दिवाळी झाल्यानंतर पंधरा दिवसांनी देव दिवाळी साजरी करण्यात येते. देव दिवाळी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. कार्तिक पौर्णिमेला भगवान शिवाने त्रिपुरासुराचा वध केला. या कारणास्तव, देवतांनी कार्तिक पौर्णिमेला आनंदाने दिवाळी साजरी केली. तेव्हापासून कार्तिक पौर्णिमेला ‘देव दिवाळी’ म्हटले जाऊ लागले कारण दिवाळी साजरी करण्यासाठी सर्व देव पृथ्वीवर आले होते. देव दिवाळीचे महत्त्व संपूर्ण भारतात आहे. मात्र वाराणसी इथे साजरी होणाऱ्या देव दिवाळीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. येथे देव दिवाळीचा समारंभ पाहण्याजोगा असतो. (Dev Diwali 2025)
यंदा २०२५ साली देव दिवाळी अर्थात कार्तिक पौर्णिमा तिथी ४ नोव्हेंबर रोजी रात्री १०:३६ वाजेपासून दुसऱ्या दिवशी, बुधवार, ५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६:४८ वाजेपर्यंत असणार आहे. म्हणून, प्रदोष काळ आणि उगवत्या तिथीनुसार, देव दिवाळी बुधवार, ५ नोव्हेंबर रोजी साजरी करण्यात येणार आहे. देव दिवाळीचा मुहूर्त हा ५ नोव्हेंबरला ब्रह्म मुहूर्त पहाटे ४:५२ ते ५:४४ पर्यंत असणार आहे. त्या दिवशी अभिजित मुहूर्त नसेल. गोधूलिकाळ संध्याकाळी ५:३३ ते ५:५९ पर्यंत आहे, तर संध्याकाळ ५:३३ ते ६:५१ पर्यंत असेल. (Latest Marathi News)
देव दिवाळीच्या दिवशी देखील संध्याकाळी दारासमोर पणत्या लावून दिवाळी साजरी केली जाते. या दिवशी तुळशी विवाहाची समाप्ती होते. देव दीपावलीच्या दिवशी, प्रदोष काळात दिवे लावले जातात. देव दिवाळीला प्रदोष काळात दिवे लावण्याचा शुभ काळ संध्याकाळी ५:१५ ते ७:५० पर्यंत असून त्या दिवशी देव दीपावलीचा शुभ काळ २ तास ३५ मिनिटं असणार आहे. शास्त्रानुसार याच दिवशी भगवान विष्णूने मत्स्य अवतार घेतला होता. या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला होता असेही म्हटले जाते. यामुळे देवांनी उत्साहात दिवाळी साजरी केली होती, त्यामुळे कार्तिकी पौर्णिमेला देव दिवाळी असेही म्हटले जाते. (Top Marathi Headline)

धार्मिक मान्यतेनुसार, भगवान शिवाने दैत्य राजा त्रिपुरासुराचा वध करून देवतांना त्याच्या दहशतीतून मुक्त केले. त्यामुळे देव-देवतांनी शिवनगरी काशीमध्ये गंगेच्या तीरावर स्नान केले, दिवे लावले आणि भगवान शंकराची पूजा केली. त्या दिवशी प्रदोष काळात कार्तिक पौर्णिमेला साजरी साजरी झालेली ती देवांची दिवाळी होती. तेव्हापासून दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला काशी शहरातील गंगेच्या घाटांवर देव दिवाळी साजरी केली जाते. यावर भगवान शिव प्रसन्न होतात आणि वरदान देतात. आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. देव दिवाळीच्या दिवशी ११, २१, ५१ किंवा १०८ दिवे लावण्याची परंपरा आहे. श्रद्धेनुसार आपण यापेक्षा अधिक दिवेही लावू शकता. (Top Trending News)
=======
Uttarakhand : येथे दिवाळी नंतर साजरी होते, बुधी दिवाळी !
=======
देव दिवाळी कथा
एका पौराणिक कथेनुसार, त्रिशंकूला राजर्षी विश्वामित्राने आपल्या सामर्थ्याने स्वर्गात नेले. सगळे देवता फार चिडले आणि त्यांनी त्रिशंकूला स्वर्गातून हाकलून दिले. यामुळे संतप्त झालेल्या विश्वामित्राने आपल्या सामर्थ्याने पृथ्वी आणि स्वर्गापासून मुक्त असे एक नवीन विश्व निर्माण करण्यास सुरू केले. संपूर्ण सृष्टी यामुळे हादरली. सर्वत्र गोंधळ व्हायला लागला. या गोंधळलेल्या सर्व देवांनी राजर्षी विश्वामित्र यांना विनवणी केली. महर्षी प्रसन्न झाले. नवीन विश्व निर्माण करण्याचे संकल्प त्यांनी मागे घेतला. सर्व देव आणि ऋषीमुनी आनंदी झाले पृथ्वी, पाताळ, स्वर्गात सर्व जागी दिवाळी साजरी केली गेली. ही घटना पुढे देव दिवाळी म्हणून साजरी केली जाऊ लागली, असे सांगितले जाते. (Social News)
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
