Home » दिल्लीतील अज्ञात रेल्वेस्थानकं, काही लोकांना नावं सुद्धा माहिती नाहीत

दिल्लीतील अज्ञात रेल्वेस्थानकं, काही लोकांना नावं सुद्धा माहिती नाहीत

by Team Gajawaja
0 comment
Delhi Railway Stations
Share

देशाची राजधानी दिल्लीत प्रवास करण्यासाठी बहुतांश लोक रेल्वेचाच पर्याय निवडतात. अशातच देशातील प्रत्येक कोपऱ्यातून येणाऱ्या काही ट्रेन या नवी दिल्ली रेल्वे स्थानक अथवा जुन्या दिल्ली रेल्वे स्थानकात थांबतात. पण तुम्हाला माहिती आहे का, एनडीएलएस आणि जुनी दिल्लीच नव्हे तर येथे अन्य ६ स्थानक सुद्धा आहेत. ज्याबद्दल बहुतांश दिल्लीकरांना त्यांची नाव ही माहिती नाहीत. (Delhi Railway Stations)

एनडीएलएस आणि जुनी दिल्ली रेल्वे स्थानकाला देशातील सर्वाधिक व्यस्त ट्रेन मार्ग मानला जातो. दिल्लीतील दोन्ही प्रमुख स्थानकातून प्रत्येक शहरासाठी अगदी सहज ट्रेन उपलब्ध होतात. मात्र दिल्लीत काही अज्ञात स्थानकंही आहेत.

सेवा नगर रेल्वे स्थानक
नॉर्थ रेल्वे अंतर्गत येणारे हे सेवा नगर रेल्वे स्थानक लोधी कॉलनीत आहे. जवाहर लाल नेहरु स्टेडिअम मेट्रो स्थानक येथून जवळ आहे. तसेच सेवा नगर रेल्वे स्थानकपासून ते लाजपत नगर आणि जंगपुरा मेट्रो स्थानक ही केवळ हाकेच्या अंतरावर आहे.

दया बस्ती रेल्वे स्थानक
दिल्लीतील दया बस्ती रेल्वे स्थानक हे साउथ दिल्लीत आहे. येथून जवळचे मेट्रो स्थानक इंद्रलोक आहे. तर इंद्रलोक मेट्रो स्टेशन ते दया बस्ती रेल्वे स्थानक यामधील अंतर केवळ ४ मिनिटांचे आहे.

घेवरा रेल्वे स्थानक
वेस्ट दिल्लीतील घेवरा रेल्वे स्थानक ग्रीन मेट्रो लाइनवर आहे. मुंडका इंडस्ट्रियल मेट्रो स्थानकापासून घेवरा अगदी जवळ आहे. घेवरा रेल्वे स्थानकात एकूण ३ प्लॅटफॉर्म आहेत.

ओखला रेल्वे स्थानक
ओखला रेल्वे स्थानक हे ईस्ट दिल्लीत आहे, या स्थानकात एकूण सात प्लॅटफॉर्म आहेत. तर कालकाजी स्टेशन हे येथील जवळचे मेट्रो स्थानक आहे.

शाहदरा जंक्शन
जुन्या दिल्लीत असलेले शाहदरा रेल्वे स्थानक यमुना नदीच्या तटावर आहे. ईस्ट दिल्लीचा हिस्सा असलेले शाहदराला दिल्लीतील सर्वाधिक जुना परिसर म्हणून ओळखले जाते. तसेच शाहदरा मेट्रो स्थानकापासून हे जंक्शन अगदी जवळच आहे.(Delhi Railway Stations)

सराय रोहिला रेल्वे स्थानक
जुन्या दिल्लीतील रेल्वे स्थानकापासून सराय रोहिला स्थानकाचे अंतर केवळ ४ किमी आहे. रेड लाइनवर असलेले शास्री नगर मेट्रो स्टेशन येथून सर्वाधिक जवळ आहे. तर सराय रोहिला रेल्वे स्थानकचे मॅनेजमेंट दिल्ली डिविजनच्या अंतर्गत येते.

हे देखील वाचा- दिल्लीत ओला, उबर आणि रॅपिडो बाइक सेवा बंद

दरम्यान, आता दिल्ली-एनसीआर मध्ये राहणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण आश्रम फ्लायओवरच्या एक्सटेंशनचे उद्घाटन केले जाणार आहे. यामुळे दिल्ली आणि नोएडा मधील अंतर पार करण्यासाठी लागणारा वेळ हा फार कमी होणार आहे. आश्रम फ्लायओवर एक्सटेंशनला पब्लिकसाठी उद्घाटनानंतर सुरु केले जाणार आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.