दिग्गज अभिनेते धर्मेंद्र सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असून चाहते ते बरे व्हावे यासाठी प्रार्थना करत आहेत. बॉलिवूडमधील अनेक कलाकार येऊन धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमध्ये पाहून गेले. ३१ ऑक्टोबर पाहून धर्मेंद्र हे ब्रीचकँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. आता त्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती समोर आली होती. धर्मेंद्र यांच्या निधनाची देखील बातमी समोर आली होती, मात्र त्यांच्या मुलीने ईशा देओलने आणि हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या निधनाच्या बातम्यांना अफवा सांगत सर्वांना फटकारले. सध्या धर्मेंद्र यांच्यावर उपचार सुरु असून, सर्वच त्यांच्या जलद रिकव्हरीबद्दल प्रार्थना करत आहे. (Marathi News)
दरम्यान धर्मेंद्र आणि हेमा मालिनी हे बॉलिवूडमधील अतिशय प्रसिद्ध कपल आहे. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. बॉलिवूडमधील आदर्श कपल म्हणून या दोघांकडे पाहिले जाते. १९८० साली हीमॅन धर्मेंद्र आणि ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी लग्न केले. मात्र आज ४५ वर्षांनी देखील हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचे लग्न अनेकदा चर्चेत येते. कारण धर्मेंद्र यांचे पहिले लग्न होऊन आणि त्यांना चार मुलं असून देखील त्यांनी हेमा मालिनी यांच्याशी दुसरे लग्न केले होते. यांची प्रेमकहाणी कायम बॉलिवूडमध्ये आणि माध्यमांमध्ये गाजत असते. (Dharmendra)
धर्मेंद्र त्यांच्या पहिल्या लग्नात चार मुलांचे वडील असताना, ते त्यांच्यापेक्षा १३ वर्षांनी लहान असलेल्या हेमा मालिनीच्या प्रेमात पडले. हा प्रवास तब्बल पाच वर्षे चालला आणि अखेरीस १९८० मध्ये त्यांनी लग्न केले, ज्यामुळे ही जोडी खऱ्या अर्थाने अमर झाली. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची व्यावसायिक भेट १९७० च्या सुमारास “तुम हसीन मैं जवान” या चित्रपटाच्या सेटवर झाली. मात्र, त्यांच्या प्रेमाची खरी सुरुवात झाली एका चित्रपटाच्या प्रीमियर शो दरम्यान. जवळपास पाच वर्ष त्यांनी एकमेकांना डेट केले. दोघे लपून छपून भेटत. पण हेमा मालिनी या दाक्षिणात्य ब्राम्हण तर धर्मेंद्र पंजाबी, विवाहीत, चार मुलांचे पिता होते. त्यामुळे हेमा मालिनी यांच्या आईचा या नात्याला विरोध होता. तर धर्मेंद्र यांना हेमा मालिनी यांच्यासोबतच लग्न करावयाचे होते. (Todays Marathi Headline)

धर्मेंद्र १९ वर्षांचे असतानाच त्यांच्या घरच्यांनी त्यांचे लग्न प्रकाश कौर यांच्याबरोबर लावून दिले होते. त्यांना चार मुलं होती. त्यानंतर धर्मेंद्र या इंडस्ट्रीमध्ये आले. संघर्ष करून सुपरस्टार अभिनेते देखील झाले. याच दरम्यान १९७० साली त्यांची भेट ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांच्याशी झाली आणि ते त्यांच्या प्रेमात पडले. तर दुसरीकडे अभिनेता जितेंद्रही हेमामालिनी यांच्यावर प्रेम करायचे. त्यांना देखील हेमा मालिनी यांच्या बरोबर लग्न करायचे होते. हीच संधी साधत धर्मेंद्र यांच्यापासून हेमा मलिनी यांना दूर करण्यासाठी त्यांच्या आईने जितेंद्र यांना हेमा मालिनीबरोबर विवाह करण्यास होकार दिला आणि आईच्या दबावापुढे झुकत हेमा मालिनीही जितेंद्र यांच्याबरोबर लग्नास तयार झाल्या. (Latest Marathi Headline)
जितेंद्र यांच्याशी हेमा मालिनी लग्न करणार हे कळताच धर्मेंद्र तडक हेमा मालिनी यांच्या घरी गेले आणि त्यांनी थेट हेमा मालिनी यांना त्यांच्यासोबत येण्यास सांगितले. त्यावेळी हेमा मालिनी यांना काय करावे सुचत नव्हते. त्यांना त्यांच्या आईला देखील दुखवायचे नव्हते आणि धर्मेंद्र यांना देखील सोडायचे नव्हते. हेमामालिनी यांच्या आईने त्यांना तू विवाहीत आहेस चार मुलांचा पिता आहेस. त्यांना सोडून तू माझ्या मुलीबरोबर लग्न करणार का असा प्रश्न विचारला यावर धर्मेंद्र यांनी लगेच हो उत्तर दिले आणि ते तिथून निघून गेले. (Top Trending News)
=========
Jewellery : लग्नसराईसाठी पारंपरिक दागिन्यांचे आकर्षक पर्याय
Kitchen Tips : पहिल्यांदा मातीची भांडी वापरताय…? मग करा ‘या’ टिप्स फॉलो
=========
त्यानंतर धर्मेंद्र यांनी पहीली पत्नी प्रकाश कौर हिला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. पण त्यांनी त्यांना नकार दिला. त्यानंतर धर्मेंद्र यांनी प्रकाश कौर यांना घटस्फोट न देताच हेमा मालिनी यांच्याशी २ मे १९८० रोजी जम्मू येथील एका मंदिरात हिंदू विधीनुसार लग्न केले. धर्मेंद्र यांनी इस्लाम धर्म स्वीकारून मग हेमा मालिनी यांच्याशी लग्न केल्याच्या केवळ अफवा असल्याचे अनेकदा सांगितले. त्यांनी कधीच इस्लाम स्वीकारल्याचे मान्य केले नाही. हेमामालिनी आणि धर्मेंद्र यांना ईशा आणि अहाना नावाच्या दोन मुली आहेत. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
