देशभर सध्या छटपूजा उत्साहात सुरु आहे. छठ पूजेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यात सूर्य आणि नदीची पूजा करण्यात येते. या उत्सवात भगवान सूर्याच्या पूजेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळेच बिहारच्या औरंगाबाद येथील सूर्य देव मंदिरात भाविकांनी मोठी गर्दा केली आहे. बिहारचे हे मंदिर देशात जी मोजकी सूर्यमंदिरे आहेत, त्यापैकी प्रमुख आहे. या मंदिराची वास्तुकला प्रसिद्ध आहे. पण त्याचे आणखी एक वैशिष्ट भाविकांना आकृष्ट करते. सूर्य मंदिरे सामान्यतः पूर्वेकडे तोंड करून असतात, मात्र बिहारच्या औरंगाबाद येथील हे सूर्यमंदिर पश्चिमेकडे तोंड करून आहे. पश्चिमेकडे तोंड करून असलेली मंदिरे छठ पूजेच्या वेळी शुभ मानली जातात कारण, संध्याकाळी अर्ध दरम्यान सूर्याची किरणे थेट मंदिरात प्रवेश करतात. त्यामुळे येथे पूजा करणे शुभ मानले जाते. औरंगजेबाने या मंदिरावर हल्ला केला तेव्हा मंदिराने स्वतःच त्याचे मुख्य प्रवेशद्वार पश्चिमेकडे वळवले, अशी आख्यायिकाही या मंदिराबाबत आहे, त्यामुळे अत्यंत जागृत अशा या मंदिरात छठ पुजेसाठी आता महिलांना गर्दी केली आहे. (Devark Mandir)

बिहारच्या औरंगाबादमधील सूर्यमंदिराबाबत अनेक वैशिष्टे आहेत. हे सूर्य मंदिर देव सूर्य मंदिर किंवा देवार्क सूर्य मंदिर म्हणूनही ओळखले जाते. देवार्क सूर्यमंदिराचे प्रमुख वैशिष्ट म्हणजे, येथील अद्वितीय वास्तुकला. हे संपूर्ण मंदिर काळ्या दगडात कोरण्यात आले आहे. इतिहासकारांचा अंदाज आहे की, मंदिराचे बांधकाम सहाव्या ते आठव्या शतकादरम्यान करण्यात आले आहे. या मंदिराबाबत असलेल्या एका आख्यायिकेनुसार भगवान श्रीकृष्णाचा मुलगा सांब, याने या मंदिराची उभारणी केली आहे. सांब याने एकूण बारा सूर्य मंदिरे बांधली होती. त्यापैकी देवार्क हे प्रमुख मंदिर आहे. याशिवाय देवी आदितीशी देखील हे देवार्क मंदिर संबंधित असल्याचे सांगण्यात येते. जेव्हा देव-असुर युद्धात देवांचा राक्षसांनी पराभव केला, तेव्हा देवी अदितीने देवरायणातील छठीमैयाला सर्व गुणांनी संपन्न असा तेजस्वी पुत्र मिळावा अशी प्रार्थना केली. त्यानंतर अदितीने एका पुत्राला जन्म दिला. त्याला भगवान आदित्य असे गौरवण्यात आले. याच आदित्यने देवतांना राक्षसांवर विजय मिळवून दिला. तेव्हापासूनच देवतांची देवी षष्ठी देवी यांच्या नावावरून या मंदिराचे नाव देव ठेवण्यात आले आणि छठ उत्सव सुरू झाला असेही सांगितले जाते. (Social News)
