हिंदू धर्मात दिवाळीला फार मोठे महत्व दिले जाते. या सणाची सुरुवातच धनतेरस पासून होते आणि भाऊबीज या दिवशी संपते. धनतेरसच्या दिवशी सर्व लोक धनाची देवता कुबेर आणि देवी लक्ष्मी हिची पूजा करतात. धनतेरसला धनत्रयोदशी असे सुद्धा म्हटले जाते. हा दिवस दिवाळीच्या दोन दिवस आधी येतो. याच दिवसापासून दिवाळीला सुरुवात होते. या दिवशी मोठ्या भक्तिभावाने पूजा-अर्चना केल्यास घरात सुख-शांती कायम राहते आणि घरातील सदस्यांवर धनाचा वर्षाव होत राहतो. मात्र लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवाळी पहाट असते. म्हणजेच पहिली अंघोळ असते. पहाटे उठून घरासमोर रांगोळी, तोरणे लावतात. तर घरात गोडाचा पदार्थ आणि घरात केलेला फराळ हा देवाला दाखवला जातो. सर्वत्र आनंदाचे वातावरण या दिवाळीच्या दिवसात दिसून येते. दिवाळीचे सर्व दिवस हे अत्यंत शुभ मानले जातात. धनतेरसच्या दिवशीच्या काही मान्यता आहेत. त्यानुसार काही लोक भांडी खरेदी करतात तर काही जण चांदीच्या वस्तू घरात आणतात. असे करणे शुभ मानले जाते. मात्र धनतेरसच्या दिवशी नवी झाडू सुद्धा खरेदी केली जाते. तर जाणून घेऊयात याचबद्दल अधिक. (Dhanteras 2022)
धनतेरसच्या दिवशी नव्या झाडूचे महत्व
पौराणिक मान्यतानुसार, धनतेरसच्या दिवशी जी काही वस्तू खरेदी केली जाते त्यामध्ये १३ पटींनी वाढ होते. धनतेरसच्या दिवशी झाडू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. तर मत्स्य पुराणात झाडूला देवी लक्ष्मीचे रुप मानले जाते. या दिवशी झाडू खरेदी केल्याने सुख-शांति आणि धनात वाढ होते असे म्हटले जाते. असे ही मानले जाते की, झाडू घरातील दारिद्र दूर करते.
अशी सुद्धा आहे मान्यता
धनतेरसच्या दिवशी झाडू खरेदी करण्यासंदर्भात अशी सुद्धा मान्यता आहे की, असे केल्याने देवी लक्ष्मी घर सोडून जात नाही. तसेच काही लोक असे मानतात की, या दिवशी नवी झाडू घरात आणल्यानंतर जुन्या कर्जांपासून मुक्ति मिळते आणि घरात सकारात्मतेची वाढ होते. (Dhanteras 2022)
हे देखील वाचा- दिवाळीत घरी आवर्जून आणतो ‘ही’ वस्तू
‘या’ गोष्टींची सुद्धा करु शकता खरेदी
धनतेरसच्या दिवशी सोन्यासह चांदीच्या सामानाची सुद्धा खरेदी करणे शुभ मानले जाते. काही लोक या दिवशी नवे कपडे खरेदी करतात. जर तुम्ही एखादे नवे वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर धनतेरसचा दिवस यासाठी फार उत्तम आहे.
तसेच धनतेरसच्या दिवशी काही गोष्टी खरेदी करणे सुद्धा तुम्हाला महागात पडू शकते. त्यानुसार लोखंडी, अॅल्यूमिनियमची वस्तू खरेदी करु नये, यामुळे घरात दुर्भाग्याचा प्रवेश होऊ शकतो. आणखी महत्वाचे म्हणजे या दिवशी काळ्या रंगाचे कपडे सुद्धा परिधान करु नयेत.