एकादशी तिथीला मोठे महत्त्व आहे. एका वर्षात २४ एकादशी येतात. या सर्वच एकाद्शीण मोठे महत्त्व असते, मात्र त्यातही या २४ पैकी दोन एकादशींना जरा जास्त महत्त्व देण्यात आले आहे. या दोन एकादशी म्हणजे आषाढी एकादशी अर्थात देवशयनी एकादशी आणि दुसरी म्हणजे कार्तिकी एकादशी अर्थात देव उठणी एकादशी. यातली आषाढी एकादशी ही आषाढ महिन्यात येते तर कार्तिकी एकादशी कार्तिक महिन्यात येते. आता लवकरच कार्तिकी एकादशी येत आहे. दिवाळी झाल्यानंतर कार्तिकी एकादशी साजरी केली जाते. या दिवसाला दिवाळीचा शेवटचा दिवस देखील म्हटले जाते. (Dev Uthani Ekadshi 2025)
कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला येणारी एकादशी विष्णु प्रबोधिनी एकादशी, देव-प्रबोधिनी एकादशी, देवोत्थान, देव उठणी एकादशी, कार्तिक शुक्ल एकादशी आणि देवोत्थान या नावानेही ओळखली जाते. यंदा ही एकादशी २ नोव्हेंबरला असणार आहे. या दिवशी भगवान विष्णू निद्रावस्थेतून जागे होतात आणि पुन्हा सृष्टीचा कार्यभार सांभाळतात. शिवाय याच दिवशी चार महिने सुरु असलेला चातुर्मास देखील संपतो. या एकादशीनंतर शुभ कार्य आणि लग्नसराईला सुरुवात होते. असे म्हटले जाते या दिवशी उपवास करुन भगवान विष्णूची आराधना केल्याने जीवनातील अनेक पापे नष्ट होतात तसेच दु:ख देखील दूर होते. जाणून घेऊया या एकादशीचे महत्त्व आणि अधिक माहिती. (Marathi News)
देवउठनी एकादशी कधी आहे?
हिंदू पंचांगानुसार, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी १ नोव्हेंबर रोजी सकाळी ०९ वाजून ११ मिनिटांनी सुरू होऊन २ नोव्हेंबर रोजी सकाळी ०७ वाजून ३१ मिनिटांपर्यंत राहील. १ नोव्हेंबरला एकादशी तिथी दिवसभर असल्यामुळे १ नोव्हेंबर रोजीच देवउठनी एकादशी साजरी केली जाईल. या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेसोबत उपवास देखील केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, हे व्रत पाळणाऱ्यांना त्यांच्या सर्व पापांपासून मुक्तता मिळते. त्यासोबतच जीवनामध्ये सुख आणि शांती येते. (Todays Marathi Headline)

आषाढ शुक्ल एकादशीला क्षीरसागरात झोपी गेलेला विष्णू कार्तिक शुक्ल एकादशीस जागा होतो. म्हणून या एकादशीला प्रबोधिनी एकादशी किंवा देवोत्थानी असे नाव पडले आहे. या दिवशी उपवास, जागरण करून अगस्त्याच्या फुलांनी विष्णूची पूजा केली जाते. आषाढ शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंतच्या काळाला चातुर्मास असेही म्हणतात. हरी प्रबोधिनी एकादशीपासून चातुर्मास व्रताची समाप्ती होते.कार्तिकी एकादशीला मांगलिक कार्यांच्या दृष्टीकोनातून विशेष महत्त्व आहे, कारण या तिथीपासून लग्न, मुंज, गृहप्रवेश आदी मंगल कार्यांना सुरुवात होते. (Marathi Top headline)
प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी आषाढी एकादशीला जशी पंढरपूरची वारी केली जाते तसेच हजारो वारकरी कार्तिकी एकादशीलाही पंढरपूरची वारी करून विठ्ठल दर्शन घेतात. या दोन एकादशींच्या दरम्यान चातुर्मास पाळला जातो. या दिवशी भगवान विष्णू ५ महिन्यांच्या योगनिद्रातून जागे होतात. यानंतर सर्व शुभ कार्ये सुरू होतील. शालिग्राम आणि तुळशीमातेचा विवाह प्रबोधिनीला रात्री होतो. तुळशीमातेच्या विवाहानंतरच लग्न कार्याला सुरुवात होते. ही एकादशी कार्तिक महिन्यात येते आणि कार्तिक महिन्याचे स्वतःचे धार्मिक महत्त्व आहे. कारण. हा संपूर्ण महिना भगवान विष्णूला समर्पित आहे. (Latest Marathi News)
देवप्रबोधिनी एकादशी कथा
