2023 या वर्षाची सुरुवात आठवतेय. नवे वर्ष कसं जाणार याबाबत अनेकजण भविष्य सांगत होते. त्यात त्या बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीचा अक्षरशः धुमाकूळ चालला होता. आता तिच बाबा वेंगा पुन्हा चर्चेत आली आहे. या बाबा वेंगानं आपल्या भविष्यवाणीमध्ये म्हणे सांगितलं होतं की, भविष्यात प्रयोगशाळेत मुलं तयार होणार आहेत आणि या भविष्यवाणी बरोबर मिळती जुळती एक बातमी नुकतीच सोशल मिडियावर आली आणि पुन्हा बाबा वेंगा सर्वत्र चर्चेत आली. जपानमध्ये डिझायनर बाळ (Designer baby) जन्माला येणार असल्याची ही बातमी आहे. डिझायनर बाळ म्हणजे, या बाळाची निर्मिती लॅबमध्ये होणार आहे.
हे डिझायनर बाळं आईच्या गर्भपिशवीत नाही तर प्रयोगशाळेच्या लॅबमध्ये तयार होईल. गेले काही वर्ष जपानी शास्त्रज्ञ या तंत्रज्ञानावर संशोधन करत आहेत. आता त्यांना प्राण्यांबाबत यश प्राप्त झाले आहे. तंत्रज्ञानाची प्रगती दाखवण्यापेक्षा जपानमध्ये जन्मदर सध्या अत्यंत कमी झाला आहे. तेथील युवा पिढीला बाळ जन्माला घालणं हे कठीण काम वाटायला लागलं आहे. त्यामुळे या देशाची लोकसंख्या झपाट्यानं कमी होऊन फक्त वृद्ध लोकांचा देश अशीच जपानची ओळख होईल की काय ही भीती तेथील तज्ञांना वाटत होती. त्यातूनच हा प्रयोगशाळेत बाळ विकसित करण्याचा प्रयोग करण्यात आल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे या प्रयोगाचा पहिला टप्पा यशस्वी झाल्याचा प्रयोग जपानतर्फे करण्यात आला आहे. यामुळेच त्या बाबा वेंगाची भविष्यवाणी अनेकांना आठवली आहे. (Designer baby)

तंत्रज्ञानामध्ये सातत्यानं संशोधन चालू असते. या संशोधनातून नवनवीन गोष्टी घडत असतात. त्यातून जगाला आश्चर्यचकीत करतील असे शोध लागतात. कधी या शोधांचा सकारात्मक कार्यासाठी वापर होतो, तर कधी त्याचा दुपयोग होतो. असाच एक शोध नुकताच जाहीर झाला आहे. यामुळे अवघ्या जगभर चर्चा सुरु झाली आहे. हा शोध जपानमधला असून जपानी शास्त्रज्ञांनी मोठी घोषणा केली आहे. जपानी शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, त्यांना प्रयोगशाळेत अंडी आणि शुक्राणू तयार करण्यात यश आले आहे. यातून काही वर्षात ते मानवी बाळं प्रयोगशाळेतून तयार करणार (Designer baby) आहेत. क्युशू विद्यापीठातील जपानी शास्त्रज्ञ प्रोफेसर कात्सुहिको हयाशी यांनी हा प्रयोग प्राण्यांच्या शुक्राणूबाबत केला. त्यात त्यांना शंभर टक्के यश आल्याचा दावाही करण्यात आला. आता या संशोधनातील पुढचा टप्पा म्हणजे, मानवाची बाळं तयार करण्याचा असेल, असा दावा करण्यात येतोय. मानवांमध्ये असे प्रयोग करण्यात येणार असून पुढच्या पाच वर्षात जपानमध्ये अशा लॅब बेबीज तयार होण्याची आशा त्यांनी व्यक्त केली आहे. संशोधन या मार्चमध्ये ‘नेचर’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. (Designer baby)
जपानमध्ये झालेल्याया संशोधनानुसार 2028 पर्यंत, प्रयोगशाळेत मुलाचा जन्म प्रत्यक्षात येईल. प्रोफेसर कात्सुहिको यांनी याबाबत सांगितले आहे की, हे तंत्रज्ञान आधी प्राण्यांवर वापरले गेले आहे. त्यांतरच त्याचा मानवी पेशींवर वापर करण्यात येत आहे. या तंत्राने दोन पुरुषही पिता बनू शकतात, असा दावाही प्रोफेसर कात्सुहिको यांनी केला आहे. प्रोफेसर कात्सुहिको आणि त्यांच्या टीमने प्रयोगशाळेत सात उंदीर विकसित केले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांचे जैविक पालक दोघेही नर उंदीर होते. प्रोफेसर कात्सुहिको यांनी सांगितले की, या संशोधनात नर उंदरांच्या त्वचेच्या पेशींचा वापर करून अंडी आणि शुक्राणू तयार करण्यात आले आहेत. प्रयोगशाळेत मानवी शुक्राणू आणि अंडी वाढवण्याच्या क्षमतेला इन विट्रो गेमोजेनेसिस म्हणतात.
========
हे देखील वाचा : ‘या’ मंदिराच्या आकारात आहे नवे संसद भवन…
========
विट्रो गेमोजेनेसिसमध्ये, एखाद्या व्यक्तीच्या रक्त किंवा त्वचेपासून पेशी घेऊन पेशी तयार केल्या जातात. या पेशी अंडी आणि शुक्राणूंच्या पेशींसह शरीरातील कोणतीही पेशी बनू शकतात. याचा वापर नंतर भ्रूण तयार करण्यासाठी आणि महिलांच्या गर्भाशयात रोपण करण्यासाठी केला जाऊ शकतो. या यशस्वी संशोधनानंतर, शास्त्रज्ञ मानवी शुक्राणू आणि अंडी तयार करण्याच्या अगदी जवळ आले आहेत. प्रोफेसर कात्सुहिको यांनी स्पष्ट केले की, याचा मोठा फायदा कोणत्याही वयोगटातील महिलेला मूल होण्यासाठी होईल. तसेच मुले कशी हवी आहेत, त्यांचा रंग आदीही याबाबत आधीच निश्चिती करणयात येणार आहे. यामुळेच बाबा वेंगाची आणखी एक भविष्यवाणी खरी ठरल्याची चर्चा सुरु झाली आङे.
सई बने