Home » Lord Surya : जाणून घ्या धनु संक्रांती म्हणजे काय आणि तिचे महत्त्व

Lord Surya : जाणून घ्या धनु संक्रांती म्हणजे काय आणि तिचे महत्त्व

by Jyotsna Kulkarni
0 comment
Lord Surya
Share

संक्रांत म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर येते ती ‘मकरसंक्रांती’. जानेवारी महिन्यात येणारी संक्रांतच आपल्याला ओळखीची आहे. मात्र असे अजिबातच नाही. संक्रांती हा सूर्य उपासनेचा सण आहे आणि वर्षातून १२ वेळा साजरा केला जातो. वास्तविक, जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा या घटनेलाच संक्रांती म्हणतात. सूर्य एका वर्षात १२ वेळा राशी बदलतो. हा ग्रह एका राशीत सुमारे महिनाभर राहतो. अशा प्रकारे वर्षातून १२ वेळा संक्रांत साजरी केली जाते. ज्योतिषशास्त्रात सूर्याला नऊ ग्रहांचा राजा मानले जाते. १२ राशींमध्ये सूर्य सिंह राशीचा स्वामी आहे. धार्मिक परंपरेनुसार धनु संक्रांतीपासून ‘धनुर्मास’ सुरू होतो. या महिन्यात विष्णू उपासना, तुलसी पूजा आणि सकाळी लवकर देवपूजा करण्याची परंपरा आहे. (Lord Surya)

या महिन्यात सूर्य वृश्चिक राशीतून धनु राशीमध्ये प्रवेश करणार आहे. यालाच धनु संक्रांती असे म्हटले जाते. २०२५ मधील वर्षातील शेवटची संक्रांती धनु संक्रांती असणार आहे. ही धनु संक्रांती येत्या मंगळवारी अर्थात १६ डिसेंबर रोजी येत आहे. पंचांगानुसार, सूर्याचा धनु राशीत प्रवेश किंवा संक्रांतीचा मुहूर्त या दिवशी पहाटे ४.२७ वाजता आहे. १६ डिसेंबर रोजी सूर्य धनु राशीत प्रवेश करणार आहे. धनु संक्रांतीच्या दिवशी शुभ मुहूर्त सकाळी ०७.०९ ते दुपारी १२.२३ पर्यंत असणार आहे. यावेळी महापुण्य काळ सकाळी ०७.०९ ते ०८.५३ पर्यंत असेल. शुभ मुहूर्त पहाटे ०४.२७ वाजता असेल. (Marathi)

धनु संक्रांतीपासून खर्‍या अर्थाने हिवाळ्याची सुरुवात होते. दिवस थंड होऊ लागतात आणि वातावरण शांत, प्रसन्न बनते. या काळात स्नान, दान, जप, तप आणि व्रत यांना विशेष महत्त्व आहे. जेव्हा सूर्य गुरूच्या धनु किंवा मीन राशीत प्रवेश करतो तेव्हा खरमास किंवा मलमास सुरू होतो. खरमास लागताच शुभ कार्ये थांबतात. एक महिन्यासाठी शुभ कार्ये प्रतिबंधित आहेत. त्यामुळे या महिन्यात भगवान विष्णूची नित्य पूजा करण्याचे महत्त्व आहे. (Dhanurmaas) 

धनु संक्रांती ही केवळ भगवान सूर्याच्या राशी बदलाचे प्रतीक नाही तर तिचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व देखील आहे. पितृदोषाने ग्रस्त असलेल्यांनी या दिवशी त्यांच्या पूर्वजांची पूजा करावी. धनु संक्रांतीच्या दिवशी, योग्य विधींनी स्नान, दान आणि सूर्याची पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो. सूर्याचा शुभ प्रभाव तुमच्यावर पडतो आणि आजार बरे होतात. (Todays Marathi Headline)

Lord Surya

धनुर्मासाचा संपूर्ण महिना देवतांना समर्पित असल्याचे सांगितले जाते. सूर्योदयापूर्वी भल्या पहाटे ०४ ते ०६ या ब्रम्ह मुहूर्तातावर देवांची पूजाअर्चा, उपासना, आराधना, नामस्मरण करणे शुभ आणि लाभदायक ठरते, असे सांगितले जाते. या मासात विशेषत्वाने श्रीविष्णू, श्रीकृष्ण आणि सूर्यपूजन केले जाते. अध्यात्माची आवड असणाऱ्यांसाठी आध्यात्मिक प्रगती साध्य करण्यासाठी हा काळ पर्वणीचा असून, या कालावधीत पहाटे उठून मेडिटेशन, योग व प्राणायम करणे सर्वोत्तम मानले गेले आहे. (Marathi News)

धनुर्मासाच्या काळात पहाटेच्या वेळेला अर्थात ब्रह्म मुहूर्ताला ओझोन लेअर अतिशय शुद्ध असतो. शुद्ध ऑक्सिजनचे प्रमाण भरपूर असते. तसेच वातावरण प्रदूषणरहित, आल्हाददायक आणि उत्साहवर्धक असते. त्यामुळे पहाटे फिरावयास जाण्यास तसेच व्यायाम करण्याला अतिशय महत्त्व देण्यात आले आहे. धनुर्मासात सकाळी सर्वप्रथम सूर्याला अर्घ्य देऊन नैवेद्य अर्पण करावा. धनुर्मास हे महिनाभर आचरण्याचे व्रत आहे. आरोग्यशास्त्र आणि धर्मशास्त्र यांचा सुंदर मेळ या महिन्यात दिसतो, असे सांगितले जाते. (Marathi Trending Headline)