धर्मराज युधिष्ठिर म्हणू लागले की हे देवा ! कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशीबद्दल सांगा. या एकादशीचे नाव काय आहे आणि तिचे व्रत पाळण्याची पद्धत काय आहे? हे व्रत केल्याने कोणते फळ मिळते? कृपया हे सर्व तर्कशुद्धपणे सांगा. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले : कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील तुळशी विवाहाच्या दिवशी येणाऱ्या या एकादशीला विष्णू प्रबोधिनी एकादशी, देव-प्रबोधिनी एकादशी, देवोत्थान, देव उठनी एकादशी, देवूथनी एकादशी, कार्तिक शुक्ल एकादशी आणि कार्तिक शुक्ल प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात. ही एकादशी मोठ्या पापांचा नाश करणारी आहे. आता मी आपल्याला त्याची महानता सांगतो, लक्षपूर्वक ऐका. (Top Marathi News)
पौराणिक कथेनुसार एका राजाच्या राज्यात सर्वांनी एकादशीचे व्रत ठेवले. एकादशीच्या दिवशी माणसांपासून, चाकरमान्यांपासून जनावरांपर्यंत कुणालाही अन्न दिले जात नव्हते. एके दिवशी दुसऱ्या राज्यातील एक व्यक्ती राजाकडे आली आणि म्हणाली राजा! कृपया मला कामावर ठेवून घ्या. तेव्हा राजाने त्याच्यापुढे एक अट घातली की ठीक आहे, तुला काम करण्यास ठेवू. पण रोज तुला जेवायला सगळं मिळेल, पण एकादशीला जेवण मिळणार नाही. (Latest Marathi Headline)

त्या माणसाने त्यावेळी होकार दिला पण एकादशीच्या दिवशी त्याला अन्नपदार्थ दिल्यावर तो राजासमोर जाऊन विनवणी करू लागला, राजा याने माझे पोट भरणार नाही. मी उपाशी मरेन, मला अन्न द्या. राजाने त्याला परिस्थितीची आठवण करून दिली, परंतु तो अन्न सोडण्यास तयार नव्हता, नंतर राजाने त्याला पीठ, डाळ, तांदूळ इत्यादी दिले. नेहमीप्रमाणे तो नदीवर पोहोचला, आंघोळ करून अन्न शिजवू लागला. जेवण तयार झाल्यावर तो देवाला हाक मारू लागला : देवा! अन्न तयार आहे. (Marathi Trending Headline)
त्याच्या हाकेवर भगवान श्रीकृष्ण पितांबर धारण करून चतुर्भुज रूपात आले आणि प्रेमाने तिच्यासोबत भोजन करू लागले. अन्न खाऊन देव अंतर्धान पावला आणि तो आपल्या कामाला गेला. पंधरा दिवसांनी पुढच्या एकादशीला तो राजाला म्हणू लागला, महाराज मला दुप्पट अन्नधान्य द्या. त्या दिवशी मी उपाशी राहिलो राजाने कारण विचारले असता त्याने सांगितले की, देवही आपल्यासोबत जेवतो. म्हणूनच ही सामग्री आम्हा दोघांसाठी पूर्ण नाही. (Top Stories)
========
Tulshi Vivah : यंदा तुळशी विवाह कधी आहे? जाणून घ्या तिथी आणि शुभ मुहूर्त
========
हे ऐकून राजाला फार आश्चर्य वाटले. तो म्हणाला: देव तुझ्याबरोबर खातो यावर माझा विश्वास बसत नाही. मी खूप व्रत पाळतो आणि पूजा करतो पण देव मला कधीच दिसला नाही. राजा ! विश्वास बसत नसेल तर या आणि बघा. राजा झाडामागे लपून बसला. त्या व्यक्तीने जेवण तयार केले आणि संध्याकाळपर्यंत देवाला हाक मारली, पण देव आला नाही. शेवटी तो म्हणाला: अरे देवा! तू आला नाहीस तर नदीत उडी मारून जीव देईन. (Top Trending Headline)
पण देव आला नाही, मग प्राण अर्पण करण्याच्या उद्देशाने तो नदीकडे निघाला. आपल्या प्राणाची आहुती देण्याचा त्याचा दृढ इरादा जाणून, भगवान विष्णू प्रकट झाले आणि त्याला थांबवले आणि त्यांनी एकत्र बसून जेवण केले. खाऊनपिऊन झाल्यावर त्यांनी त्याला आपल्या देव पुन्हा अंतर्धन पावले. हे पाहून राजाने विचार केला की मन शुद्ध असल्याशिवाय उपवासाचा फायदा नाही. यातून राजाला ज्ञान प्राप्त झाले. त्यानेही मनापासून उपवास सुरू केला आणि शेवटी स्वर्गप्राप्ती झाली. (Social News)
(टीप: या ठिकाणी दिलेली माहिती केवळ माहितीसाठी दिली जात आहे.आम्ही कोणत्याही गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
