Delicate Dumping : रिलेशनशिप आणि डेटिंगचे महत्त्व फार मोठे आहे. खरंतर नाते दीर्घकाळ टिकवून ठेवायचे असेल तर दोन्ही पार्टनरने एकमेकांसाठी प्रयत्न करणे गरजेचे असते. पण सध्याच्या बदलत्या जगात रिलेशनशिपची व्याख्या बदलली गेली आहे. अशातच सध्या डेलिकेट डंपिंगचा ट्रेण्ड आहे. पण तुम्हाला डेलिकेट डंपिंग म्हणजे काय माहितेय का?
एखाद्या रिलेशनशिपमध्ये एक व्यक्ती आपल्या पार्टनरला सोडून देतो किंवा ब्रेकअप करतो त्यांना डंपिंग असे म्हटले जाते. पण डेलिकेट डंपिंगची व्याख्या फार वेगळी आहे. खरंतर, डेलिकेट डंपिंग म्हणजे ज्यामध्ये व्यक्ती हळूहळू आपल्या नात्यासाठी प्रयत्न करणे कमी करतो किंवा बंद करतो. जेणेकरुन पार्टनरला स्वत:हून वाटेल की, दुसरा पार्टनरला आपली काळजी नाही. भले डेलिकेट डंपिंगची व्याख्या अशी असली तरीही रिलेशनशिप मोडण्याची ही एक नवी पद्धत सध्या ट्रेण्डमध्ये आहे.
या ट्रेण्डबद्दल बोलताना रिलेशनशिप तज्ज्ञ सांगतात की, जेव्हा एखादा व्यक्ती वाद, भांडण किंवा भूतकाळातील एखादी गोष्ट पार्टनरपासून लपवण्याचा प्रयत्न करत असेल अथवा पार्टनरने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे टाळत असल्यास तेव्हा तो डेलिकेट डंपिंगचा आधार घेतो. सोप्या भाषेत बोलायचे झाल्यास, व्यक्ती स्वत: ला दोषी एखाद्याने ठरवू नये म्हणून नाते मोडण्याचा हा पर्याय निवडतो. (Delicate Dumping)
डेलिकेट डंपिंगमध्ये एक व्यक्ती रिलेशनशिपमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. याशिवाय आपल्या मनातील भावना लगेच व्यक्त करत नाही. त्याऐवजी पार्टनरच्या चुका दाखवून नाते मोडण्याचा प्रयत्न करतो.