Home » धनतेरसच्या दिवशी चुकूनही खरेदी करू नका ‘ही’ भांडी

धनतेरसच्या दिवशी चुकूनही खरेदी करू नका ‘ही’ भांडी

हिंदू धर्मात दिवाळीला प्रमुख सणांपैकी एक मानले जाते. दिवाळी येण्यापूर्वी लोक घराची स्वच्छता आणि खरेदी करण्यामागे लागतात. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक वर्षी दिवाळी कार्तिक महिन्यातील अमावस्या तिथीला साजरी केली जाते.

by Team Gajawaja
0 comment
Dhanteras 2023
Share

हिंदू धर्मात दिवाळीला प्रमुख सणांपैकी एक मानले जाते. दिवाळी येण्यापूर्वी लोक घराची स्वच्छता आणि खरेदी करण्यामागे लागतात. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक वर्षी दिवाळी कार्तिक महिन्यातील अमावस्या तिथीला साजरी केली जाते. यंदा दिवाळी १२ नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे. दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मी हिची पूजा केली जाते. या महत्त्वपूर्म सणाची सुरुवात धनतरेसपासून होऊन भाऊबीजेला संपतो. (Dhanteras 2023)

पाच दिवसांच्या या दिव्यांच्या सणाची सुरुवात धनतरेसपासून होते. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला धनतेरस साजरी केली जाते. या दिवशी यमराज, धनाची देवता कुबेर आणि आयुर्वोदाचार्य III यांच्या पुजेचे विशेष महत्त्व आहे. यंदा धनतेरसचा सण १० नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे,

धनतेरसच्या दिवशी लोक खरेदी करतात. असे मानले जाते की, या दिवशी खरेदी केल्याने देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतात. त्यामुळे धनतेरसच्या दिवशी कोणत्या वस्तूंची खरेदी करू नये याच बद्दल जाणून घ्या.

स्टीलची भांडी
धनतेरसच्या दिवशी भांडी खरेदी करण्याची जुनी परंपरा आहे. बहुतांश घरांमध्ये ज्या भांड्यांचा वापर केला जातो त्यामध्ये पितळ, तांबे आणि स्टील सारखी भांडी असतात. पण धनतेरसच्या दिवशी चुकूनही स्टीलची भांडी खरेदी करू नका. ती राहु कारक असतात आणि दुर्भाग्य घेऊन येतत. त्यामुळे धनतेरसच्या दिवशी जर भांडी खरेदी करायची असतील तर पितळेची किंवा ताब्यांची भांडी खरेदी करा. ही भांडी धनतेरसला खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते.

चीनी आणि मातीची भांडी
दिवाळीच्या दिवसात घराची सजावट करण्यासाठी चीनी आणि मातीची भांडी वापरली जतात. ही भांडी दिसण्यास फार सुंदर दिसतात. पण धनतेरसच्या दिवशी चीनी किंवा मातीची भांडी खरेदी करू नये. ती खरेदी करणे अशुभ मानले जाते. असे मानले जाते यामुळे घरातील संपन्नता कमी होते. (Dhanteras 2023)

काच आणि प्लास्टिकची भांडी
धनतेरसच्या दिवशी चुकूनही काच किंवा प्लास्टिकची भांडी खरेदी करू नका. ही भांडी खरेदी करणे अत्यंत अशुभ मानले जाते. ती खरेदी केल्याने तुमच्या घरात समृद्धी आणि संपन्नता वाढत नाही. असे मानले जाते की, काचेवर राहुचा प्रभाव असतो. त्यामुळे धनतेरसच्या दिवशी काच किंवा प्लास्टिकची भांडी खरेदी करण्यापासून दूर रहावे. धनतेरस सोडून अन्य दिवशी तुम्ही ही भांडी खरेदी करू शकता.

एल्युमिनिअमची भांडी
एल्युमिनिअमला राहु मानले जाते. त्यामुळे धनतेरसला अशी भांडी खरेदी करू नये. यामुळे घरात दुर्भाग्य प्राप्त होते आणि देवी लक्ष्मी नाराज होते.


हेही वाचा-  यंदा दिवाळी 11 की 12 नोव्हेंबर? जाणून घ्या शुभ मुहूर्त


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.