Home » धारावी पॅटर्न ‘जगात भारी’

धारावी पॅटर्न ‘जगात भारी’

by Correspondent
0 comment
Share

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीनं स्वंयशिस्त आणि योग्य ती खबरदारी बाळगून करोनावर नियंत्रण मिळवलं आहे. धारावीच्या मॉडेलची जगभरात चर्चा होत असताना आता जागतिक पातळीवरही धारावी पॅटर्नचं कौतुक होत आहे. काही दिवसांपूर्वीच जागतिक आरोग्य संघटनेनं धारावीती करोना स्थितीची दखल घेतल्यानंतर अमेरिकेतील अग्रगण्य वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टनंही स्तुती केली आहे.

वॉशिंग्टन पोस्ट हे जागतिक स्तरावरील प्रतिष्टित वृत्तपत्र असून ३१ जुलैला या वृत्तपत्रात धारावी पॅटर्नवर आधारित लेख प्रकाशित झाला होता. धारावीसारख्या दाट लोकवस्ती असणाऱ्या भागात करोनावर नियंत्रण मिळवला आहे. इतर देशांसाठीही हा महत्त्वाचा धडा असल्याचं या लेखात म्हटलं आहे. तसंच, पालिकेच्या कामाचंही कौतुक करण्यात आलं आहे. मुंबईतील करोनाबाधित रुग्ण, मृत्यूंची आकडेवारीबाबत पालिकेचं काम परिणामकारक आहे. धारावीसारख्या मोठ्या झोपडपट्टीत करोनाचा प्रसार रोखण्यास पालिकेला यश मिळालं असल्याचं कौतुकही या लेखात केलं आहे.

मुंबई महापालिकेचं आयुक्त इक्बाल चहल यांनीही धारावीकरांची व धारावीत अहोरात्र सेवा देणाऱ्या करोना योद्ध्यांची पाठ थोपटली आहे. तसंच, असं असलं तरी या यशामुळं हुरळून न जाता यापुढेही कोरोनाविरुद्धचा लढा सुरु राहील, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, ‘कोविड १९’ थोपवला जाऊ शकतो हे धारावीनं दाखवून दिलं आहे,’ असं WHO ने म्हटलं आहे. ‘मुंबईतील एक अत्यंत दाटीचा परिसर असलेल्या धारावीत प्रशासनानं अत्यंत नियोजनबद्ध काम केलं. लोकसहभागाचं एक उत्तम उदाहरण घालून दिलं. विषाणूची साखळी तोडण्यावर भर देण्यात आला. त्यासाठी स्वत:हून संभाव्य बाधितांचा शोध घेणं, त्यांची चाचणी करणं, विलगीकरण करणं आणि उपचार करणं हे उपाय वेगानं राबवण्यात आले. त्यातूनच धारावी भोवती पडलेला करोनाचा विळखा सैल झाला. असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.