Home » कमी खर्चात डेस्टिनेशन वेडिंग करण्यासाठी खास टिप्स

कमी खर्चात डेस्टिनेशन वेडिंग करण्यासाठी खास टिप्स

डेस्टिनेशन वेडिंगचा ट्रेंन्ड वाढत चालला आहे. प्रत्येकाला डेस्टिनेशन वेडिंग करावे असे वाटते. परंतु यासाठी अधिक खर्च येत असल्याने याचा प्लॅन रद्द केला जातो.

by Team Gajawaja
0 comment
destination wedding
Share

डेस्टिनेशन वेडिंगचा ट्रेंन्ड वाढत चालला आहे. प्रत्येकाला डेस्टिनेशन वेडिंग करावे असे वाटते. परंतु यासाठी अधिक खर्च येत असल्याने याचा प्लॅन रद्द केला जातो. पण तुम्ही कमी खर्चात सुद्धा डेस्टिनेशन वेडिंगचा प्लॅन करू शकता. यासाठी थोडीशी प्लॅनिंग करण्याची गरज आहे. थोड्या स्मार्ट पद्धतीने प्लॅनन करून तुम्ही तुमच्या कमी बजेटमध्ये डेस्टिनेशन वेडिंग जरुर करू शकता. यासाठी कोणत्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत हे जाणून घेऊयात. (Destination Wedding)

गेस्ट लिस्ट कमी करा
कमी बजेटमध्ये डेस्टिनेशन वेडिंगचा प्लॅन करत असाल तर त्यासाठी सर्वात प्रथम आपली गेस्ट लिस्ट कमी करा. आजच्या काळात फार कमी दूरवरचे नातेवाईक लग्नसोहळ्यासाठई येतात. वधू-वराला हेच वाटत असते की, केवळ घरातील माणसे आणि आपले खास मित्रमैत्रिणी यावेळी उपस्थितीत असावेत. जेव्हा तुम्ही गेस्ट लिस्ट कमी कराल तेव्हा आपोआप ट्रॅव्हल, राहण्याची जागा, खाण्यापिण्याच्या गोष्टी कमी होतात.

ई-इन्विटेशन
सध्या सर्वकाही डिजिटल झाले आहे. त्यामुळे पत्रिका छापण्याऐवजी तुम्ही ई-पत्रिका पाठवू शकता. हे तुमच्या बजेटमध्ये नक्की बसेल. जर एखाद्याला खरंच बोलवायचे असेल तर त्याच्या घरी जाऊन त्याला याचे आमंत्रण द्या.

The Thriving Destination Wedding Market in India

आधीपासूनच प्लॅन करा
लग्नाचा खर्च कमी करण्यासाठी आधीपासूनच प्लॅनिंग करण्यास सुरुवात करा. जेणेकरुन तुम्हाला त्या ठिकाणची डिल स्वस्तात मिळेल. जर तुम्ही वेन्यूच्या येथे पैसे वाचवायचे असतील तर बार्गेनिंग करण्यास विसरू नका.

अधिक हैवी डेकोरेशन नको
लग्नसोहळा म्हटलं की खुप सजावट केली जाते. अधिक डेकोरेशनच्या ऐवजी कमी डेकोरेशन करून सर्वकाही मॅनेज करू शकता. यासाठी फेयरी लाइट, कलरफुल पडदे, बसण्यासाठी सिंहासनचा वापर करू शकता. असे केल्याने डेकोरेशनचा खर्च कमी होईल. (Destination Wedding)

ऑफ सीजनमध्ये लग्न करा
लग्नाच्या सीजनमध्ये प्रत्येक गोष्टीची किंमत ही दुप्पट होते. अशातच जर तुम्हाला कमी खर्चात डेस्टिनेशन वेडिंग करायचे असेल तर ऑफ सीजनमध्ये करा. जेणेकरुन तुम्हाला प्रत्येक गोष्टीत डिस्काउंट मिळेल. त्याचसोबत उत्तम ठिकामी कमी पैशांत काम होईल.


हेही वाचा- सासरच्या मंडळींना कधीच सांगू नका ‘या’ गोष्टी


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.