Home » Diwali : दिवाळीचा फराळ नकोसा झालाय…? मग उरलेल्या फराळाचा वापर करून ट्राय करा ‘या’ भन्नाट रेसिपी

Diwali : दिवाळीचा फराळ नकोसा झालाय…? मग उरलेल्या फराळाचा वापर करून ट्राय करा ‘या’ भन्नाट रेसिपी

by Jyotsna Kulkarni
0 comment
Diwali
Share

दिवाळी म्हणजे खाण्यापिण्याची नुसती मजा असते. दिवाळीमध्ये प्रत्येकाच्याच घरी दिवाळीचा फराळ बनतोच बनतो. किंबहुना देवाला देखील याच फराळाचा नैवैद्य दाखवला जातो. त्यामुळे दिवाळीच्या फराळाचे महत्त्व जरा जास्तच असते. आता दिवाळी फराळ म्हणजे चकली, चिवडा, लाडू, करंजी, शेव, शंकरपाळे, अनारसे आदी अनेक प्रकारचे पदार्थ बनतात. मुख्य म्हणजे दिवाळीच्या दिवसांमध्ये किंवा दिवाळी झाल्यानंतर देखील पुढील काही दिवस घरी, बाहेर सगळीकडे केवळ फराळच खायला मिळतो. सुरुवातीला सगळे अगदी आवडीने फराळ खातात. (Diwali Faral)

मग हळूहळू सगळ्यांचीच फराळावरची वासना उडू लागते. तोच चिवडा, तोच लाडू, तीच शंकरपाळी नकोशी वाटतात. पण घरातला फराळ संपवण्याचे मोठे टास्क आई समोर उभे असते. फराळ संपवायचा देखील असतो आणि घरातल्या लोकांना तो खायचा देखील नाही. मग अशावेळेस काय उपाय करून हा फराळ संपवावा हा प्रश्न अनेक महिलांना पडतो. याच प्रश्नाचे उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. उरलेल्या फराळापासून अतिशय चविष्ट आणि रुचकर अशा रेसिपी तुम्हाला सांगणार आहोत. ज्या करून तुम्ही तुमचा फराळ संपवू शकता आणि घरचे देखील आनंदाने खातील. (Diwali Faral Recipe)

दिवाळी झाल्यानंतर प्रत्येक घरांत मिठाईचा ढीग असतो. काजू कतली, बर्फी, पेठे, सोनपापडी, लाडू असे अनेक प्रकारची मिठाईही शिल्लक आहे. ही मिठाई नंतर नकोशी होते. अशा वेळेस या मिठाईचे काय करता येईल याचे उत्तर पाहूया. उरलेल्या मिठाईपासून तुम्ही झटपट चविष्ट अशी कुल्फी करू शकता. चला पद्धत जाणून घ्या. (Marathi News)

माव्याची कुल्फी
सर्वप्रथम माव्याची सर्व मिठाई एकत्र करा आणि एका भांड्यात ठेवा. आता त्यांना हाताने थोडे मॅश करा. यानंतर मिक्सरमध्ये १ कप दूध आणि मॅश केलेली मिठाई घालून ते फिरवून घ्या. तयार मिश्रण आता गॅसवर ठेवा आणि मग त्यात आवश्यकतेनुसार थोडे दूध आणि साखर घालून उकळायला ठेवा. हळूहळू त्यात आवडीप्रमाणे सुकामेवा देखील घाला. हे मिश्रण नीट शिजल्यानंतर आणि थोडे घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करा आणि थंड झाल्यावर ते कुल्फीच्या साच्यात भरून फ्रिजमध्ये ठेवा. सेट झाल्यानंतर भन्नाट कुल्फी सर्व्ह करा. (Diwali)

Diwali

थालीपिठ
फराळात असलेल्या सर्व तिखट गोष्टी जसे की, चिवडा, शेव, चकल्या, कडबोळी सर्व एकत्र करा. त्यांचे हाताने बारीक तुकडे करून मग या सर्व वस्तू मिक्सरमधून फिरवून घ्या. आता या मिश्रणामध्ये थोडी कणिक घाला. कांदा, टोमॅटो, आलं- लसूण पेस्ट आणि सोबतच तुमच्या आवडीच्या इतर भाज्या, जसे की, मेथी, कोबी, पालक, त्यात किसून बारीक चिरून टाका. थोडे दही घालून हे पीठ भिजवा आणि त्याचे छान खमंग खरपूस थालिपीठ करा. लोणी, तूप, दह्यासोबत गरमागरम थालीपीठ सर्व्ह करा. (Trending Topic)

गोड पोळी
फराळामधील सर्व गोड पदार्थ घ्या. त्यात विविध प्रकारचे लाडू, शंकरपाळी आदी गोष्टी घ्या. सर्व पदार्थ बारीक करून घ्या. कोरडे वाटत असतील तर त्यात थोडे तूप घाला आणि कणकेच्या गोळ्यात पूर्णासारखे भरून त्याची पोळी लाटा आणि तुपावर खमंग भाजून घ्या. याशिवाय तुम्ही उरलेल्या पेढ्यांची देखील पोळी, सांजोरी, पोळी बनवू शकतात. (Top Marathi News)

भाज्यांचा मसाला
शेव, चकल्या खूप जास्त प्रमाणात उरल्या असतील तर शेव थोडी हाताने चुरून घ्या. चकल्यांचे तुकडे करून घ्या. शेव आणि चकली दोन्ही मिक्सरमध्ये टाकून बारीक पावडर करून घ्या.ज्या भाज्या आपण डाळीचं पीठ किंवा बेसन तसेच दाण्याचा कूट लावून करतो, त्या भाज्यांमध्ये पीठाऐवजी किंवा कुटाऐवजी चकल्यांची किंवा शेवेची मिक्सरमधून बारीक केलेली पावडर वापरा. चवीमध्ये बदल झाल्याने भाज्या सगळ्यांनाच खूप आवडतील. जाड शेव असेल तर तिची भाजी बनवू शकता. (Latest Marathi Headline)

=======

Liver Detox : लिव्हर डिटॉक्ससाठी डायबिटीज व कोलेस्ट्रॉलवर शेवग्याच्या पानांचा जबरदस्त उपाय जाणून घ्या

=======

शिरा किंवा खीर
रव्याचा लाडू बनवताना त्यामध्ये तूप, साखर, रवा, वेलचीपूड असे साधे साहित्य असते. त्यामुळेच रव्याचे लाडू उरल्यास तुम्ही त्याचा शिरा बनवू शकता किंवा मग रव्याची खीर. रव्याचा लाडू शिऱ्याचे प्रीमीक्स म्हणून एक उत्तम पर्याय आहे. खीर बनवण्यासाठी हा लाडू दुधात फोडा आणि रवा शिजवून घ्या. बेसनाचे लाडू उरल्यास त्यामध्ये मुगाचे पीठ आणि गव्हाचे पीठ भाजून मिसळा आणि याच्या वड्या तयार करा. शंकरपाळी उरली असल्यास मिक्सरमध्ये वाटून यात तूप मिसळून तुम्ही त्याची बिस्कीटं बनवू शकता. (Marathi Trending NEws)

पोहे
पोह्यांच्या चिवड्याचा उपयोग कांदे पोह्यांचे प्रिमिक्स म्हणून करता येऊ शकतो. जर पोह्यांमध्ये फोडणीला लसूण वापरला नसल्यास याच पोह्यांवर गरम पाणी शिंपडल्यास काही वेळ वाफ काढली तर ते कांदे पोह्यांसारखेच मस्त होतील. याच पोह्यांवर शेव घालून सर्व्ह करता येते. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.