बॉलिवूडचा “ही-मॅन” अर्थात धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. धर्मेंद्र यांनी जवळपास सहा दशकांपेक्षा अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मुख्य म्हणजे अवघ्या काही दिवसातच येत्या ८ डिसेंबर रोजी ते आपला ९० वा वाढदिवस साजरा करणार होते. मात्र त्याआधीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला त्यांची प्रकृती बिघडली होती, आणि त्यानंतर लगेच त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल देखील करण्यात आले होते. तेव्हा देखील त्यांच्या निधनाच्या बातम्या आल्या होत्या. मात्र धर्मेंद्र यांच्या लेकीने ईशा देओलने या सर्व अफवा असल्याचे सांगितले होते. (Dharmendra)
मात्र आज २४ नोव्हेंबर सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दुपारी १२.३० वाजता त्यांचे पार्थिव विलेपार्ले इथल्या स्मशानभूमीवर आणण्यात आले. तिथेच त्यांच्या कुटुंबियांसह इंडस्ट्रीमधील अनेक दिग्गज उपस्थित होते. सनी देओलने त्यांच्यावर अंत्यसंकार केले. यावेळी अमिताभ बच्चन यांच्यासह सलमान खान, अमीर खान, अभिषेक बच्चन, शाहरुख खान आदी कलाकार उपस्थित होते. त्यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे त्यांना “ही-मॅन” असे टोपणनाव मिळाले होते. (Marathi News)
धर्मेंद्र यांनी अनेक एकसे बढकर एक चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांच्या ‘इक्किस’ हा शेवटचा चित्रपट येत्या २५ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. भारतीय सिनेसृष्टीतील महान अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांनी १९६० मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून कारकिर्दीची सुरुवात केली. प्रभावी अभिनयासोबतच अतिशय आकर्षक व्यक्तिमत्व त्यांना लाभले होते. इंडस्ट्रीमधील हँडसम अभिनेते म्हणून त्यांची खास ओळख होती. जवळपास २५० चित्रपटांमध्ये धर्मेंद्र यांनी भूमिका साकारल्या होत्या. रोमँटिक हिरोपेक्षा जास्त त्यांना ऍक्शन हिरो म्हणून अधिक लोकप्रियता मिळाली. (Todays Marathi Headline)

धर्मेंद्र कवल कृष्णा देओल अर्थात धर्मेंद्र यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ रोजी पंजाब राज्यातील लुधियाना जिल्ह्यातील नसराळी या छोट्या खेड्यात एका पंजाबी जट कुटुंबात झाला. त्यांचे त्यांच्या बालपणातील काळ हा जास्तकरून सहेनवाल नावाच्या गावात घालवला. त्यांचे वडील लुधियानामध्ये एका शाळेचे मुख्याध्यापक होते. धर्मेंद्र यांनी त्यांच्या इंटरमिजिएट शिक्षणासाठी फगवाडा येथील रामगढिया कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी १२ वी पर्यंत शिक्षण घेतले. त्यांना पुढे शिक्षण घ्यायचे होते, परंतु अभिनयाची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणूनच त्यांनी शिक्षण अर्धवटच सोडले. धर्मेंद्र यांना लहानपणापासून चित्रपटांबद्दल एक वेगळेच आकर्षण आणि प्रेम होते. त्यांना देखील चित्रपटांमध्ये काम करण्याची मोठी इच्छा होती. अशातच त्यांनी फिल्मफेयर मासिकाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय पातळीवर घेतल्या गेलेल्या टॅलेंट शोचे जेतेपद जिंकले. त्यानंतर त्यांनी चित्रपटांमध्ये काम करण्याच्या स्वप्नाने झपाटून थेट मुंबई गाठले. (Latest Marathi Headline)
मात्र मुंबईत आल्यानंतर धर्मेंद्र यांना समजले की, चित्रपटांमध्ये काम मिळवणे अजिबातच सोपे नाही. मात्र त्यांनी प्रयत्न सोडले नाही. अशातच त्यांना १९६० साली अर्जुन हिंगोरानी यांच्या ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. मात्र हा सिनेमा पुरता फ्लॉप ठरला आणि धर्मेंद्र यांना कोणी नोटीस देखील केले नाही. मात्र १९६१ साल हे धर्मेंद्र यांचे नशीब पलटवणारे ठरले. कारण याच वर्षी त्यांचा रमेश सहगल दिग्दर्शित ‘शोला और शबनम’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. धर्मेंद्र यांना अपेक्षित असणारे यश त्यांना या सिनेमाने मिळवून दिले. सोबतच लोकप्रियता आणि प्रसिद्धी देखील दिली. यानंतर १९६२ साली मोहन कुमार यांचा ‘अनपढ’, १९६३ साली बिमल रॉय यांच्या ‘बंदिनी’ या सिनेमांमुळे तर धर्मेंद्र स्टार म्हणून ओळखले जाऊ लागले. (Entertainment News)
धर्मेंद्र यांची लोकप्रियता दिवसागणिक वाढू लागली प्रत्येक दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेत्रीला त्यांच्यासोबत काम करायचे होते. त्यांचा प्रत्येक सिनेमा हिट होऊ लागला आणि धर्मेंद्र यांची जादू सगळ्यावर चालली. “शोले”, “सीता और गीता”, “धर्म वीर”, “यादों की बारात”, “चरस”, “चुपके चुपके”, “द बर्निंग ट्रेन”, “धर्मवीर”, “ड्रीम गर्ल”, “प्रतिज्ञा”, “लोफ़र”, “राजा जानी” आदी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. मुख्य म्हणजे वयाच्या ८९ व्या वर्षी देखील ते चित्रपटांमध्ये सक्रिय होते. पुढच्याच महिन्यात त्यांचा अखेरचा ‘इक्कीस’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. यासोबतच ते अनेकदा निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देणारे व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करायचे. त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ते ट्रॅक्टर चालवताना, शेती करताना आणि चाहत्यांना आयुष्याचे काही धडे देताना देखील दिसायचे. (Bollywood Life)
========
Mughals Capital : मुघलांनी आग्रा सोडून दिल्ली राजधानी का बनवली, वाचा ही 5 खास कारणे
========
धर्मेंद्र यांनी आपल्या जिवंत अभिनयामुळे चाहत्यांचे मन तर जिंकलेच सोबतच त्यांनी अगणित पुरस्कार देखील जिंकले. धर्मेंद्र यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक लहान मोठ्या पुरस्कारांनी सन्मानित कऱण्यात आले होते. २०१२ मध्ये, त्यांना भारत सरकारने पद्मभूषण, भारतातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला होता. १९९० मध्ये प्रदर्शित झालेल्या त्यांच्या “घायल” या सिनेमाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तर १९९१ मध्ये धर्मेंद्र यांच्या ‘घायल’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. १९९७ साली धर्मेंद्र यांना जीवनगौरव फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासोबतच ‘आयी मिलन की बेला, फूल और पत्थर, मेरा गाव मेरा देश, यादों की बारात, रेशम की डोरी, नौकर बीवी का, आणि बेताब या त्यांच्या चित्रपटांना फिल्मफेअर नामांकन मिळाले. १९७३ मध्ये त्यांनी आठ हिट चित्रपट दिले. १९८७ मध्ये त्यांनी नऊ हिट चित्रपट देऊन स्वतःचाच विक्रम मोडला होता. (social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
