Home » ‘धर्मवीर’ ठरला सर्वात मोठ्या ब्लॅाकबस्टरचा 50वा दिवस

‘धर्मवीर’ ठरला सर्वात मोठ्या ब्लॅाकबस्टरचा 50वा दिवस

by Team Gajawaja
0 comment
Dharmaveer
Share

हिंदी सिनेमांना गर्दी करणारे प्रेक्षक मराठी चित्रपटांकडे दुर्लक्ष करत असल्याचं बोललं जातं पण ‘धर्मवीर’ने (Dharmaveer) बॉक्सऑफिसवरच्या घवघवीत यशाने प्रेक्षक पुन्हा मराठी चित्रपटाकडे येऊ लागल्याचं सुखद चित्र दिसत आहे. अभिनेते प्रसाद ओक यांनी साकारलेल्या आनंद दिघे यांच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी आपल्या पसंतीची ठसठशीत मोहोर उमटवली आहे.

प्रविण तरडे यांच्या दमदार लेखन आणि कौशल्यपूर्ण दिग्दर्शनाने सजलेला, झी स्टुडिओज, मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्सची निर्मिती असलेला ‘धर्मवीर मु.पो. ठाणे’ हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमात अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे.

‘धर्मवीर’ (Dharmaveer) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील रिलीज झाला. आता या सिनेमाने नवा विक्रम केला आहे. ‘धर्मवीर’ सिनेमा 2022 मधला सर्वात मोठा सुपरहिट ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला आहे. हा सिनेमा प्रदर्शित होऊन 50 दिवसदेखील पूर्ण झाले आहेत. त्यामुळेच सिनेमाच्या टीमने खास पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

====

हे देखील वाचा: मराठी बिग बॉस विजेता विशाल निकम विठ्ठलभक्तीमध्ये तल्लीन

====

प्रसाद ओकने एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणाऱ्या क्षितिज दातेसोबतचा सिनेमातील एक फोटो शेअर करत लिहिले आहे,” 2022 मधला सर्वात मोठा सुपरहिट ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या सिनेमाला भरभरून प्रेम दिल्याबद्दल प्रेक्षकांचे मनापासून आभार”.

13 मे रोजी ‘धर्मवीर’ सिनेमा तब्बल चारशेहुन अधिक सिनेमागृहे आणि 10 हजारांहून अधिक शोजसह प्रेक्षकांच्या भेटीस आला. या सिनेमाने सिनेमागृहाबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड अभिमानाने झळकवले होते. अजूनही हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.