पौराणिक मान्यतांनुसार, या महिन्यात महापद्म आणि कर्कोटक नामक दोन नाग, आप आणि वात नामक दोन राक्षस, तार्क्ष्य आणि अरिष्टनेमि नामक दोन यक्ष, अंशु आणि भग नामक दोन आदित्य, चित्रांगद आणि अरणायु नामक दोन गंधर्व, सहा आणि सहस्या नामक दोन अप्सरा, क्रतु आणि कश्यप नामक दोन ऋषि सूर्याच्या रथासोबत मार्गक्रमण करतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. धनुर्मास कौशल्य आणि बौद्धिक चातुर्य वृद्धिंगत करण्यासाठी हा कालावधी उत्तम असल्याचे म्हटले जाते. (Top Stories)

धनुर्मासात विवाह, गृहप्रवेश, घर बांधणी, मुंडन, बारसे यांसारखी शुभकार्ये केल्यास त्याचे अनुकूल आणि लाभदायक परिणाम प्राप्त होत नाही, अशी मान्यता असल्यामुळे अशी शुभ कार्य या काळात केले जात नाही. मान्यतांनुसार, नवग्रहातील सात ग्रहांच्या ग्रहांच्या दुष्प्रभावाला दूर करण्याचे सामर्थ्य एका सूर्यात असते, असे सांगितले जाते. दक्षिणायन असताना सूर्याचे अंतरिक बल कमी होते. मात्र, उत्तरायणात सूर्याचे बल वाढते. त्यामुळे सूर्याची उपासना करणे शुभ लाभदायक आणि उपयुक्त मानले जाते. अनेकविध अडचणी, समस्या यांचे निराकरण सूर्योपासनेमुळे होऊ शकते, अशी मान्यता आहे. (Latest Marathi Headline)

संक्रांत हा सूर्यपूजेबरोबरच दान-पुण्याचा सण आहे. या दिवशी गरजू लोकांना धान्य, पैसे, कपडे, शूज आणि चप्पल, मुलांना शिक्षणाचे साहित्य, लहान मुलींना शृंगार वस्तू दान कराव्यात. शक्य असल्यास या दिवशी नदीत स्नान करावे. कुंडलीत सूर्याची स्थिती योग्य नसल्यास जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य ठीक नसेल तर त्याला कोणत्याही कामात सहजासहजी यश मिळत नाही. कष्ट करूनही तुम्हाला मान-सन्मान मिळत नाही. सूर्याचे दोष दूर करण्यासाठी रोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्यावे. रविवारी गुळाचे दान करावे. ऊँ सूर्याय नमः सूर्य मंत्राचा जप करावा. (Top Marathi News)

Lord Suryaसूर्यदेव हे शनि आणि यमदेवाचे पिता सूर्यदेव हे शनि, यमराज आणि यमुनेचे पिता आहेत. यमराज आणि यमुना ही सूर्य आणि संज्ञाची मुले आहेत, तर शनि सूर्य आणि छाया यांचे अपत्य आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव सूर्याला शत्रू मानतात. जर तुम्ही कठोर परिश्रम करत असाल आणि तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असेल किंवा कर्जासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर धनुसंक्रांतीच्या वेळी लाल कपडा घ्या आणि त्यात कापूरची छोटी गाठ बांधून ठेवा किंवा पूर्वेकडे बांधा. असे केल्याने तुमच्या घरात सुख-समृद्धी तर येईलच पण सूर्यदेवाची कृपाही होईल. (Top Marathi Headline)

धनुसंक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. त्यानंतर सूर्याला जल अर्पण करावे. असे केल्याने भगवान सूर्याची कृपा होते असे मानले जाते. या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप करावा. असे मानले जाते की, यामुळे तुमच्या समस्या दूर होतील आणि प्रगतीचा मार्ग खुला होईल. यासोबतच धनुसंक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करा. असे केल्याने धन-संपत्ती वाढते आणि घरात सुख-समृद्धी येते. शक्य असल्यास या दिवशी पवित्र नदीत स्नान करावे. यानंतर गरजूंना अन्न, पैसे आणि कपडे दान करा. असे केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो. या दिवशी गायत्री मंत्राचा जप केल्याने मन शांत होते आणि शुभ फल प्राप्त होते. (Top Trending News)

========

Tulsi Benefits : तुळशीची पाने आरोग्यासाठी वरदान, वाचा हे 5 भन्नाट फायदे

Vastutips : घरात घोड्याची नाल लावण्याने होतील चमत्कारिक फायदे

========

धनुसंक्रांतीच्या दिवशी भगवान सत्यनारायणाची कथा पाठ केली जाते. भूतान आणि नेपाळमध्ये या दिवशी तरुल म्हणून ओळखले जाणारे जंगली बटाटे खाण्याची प्रथा आहे. हंगामाच्या सुरुवातीच्या पहिल्या तारखेला लोक मोठ्या थाटामाटात ही संक्रांत साजरी करतात. सूर्य धनु राशीत आल्याने हवामानात बदल होऊन देशाच्या काही भागात पावसामुळे थंडीही वाढू शकते, असे सांगण्यात येत आहे. या दिवसाविषयी अशी श्रद्धा आहे की हा दिवस अत्यंत पवित्र आहे, त्यामुळे जो कोणी या दिवशी योग्य प्रकारे पूजा करतो, त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे नक्कीच दूर होतात आणि त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. (Social News)

(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.