बांगलादेशात स्वातंत्र्यसैनिकांच्या वंशजांना सरकारी नोकऱ्यांमध्ये ३० टक्के आरक्षण देण्यात आले होते. याविरोधात आंदोलन उभे राहिले. यात विद्यार्थ्यांचा वाटा मोठा होता. सुरुवातीला लहान वाटत असलेल्या या आंदोलनानं अवघा बांगलादेश ताब्यात घेतला. परिणामी बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे. आंदोलकांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानावर ताबा मिळवला आहे. शेख हसीना यांनी बांगलादेश सोडला. आता बांगलादेशवर मोहम्मद यूनुस यांचे राज्य येणार आहे. (Students Of Dhaka University)
एका विद्यार्थी आंदोलनाची परिणीती अशी झाली की शेख हसीना यांना त्यांची १५ वर्षाची सत्ता अवघ्या ४५ मिनिटात सोडावी लागली. फक्त सत्ताच नाही तर नेसत्या कपड्यानिशी देश सोडण्याची वेळ शेख हसीना यांच्यावर आली. या सर्वांमागे बांगलादेशचे विद्यार्थी आंदोलन आहे. बांगलादेशमधील सर्वात जुने आणि प्रतिष्ठित ढाका विद्यापीठ त्यामळे चर्चेत आले आहे. याच विद्यापिठामधून आरक्षणाविरोधात विद्यार्थी आंदोलन सुरु झाले आणि त्याच्या आगीत शेख हसीना यांची सत्ता संपुष्ठात आली. बांगलादेशच्या या ढाका विद्यापीठाचा आणि विद्यार्थी आंदोलनाचा इतिहास जुना आहे. (Students Of Dhaka University)
१९७१ च्या युद्धाचा आणि बांगलादेशात झालेल्या सत्तापरिवर्तनाचा जवळचा संबंध आहे. १९७१ च्या युद्धानंतर बांगलादेशला पाकिस्तानपासून १९७२ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. यात बांगलादेश सरकारने स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 30 टक्के आरक्षण दिले. याच आरक्षणाविरोधात बांगलादेशात आंदोनल छेडण्यात आले. साधारण १५ जुलै रोजी ढाका विद्यापीठातील विद्यार्थी रस्तावर उतरले. विद्यार्थी आंदोलनात ढाका विद्यापीठ कायम पुढे असते. याच ढाका विद्यापिठातील विद्यार्थ्यांनी आरक्षणाविरोधात लढा उभारल्यानं त्याला व्यापक स्वरुप आले. ढाका विद्यापीठ हे चळवळीसाठी ओळखले जाते. बांगलादेशचे अनेक नेतेही या आंदोलनांतून पुढे आले आहेत. या सर्वांचा सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाविरोधातील आंदोलनाला अप्रत्यक्ष पाठिंबा मिळाला. आणि हे आंदोलन व्यापक झाले. ढाका विद्यापीठाच्या नाहिद इस्लाम या विद्यार्थ्यांनं त्यात पुढाकार घेतला. येथून अन्य विद्यार्थी आंदोलनाच्या मागे उभे राहिले. परिणामी आता बांगलादेशची सत्ता मोहम्मद यूनुस यांच्या हातात गेली आहे.(Students Of Dhaka University)
ज्या ढाका विद्यापीठानं बांगलादेशाच्या उभारणीत अनेक नेते, समाजवादी आणि अर्थतज्ञ दिले आहेत, त्याची उभारणी ही भारताच्या पुढाकारातून झाली आहे. तेव्हा बांगलादेश हा पूर्व बंगालचा भाग होता. म्हणजेच संयुक्त भारताचा एक भाग असतांना बांगलादेशमध्ये या ढाका विद्यापीठाची उभारण जाली. ३१ जानेवारी १९१२ रोजी नवाब सलीमुल्ला, नवाब सय्यद नवाब अली चौधरी आणि शेर-ए-बंगाल ए.के. फजलुल हक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ढाका येथे व्हाइसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज यांची भेट घेतली. त्यांनी ढाक्यात विद्यापीठाची स्थापना करण्याची मागणी व्हाइसरॉय यांच्याकडे केली. त्यानुसार सर रॉबर्ट नॅथॅनियल यांच्या अध्यक्षतेखाली तेरा सदस्यांची समिती नेमण्यात आली. यालाच नाथन समिती म्हणून ओळखले जाते. १९२० मध्ये ढाका विद्यापीठ कायदा गालच्या भारतीय विधान परिषदेत मंजूर झाला. (Students Of Dhaka University)
त्यानंतर १९२१ मध्ये या विद्यापीठाची पायाभरणी झाली. विद्यापीठाची स्थापना झाली, तेव्हा हे विद्यापीठ भारतातच होते. कारण तेव्हा स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती झाली नव्हती. आता हे विद्यापीठ बांगलादेशातील सर्वात जुने सार्वजनिक संशोधन विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. यात ५० हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून २ हजार प्राध्यापक आहेत. नवाब बहादूर सर ख्वाजा सलीमुल्ला यांनी ढाका विद्यापीठाच्या स्थापनेत प्रमुख भूमिका बजावली आहे. त्यांनी आपली ६०० एकर जमीन विद्यापीठासाठी दान केली. (Students Of Dhaka University)
==============
हे देखील वाचा : शेख हसीनांच्या सिंहासनाला हादरा देणारे तिन खांब !
===============
भारताच्या फाळणीनंतर ढाका विद्यापीठ हे पाकिस्तानमधील पुरोगामी आणि लोकशाही चळवळींचे केंद्रबिंदू बनले होते. बंगाली राष्ट्रवादाचा उदय आणि १९७१ मध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र्यामध्ये येथील विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या विद्यापीठातून आलेल्या विद्यार्थ्यांनी बांगलादेशाच्या उभारणीमध्ये आणि विकासामध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यात सत्येंद्र नाथ बोस, बोस-आईनस्टाईन सांख्यिकी, नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस, मुहम्मद शहिदुल्ला, नाटक गुरू नुरुल मोमेन ढाका यांचा समावेश आहे. आता शेख हसीना विरुद्धही याच ढाका विद्यापीठातून आंदोलन सुरु झाले. विद्यापीठाच्या नाहिद इस्लाम या विद्यार्थ्यांचा त्यात पुढाकार होता. आणि याच विद्यापीठाचे माजी विद्यार्थी मुहम्मद युनूस यांच्या हाती बांगलादेशाची सत्ता गेली आहे. (Students Of Dhaka University)
सई बने