी या चित्रपटाचे नाव  ‘द बागेश्वर सरकार’ असल्याचे सांगून चित्रपटाला धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) यांनी होकार दिल्याचे सांगितले आहे. बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री यांचा दरबार जिथे भरतो, त्या जागी आठ दिवस लाखो भक्तांची गर्दी होते. या भक्तांना बाबा आपल्या नावाची चिट्टी काढतील अशी आशा असते.  बाबा दरबारात मोजक्या भक्तांच्या नावानं चिट्टी काढतात. मात्र ज्या भक्तांची चिट्टी निघाली नाही, त्यांच्यासाठीही बाबा आपल्या प्रवचनातून अनेक उपाय सांगतात. अनेक भक्त त्यांना दैवी पुरुष मानतात. सध्या धीरेंद्र शास्त्री हे हिंदुत्वाचा सर्वात मोठा चेहरा म्हणून समोर आले आहेत.  भारत हिंदुराष्ट्र झाले पाहिजेत ही त्यांची प्रमुख मागणी आहे. त्यांची अनेक वक्तव्ये वादात सापडली आहेत. आता त्यांच्यावर येणा-या चित्रपटामध्येही त्यांची अशीच रोखठोक भूमिका मांडण्यात येते का? हे बघण्यासारखे आहे.   

नॉस्ट्रम एंटरटेनमेंट हब निर्मित बागेश्वर सरकार चित्रपट हिंदीसोबतच इतर भाषांमध्येही बनवला जाणार आहे. बागेश्वर सरकारचा गौरव आणि जगभरातील त्यांच्या अनुयायांचे प्रेम पाहून हा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतल्याचे दिग्दर्शक विनोद तिवारी स्पष्ट केले आहे.  

या चित्रपटात बागेश्वर धाम सरकारचे पीठाधीश्वर पूज्य धीरेंद्र शास्त्री यांच्या संघर्षाची कथा दाखवण्यात येणार आहे. लहानपणापासूनचा धीरेंद्र शास्त्रींचा (Dhirendra Shastri) प्रवास यात दाखवला जाईल. धीरेंद्र शास्त्री हिंदू धर्माच्या रक्षणासाठीही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत,  या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांची ही भूमिका अधिक लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.  

विनोद तिवारी यांचा लव्ह जिहादवर आधारित ‘द कन्व्हर्जन’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात विंध्या तिवारी, प्रतीक शुक्ला, रवी भाटिया आणि मनोज जोशी यांच्या भूमिका आहेत.  आता त्यांच्या बागेश्वर सरकार या चित्रपटात धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) यांची भूमिका कोण पार पाडणार ? हे अद्यापही स्पष्ट झाले नाही.  

==========

हे देखील वाचा : एकता कपूरने K वरुनच का सुरु केल्या होत्या सीरियल्स?

==========

मध्यप्रदेशमधील बागेश्वर धाम हे हनुमानाच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. बागेश्वर धाम ही अनेक तपस्वींची दैवी भूमी आहे. हनुमानाची कृपा आणि आशीर्वाद घेण्यासाठी येथे रोज हजारो भक्त येतात. श्री बालाजी महाराजांचे हे मंदिर मध्य प्रदेशातील गडा पोस्ट गंज जिल्हा छतरपूर गावात आहे. त्याच बालाजी गादीचे तरुण वारसदार म्हणून धीरेंद्र शास्त्री प्रसिद्ध आहेत. बागेश्वर धाम येथे रोज हजारो भक्त दर्शनासाठी येतात.  या श्री बालाजी मंदिरात या भक्तांसाठी अहोरात्र भंडारा चालवण्यात येतो. धीरेंद्र शास्त्री यांचे प्रवचन असेल तेव्हा भक्तांची संख्या लाखोंमध्ये जाते. आता त्याच धीरेंद्र शास्त्रींवर येणारा चित्रपट कसा असेल याची चर्चा भक्तांमध्ये सुरु झाली आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.