त्यामुळेही छठ पर्वादरम्यान या मंदिरात भगवान सूर्याची पूजा कऱण्यासाठी मोठी गर्दी होते. या देवार्क सूर्य मंदिरात छठ पूजेसाठी गर्दी होत असली तरी वर्षाचे बाराही महिने या मंदिरात भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित असतात. विशेषतः रविवारी, येथे मोठा हवन करण्यात येतो. या हवनामध्ये सहभागी होण्यासाठी देशभरातून भाविक मंदिरात येतात. या होमहवानामध्ये सामिल झालेले भाविक आपल्या मनातील इच्छा पूर्ण झाल्याचे आनंदाने सांगतात. लोलार्क सूर्य मंदिर वाराणसी, कोणार्क सूर्य मंदिर आणि देवार्क सूर्य मंदिर ही भारतीय वास्तुकलेचा प्रगत नमुना ठरली आहेत. या मंदिरांची स्थापना नेमकी कुठल्या उद्देशानं झाली, हे कायम गुढ राहिले आहे. मात्र या मंदिरांच्या स्थापनेमागे ज्या आख्यायिका आहेत, त्यात अनेक लोककथांचा समावेश आहे. त्यातील एका लोककथेनुसार एकदा, भगवान शंकराचे भक्त, माली आणि सोमाली सूर्यलोकात जात होते. यामुळे भगवान सूर्य क्रोधीत झाले. त्यांनी या दोघांना जाळून टाकण्यास सुरुवात केली. (Devark Mandir)

त्यावेळी माली आणि सोमालींनी भगवान शंकराची प्रार्थना केली. आपल्या भक्तांवर आलेल्या या संकटानी भगवान शंकरही क्रोधीत झाले. त्यांनी सूर्यावर आपले शस्त्र फेकले. यातून सूर्याचे तीन तुकटे जमिनीवर पडले. असे म्हटले जाते की, सूर्याचे तुकडे ज्या ठिकाणी पडले तिथे सूर्य मंदिरे उभारण्यात आली. या तीन जागा म्हणजे, बिहारजवळील देवार्क देव, काशीजवळील लोलार्क सूर्य मंदिर आणि कोणार्कजवळील कोणार्क सूर्य मंदिर. यातील देवार्क सूर्य मंदिराचा दरवाजा पश्चिमकडे आहे. याबाबत औरंगजेबाची कथा सांगितली जाते. एकदा औरगंजेब आपल्या सैन्यासह या मंदिर परिसरात आला आणि मूर्ती तोडू लागला. तेव्हा मंदिरातील पुजा-यांनी त्याला मुर्ती आणि मंदिर फोडू नका, अशी विनंती केली. तेव्हा औरंगजेबानं तुमच्या देवतेमध्ये खरोखरच काही शक्ती असेल तर तोंड पूर्वेकडून पश्चिमेकडे वळले पाहिजे, मग मी मंदिर नष्ट करणार नाही, असे सांगितले. त्यानंतर येथील पुजारी रात्रभर देवतांची प्रार्थना करत राहिले. पहाटेच्या सुमारास या मंदिराचे दरवाजे खरोखरच पूर्वेकडून पश्चिमेकडे वळले. हा चमत्कार पाहून औरंगजेब आपल्या सैन्यासह परत गेला. (Social News)
=======
हे देखील वाचा : Rohit Arya : १७ मुलांना ओलीस ठेवणारा किडनॅपर रोहित आर्य आहे तरी कोण? काय आहे संपूर्ण प्रकरण
=======
सध्या या देवार्क सूर्य मंदिरासंदर्भात संशोधन सुरु आहे. मंदिर परिसरात पाली लिपीमध्ये लिहिलेल्या शिलालेखांचा अभ्यास तज्ञांकडून करण्यात येत आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारही शिलालेख असून त्यामध्ये मंदिरातील वास्तूकलेसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. या मंदिराची वास्तुकला ओरिसातील कोणार्क सूर्य मंदिरासारखी आहे. देवार्क मंदिर दोन भागात बांधले गेले आहे. एकाभागात गर्भगृह असून त्यावर कमळाच्या आकाराचे शिखर आहे आणि शिखराच्या वरही आणखी एक सोनेरी शिखर आहे. दुसरा भाग मुखमंडप आहे. याच्यावर पिरॅमिड छत आहे. छताला आधार देणारे कोरीव दगडी खांब आहेत. अनेक वर्षानंतरही हे मंदिर मजबूत स्थितीत आहे, यामुळेच याच्या वास्तुकलेचा आता अभ्यास होत आहे. (Devark Mandir)
सई बने
