Home » मुघलांचे वंशज आज कोलकात्याच्या झोपडपट्टीत राहतात !

मुघलांचे वंशज आज कोलकात्याच्या झोपडपट्टीत राहतात !

by Team Gajawaja
0 comment
Mughals
Share

मुघल साम्राज्य धन, दौलत, ताकत आणि भारतातल्या सर्वात मोठ्या साम्राज्यांपैकी एकही गोष्ट वेगळी की मराठ्यांनी या ताकदीला धुळीस मिळवलं, पण तरी त्यांची ही सर्व शान-ओ-शौकत पाहता मुघल बादशहा, त्यांच्या राण्या किती रॉयल राहिले असतील, याची प्रचीती आपल्याला येते. बाबरपासून हुमायून, अकबर, जहांगीर, शाहजहान, औरंगजेबपासून ते शेवटच्या बहादूर शाह जफरपर्यंत सर्वांनी इतिहासात एक वेगळच स्थान प्राप्त केलं आहे. आईने-अकबरी या ग्रंथानुसार १५९५ दरम्यान अकबर त्यावेळी जवळपास ९ कोटी रुपयांचा मालक होता. त्यावेळचे ९ कोटी म्हणजे विषयच सोडून द्या. त्यातच अकबराची एकूण संपत्ती जगाच्या जीडीपीच्या २५% इतकी होती. आता नुसता पैसाच पैसा असणाऱ्या मुघलांचे वंशज आज एकदम ऐशोआरामात जगत असतील, असं तुम्हाला वाटत असेल. पण जर मुघलांचे वंशज कोलकाताच्या झोपडपट्टीत अगदी हलाखीच्या परिस्थितीत राहतात, असं जर कोणी म्हटलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. आता हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमचा या गोष्टीवरही विश्वास बसेल. (Mughals)

१८५७ च्या उठावात शेवटचे मुघल बादशाह बहादूर शहर जफरसुद्धा ब्रिटिशांविरुध्द लढत होते. मात्र ब्रिटिशांचा विजय झाल्यानंतर बहादूर शाह यांना अटक करण्यात आली आणि बंदी बनवून म्यानमारच्या रंगून येथे नेण्यात आलं. तिथेच कैदेत त्यांचं निधन झालं आणि मुघल साम्राज्य अधिकृतरीत्या संपुष्टात आला. यानंतर मुघलांची मालमत्ता, त्यांचे ऐतिहासिक स्थळ सगळ ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली आलं. बहादूर शाह जाफर यांचा पणतू मिर्झा मोहम्मद बेदर बख्त याच्यासोबत लग्न झालेल्या सुलताना बेगम सध्या मुघलांची पिढी चालवत आहेत. पण अतिशय हलाखीच्या परिस्थितीत. बेदर बख्त आणि सुलताना बेगम यांचं लग्न १५ ऑगस्ट १९६५ ला झालं होत. पण बेदर बख्त यांच्याकडे मुघलांची कसलीही संपत्ती उरली नव्हती. त्यामुळे त्यांना आपला संसार झोपडपट्टीतच सुरु ठेवावा लागला. १९८० साली बेदर बख्त यांचं निधन झालं. त्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली आणि आता सुलताना बेगम कोलकातामधील हावडा येथील एका झोपडपट्टीत राहतात. त्यांच्याकडे अजूनही मुघलांचे वंशज असल्याचे अनेक पुरावे आहेत. पण या पुराव्यांचा आता त्यांना काहीच उपयोग होणार नाही, हे स्पष्टच आहे. (Social News)

झोपडपट्टी, त्यातच कोणीही शिक्षण घेतलं नाही. त्यामुळे बेरोजगारी आली आणि त्यांना चहाची टपरी टाकावी लागली. ज्यांचे पूर्वज एकेकाळी अफाट संपत्ती बाळगत होते आणि महालांत अय्याशी करत होते, त्यांच्यावर आज कोलकात्याच्या एका कोपऱ्यात रस्त्यावर चहा विकण्याची वेळ आली आहे. त्यांची परिस्थिती बघून सरकारने त्यांना ६ हजार रुपये पेन्शन सुरु केलं. एकेकाळी महागडा मलमलचा कपडा वापरणारे मुघल बादशाह आणि राण्यांच्या वंशजांना मात्र आज रस्त्यावर कपडे धुण्याची वेळ आली आहे. त्यांची नात रोशन आरा यांना सरकारने नोकरी दिली आहे. चहाच्या दुकानानंतर सुलताना यांनी महिलांचे कपडे बनवायला सुरुवात केली. पण या सर्वात भागात नसल्यामुळे सुलताना यांनी थेट लाल किल्ल्यावर क्लेम केलं असून ही आमच्या वंशजांची Property आहे आणि ती आम्हाला मिळाली पाहिजे, असं सांगून कायदेशीर लढा द्यायला सुरुवात केली. मात्र सरकारने त्यांचे हे क्लेम अमान्य करत आता ही सरकारी Property आहे असं जाहीर केलं. (Mughals)

========

हे देखील वाचा : महाकुंभ बम बम भोले !

========

बहादूर शाह जाफर यांचे १६ मुल आणि ३१ मुली होत्या. ब्रिटिशांनी त्यांच्या १० मुलांना त्यांच्यादेखत मारलं होत. उर्वरित ४ मुले कुठे गेली त्याचा कोणालाही पत्ता नाही. पण दोन मुले मिर्झा शाह अब्बास आणि जवाबख्त यांनाही बहादूर शाह यांच्यासोबत रंगूनला पाठवण्यात आलं होत. मुघलांचे काही वंशज म्यानमार, पाकिस्तान, आंध्र प्रदेश तर काही महाराष्ट्रात असल्याचंही बोललं जात. सुलताना यांना आजही वाटत की, सरकार त्यांना याबाबतीत सहकार्य करेल, मात्र आता हे शक्यच वाटत नाही. कित्येक राजघराण्यांचे वंशज आज महलात आणि मोठ्या ऐशोआरामात राहत आहेत. मात्र मुघलांसारख्या शक्तीशाली साम्राज्याचे वंशज आज दोन खोल्यांमध्ये राहतील, असा विचार कदाचित कोणीच केला नसावा. (Social News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.