दिल्लीमधील बॉम्ब ब्लास्टच्या बातमीनंतर संपूर्ण देश सुन्न झाला आहे. सहा महिन्यांपूर्वीच पहलगाम हल्ला झाला आणि आता हा दिल्ली ब्लास्ट झाल्याने देशामध्ये एकच खळबळ आहे. दिल्लीमध्ये सोमवारी १० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी झालेल्या भीषण स्फोटामध्ये ९ जणांनी जीव गमावला. डॉ. उमर हा या स्फोटाचा मास्टरमाईंड असल्याचे सांगितले जात आहे. डॉक्टर असलेल्या उमर यानेच लाल किल्ल्याजवळील या आत्मघातकी हल्ल्याला अंजाम दिल्याची चर्चा आहे. तो पुलवामा येथील रहिवासी असून पोलीसांकडून त्याचा शोध घेण्यात येत होता. हा फरिदाबाद येथून फरार झाला होता. हा तोच आहे ज्याने दिल्लीत स्फोट घडवून आणला. आता त्याचा पहिला फोटो समोर आला आहे. दरम्यान या ब्लास्टमध्ये नाव आलेला हा डॉक्टर उमर कोण आहे जाणून घेऊया. (Delhi Blast)
कोण आहे डॉक्टर उमर?
स्फोट झाला त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज आणि फॉरेन्सिक पुराव्यावरुन डॉक्टर उमर यामध्ये सहभागी असल्याचं दिसतय. घटनास्थळी एक तुटलेला हात सापडला, तो डॉ. उमरचा असल्याची शक्यता आहे. तो डॉक्टर उमरच आहे, याची ओळख पटवण्यासाठी काश्मीरमधील त्याच्या कुटुंबाचे DNA नमुने घेण्यात आले आहेत. निळ्या रंगाच्या शर्टमधील माणसाचा जो फोटो दिसतोय, तो डॉ. उमरच आहे. डॉक्टर उमर मोहम्मद अल फलाह मेडिकल कॉलेजमध्ये नोकरी करत होता. (Marathi News)
तो डॉक्टर आदिल अहमद राथर आणि डॉक्टर मुजम्मिल शकील यांचा जवळचा साथीदार होता. हे तेच दोन डॉक्टर आहेत ज्यांना जम्मू-काश्मीर आणि हरियाणा पोलिसांनी व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूलअंतर्गत अटक केली आहे. यांच्या अटकेची माहिती मिळताच उमर फरिदाबाद येथून फरार झाला आहे. कारवाईच्या भीतीने त्याने कारमध्ये डेटोनेटर फीट केले आणि दिल्लीत स्फोट घडवून आणला, अशी माहिती मिळाली आहे. प्राप्त होणाऱ्या माहितीनुसार, त्याने दोन साथीदारांसोबत मिळून हा कट रचला होता. मुख्य म्हणजे उमरने या स्फोटात स्वत:लाही उडवून घेतले आहे. (Top Marathi News)

डॉ. उमर यू नबी हा जीएच नबी भट यांचा मुलगा आहे. डॉ. उमर अल फलाह मेडीकल कॉलेज फरीबाद येथे नोकरीला होता. डॉ. उमरची आई शमीमा बानू, पुलवामा कोइलची आहे. २४ फेब्रुवारी १९८९ रोजी डॉ. उमरचा जन्म झाला.तो डॉ. अदीलच्या खूप जवळ होता. डॉ. अदीलचा सुद्धा तपास सुरु आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उमरचे वडील सरकारी शिक्षक होते. मानसिक दृष्टया स्थिर नसल्यामुळे १० ते १५ वर्षांपूर्वी त्यांनी नोकरी सोडली. त्याला दोन भाऊ आणि एक बहिण आहे. एका भावाचे आणि बहिणीचे लग्न झाले आहे. तर त्याचा एक भाऊ अविवाहित आहे. सध्या त्याच्या दोन्ही भावांना आणि आईला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. (Latest Marathi Headline)
उमर हा अदील अहमद राथरचा जवळचा सहकारी असल्याचे सांगितले जाते. राथर हा अनंतनाग येथील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज (GMC) मधील माजी सीनियर रेसिडेंट डॉक्टर असून, गेल्या आठवड्यात त्याला अटक करण्यात आली होती. राथरकडून मिळालेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी सोमवारी फरिदाबादमध्ये छापा मारला. उमरच्या वहिनीने खुलासा केला की तिचे शुक्रवारी उमरशी बोलणे झाले होते. तेव्हा त्याने त्याच्या आईला सांगितले की मला जास्त फोन करून त्रास देऊ नका. तो लायब्ररीमध्ये बिझी असेल असही त्याने आईला सांगितलं होता. पोलिसांनी सध्या उमरच्या आई आणि भावालाही ताब्यात घेतले आहे. (Top Trending News)
=======
Red Fort : भारताचे वैभव असलेल्या लाल किल्ल्याची रंजक माहिती
=======
मिळणाऱ्या माहितीनुसार, ही हुंडाई i20 सुरुवातीला मोहम्मद सलमानच्या नावावर होती, ज्याला सोमवारी रात्री अटक झाली. कार नंतर अनेक वेळा विकली गेली — प्रथम नदीमला, त्यानंतर फरिदाबाद सेक्टर ३७ मधील रॉयल कार झोन या जुन्या गाड्यांच्या डिलरला….या गाड्यांशी संबंधित लोकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न झाला असता, त्यांचे सर्व मोबाईल फोन बंद असल्याचे आढळले. यानंतर ही कार आमिरकडे आणि मग तारिककडे गेली. तारिक हा फरिदाबाद दहशत मॉड्यूलचा सदस्य असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. शेवटी ही कार मोहम्मद उमरकडे आली. आमिर आणि तारिक या दोघांची सध्या चौकशी सुरू आहे. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
