अभिनेत्री टुनिशा शर्मा हिने आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना इंस्टाग्रामवरील मॉडेल लीना नागवंशी हिने सुद्धा आत्महत्या केली आहे. या घटनांमुळे आता सर्वजण हैराण झाले आहेत. अत्यंत कमी वयात आत्महत्या करण्याच्या घटना गेल्या काही काळापासून वाढल्या आहेत. नुकत्याच दहा वर्षाच्या एका मुलाने सुद्धा आत्महत्या केली होती. थंडीत तणाव वाढल्याने अशा घटना काही वेळेस होतात. त्यामुळे तुमच्या घरात एखादा तणावाखाली असेल किंवा दीर्घकाळापासून तणावाखाली असेल तर त्यावर लक्ष देण्याची अधिक गरज असते. त्याच्या वागण्यावरुन तुम्ही तो व्यक्ती तणावाखाली असल्याचे ओळखू शकता. त्याचसोबत त्याच्या मनात काय सुरु आहे हे सुद्धा तुम्ही जाणून घेण्यासाठी त्या सोबत बातचीत करा.(Depression in Winter)
अखेर थंडीच्या दिवसात लोक फिरण्यासाठी बाहेर जातात, रिलॅक्स होऊ पाहतात. मात्र हा काळ जीवघेणा का ठरत आहे? यामागे एक नव्हे तर अनेक कारणे आहेत. मात्र काही हार्मोन्स सुद्धा यासाठी जबाबदार असतात. तर जाणून घेऊयात यामागील कारणं आणि तणावाची लक्षणं याबद्दल अधिक.

थंडीत का वाढतो तणाव?
थंडीच्या दिवसात तणाव वाढण्याचे कारण ऋतु संबंधित आहे. कारण सुर्याचे किरण पडण्याचा वेळ कमी असतो आणि त्यामुळ मेंदूत सेरेटोनिन हार्मोनचे सीक्रेशन प्रभावित होते. हे एक मूड लाइटनिंग हॉर्मोन असतो ज्याला हॅप्पी हॉर्मोन असे ही म्हटले जाते. तो मेंदूसाठी न्युरोट्रांसमीटरच्या रुपात ही काम करते. जो मूडला थेट प्रभावित करतो. थंडीच्या दिवसात त्याचा स्तर कमी झाल्याने मानसिक आरोग्यावर त्याचा नकारात्मक परिणाम होते. त्यामुळे लोक तणावात जातात. त्यामुळे तुम्ही दररोज व्यायाम आणि सुर्याच्या प्रकाशात काही वेळ बसल्यास तो दूर होऊ शकतो.
थकवा सुद्धा आहे तणावाचे कारण
थंडीच्या दिवसात दिवस लहान आणि रात्र मोठी असते. अशावेळी थकवा अधिक जाणवतो. स्लीप हॉर्मोनचा थेट संबंध उजेड आणि काळोखाशी असतो. थंडीच्या दिवसात सुर्य लवकर मावळत असल्याने डोकं मेलॅटोनिन तयार करु लागतो. त्यामुळे आपल्याला झोप अधिक येते आणि थकवा जाणवतो. यामुळे ही आपण तणावाखाली जातो.(Depression in Winter)
तणावाची लक्षणं
-तुमच्या आवडीचे काम करण्याचा मूड होत नाही
-तुम्हाला आळस येतो आणि थकवा ही जाणवतो
-अधिक झोप येते
-तुम्हाला खुप भूक लागते, कार्बोहाइड्रेटचे खाणं खाण्याचा मूड होतो
-या दरम्यान तुमचा आत्मविश्वास ठासळल्याचे वाटते. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही स्वत:ला दोषी मानता
-वेळोवेळी मनात नकारात्मक विचार येतात
हे देखील वाचा- टायटानिक फेम गायिक सेलीन डियोन स्टिफ पर्सन सिंड्रोमने ग्रस्त, नक्की काय आहे हा आजार?
तणावापासून दूर राहण्यासाठी काय कराल?
-थंडीत तुम्ही अधिक वेळ सूर्य किराणांमध्ये बसा. नैसर्गिक लाइट तुमच्या शरिरासाठी फायदेशीर ठरेल
-तुमचे एक शेड्युल बनवा आणि झोपण्याची-उठण्याची वेळ ठरवा
-तणावादरम्यान नकारात्मक विचार दूर ठेवण्यासाठी मेडिटेशन करा
-प्रयत्न करा की, तुमचे मनं अधिकाधिक काम करेल
-नकारात्मक विचार वारंवार येत असतील तर तुम्ही मानसरोग तज्ञांना भेट द्या
-आठवड्यातून एकदा तरी बाहेर फिरण्यासाठी जा