प्रत्येक पालकांना असे वाटते की, आपलं मुलं प्रत्येक गोष्टीत हुशार असावे. दुसऱ्या मुलापेक्षा अधिक उत्तम असावा आणि सर्व कामे परफेक्ट त्याने करावीत. मात्र प्रत्येकाच्या क्षमतेनुसार प्रत्येकण काम करत असतो. अशातच पालकांनी सुद्धा आपल्या मुलाकडून अधिक अपेक्षा करू नये. काही गोष्टी त्याच्या कलनेनुसार ही घ्याव्यात. जेणेकरुन तो प्रत्येक कामे व्यवस्थितीत करण्याचा प्रयत्न करेल. मात्र तसे तुम्ही करत नसाल तर याचा परिणाम उलट होऊ शकतो. अशातच पालकांनी मुलांकडून अधिक अपेक्षा करु नये. कारण जर मुलाने तुमच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत तर तुम्ही कधीकधी संतप्त होता. अशातच मुलांमध्ये तुमच्याविषयी भीती सुद्धा निर्माण होऊ शकते.यामुळे मुलं डिप्रेशनचे शिकार होऊ शकते. (depression in child )
नकारत्मकतेची भावना
जर तुम्ही मुलाच्या इतर मुलांसमोर चुका काढत असाल तर असे करु नाही. तू काहीच करत नाहीस असे टोमणे सुद्धा त्याला मारू नका. त्यामुळे त्याला कालांतराने असे वाटते की, त्याला कोणतेही काम योग्यपणे करता येत नाही. तो आपले आई-वडिल काय म्हणतायत हेच खरे मानतो. अशातच तो आपल्यामध्ये सुधारणा सुद्धा करु पाहत नाही.
व्यक्तिमत्वावर परिणाम
वारंवार मुलांवर टीका केल्याने त्यांच्या मनावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. असे होऊ शकते की, तुम्ही कालांतराने त्याला टोमणे मारणे बंद कराल पण त्याच्या मनावर तुमच्या शब्दांचा परिणाम हा दीर्घकाळ झालेला असेल. यामुळे त्याच्या व्यक्तिमत्त्वावर सुद्धा परिणाम होऊ शकतो.
आत्मविश्वास कमी होतो
जर तुम्ही मुलाने एखादे काम चुकीच्या पद्धतीने केल्यानंतर ओरडत असाल तर असे करु नका. त्याला शांतपणे समजावून सांगा. मात्र वारंवार त्याच्या चुका काढत राहिल्याने त्याचा आत्मविश्वास ही कमी होतो. अशातच आयुष्यात पुढे जाऊन एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल तरीही त्याला तो घेता येत नाही.
आक्रमक व्यवहार
जेव्हा मुलावर सतत टीका केली जाते तेव्हा त्याला घरातील मंडळींसह बाहेरच्या लोकांचा सुद्धा फार राग येऊ लागतो. त्यांच्या मनात आक्रमकतेची भावना निर्माण होऊ शकतो. अशी मुलं दुसऱ्या मुलांसोबत ही उद्घटपणे वागू शकतात. (depression in child)
हेही वाचा- युनेस्कोने सुद्धा सांगितले मुलांसाठी मोबाईल घातक, पालकांनी करावे ‘हे’ काम
ऐकटेपणा
मनात हीनतेची भावना असेल तर तो दुसऱ्या मुलांसोबत ही जाण्यास नकार देतो. एकटा एकटा राहू लागतो. त्याचे फार मित्र सुद्धा होत नाहीत. अशातच त्याच्यामध्ये हळूहळू डिप्रेशन वाढत जाते आणि तो अधिक तणावाखाली जाऊ शकतो.