भारतातील वैद्यकिय क्षेत्रात साइकोसर्जरीचा एक नवा पण त्याच पद्धतीचे एक प्रकरण नुकतेच समोर आले होते. एका ऑस्ट्रेलियातील महिलेवर डीप ब्रेन सिम्युलेशन सर्जरी केली गेली जी डिप्रेशन किंवा नैराश्याप्रकरणी केली जाते. ही सर्जरी तेव्हाच केली जाते जेव्हा उपचार करताना औषध आणि अन्य उपचार पद्धती त्यावर काम करत नाही. मात्र ही सर्जरी दाखवून देते की, साइको सर्जरी प्रकरणी भारताने प्रगती केली आहे. अशा प्रकारची सर्जरी पर्किंसन, मिर्गी आणि नैराश्य सारख्या मेंदू संबंधित विकारासांठी वापरली जाते. ३० वर्ष जुन्या या पद्धतीची खास गोष्ट अशी की, या सर्जरी दरम्यान रुग्णाला बेशुद्ध केले जात नाही. (Deep brain stimulation)
नैराश्यासाठी केली गेली सर्जरी
ऑस्ट्रेलियातील एक महिला गेल्या २६ वर्षांपासून नैराश्याच्या समस्येचा सामना करत होती. त्याच्या दहा दिवस आधी डॉ. परेश दोषी यांच्याशी संपर्क केला होता आणि त्यानंतर तिच्यावर २८ मे रोजी ही खास सर्जरी केली गेली. या रुग्णालाा ऑस्ट्रेलियातील दोन रुग्णांकडून या सर्जरी आणि डॉ. दोषी यांच्याबद्दल कळले होते ज्यांनी काही वर्षांपूर्वी हिच सर्जरी केली होती.
ही मुंबईतच नव्हे तर भारतात पहिल्यांदाच डीबीएस सर्जरी डिप्रेशनसाठी सर्जरी केली आहे. भारताने काही वर्षांमध्ये मानसिक आरोग्य सेवाप्रकरणी खुप प्रगती केली आङे. २०१७ मध्ये मेंटल हेल्थकेअर अॅक्ट लागू झाल्यानंतर ही अशा प्रकारची पहिली सर्जरी आहे. या कायद्याला रुग्णांच्या अनावश्यक वैद्यकिय उपचार पद्धतींपासून दूर ठेवतो.
खरंतर डीप ब्रेन सिम्युलेशन सर्जरी मध्ये मेंदूच्या काही खास हिस्स्यामध्ये इलेक्ट्रोड्स टाकले जातात. या इलेक्ट्रोड मधून निघालेले विद्युत तरंग किंवा संकेत ज्यांना खासकरून लीड्स असे म्हटले जाते. असमान्य मेंदूच्या गतिविधींना नियंत्रित करण्यात ते उपयोगी येतात. या विद्युत तरंगांच्या माध्यमातून मेंदूत त्या रासायनिक असंतुलनाना सुद्धा ठिक केले जाऊ शकते जे मेंदूसंबंधित आजार निर्माण करतात.
डीबीएस सर्जरी ही नैराश्यासाठी नुकतीच वापरलीगेली. मात्र या व्यतिरिक्त ती ऑब्सेसिव कंम्पलशन डिऑर्डर, पार्किंसन्स रोग, डिसटोनिया, मिर्गी, एसेंसियल ट्रेमरसाठी सुद्धा वापरली जाते. न्युरोसर्जन डॉ. परदेश दोषी यांनी म्हटले की, सर्जरी दरम्यान रुग्ण हा बेशुद्ध नसतो. त्यामुळे इलेक्ट्रोडला ठेवण्याची प्रक्रिया पाहू शकतो.(Deep brain stimulation)
हेही वाचा- Skin Cancer Symptoms: शरीरावर अचानक आलेला तीळ किंवा मस त्वचेचा कर्करोग तर नाही? जाणून घ्या अधिक
डीबीएस सर्जरीचा वापर ३० वर्षांपासून न्युरोलॉजिकल स्थितींसाठी केला जातो. मात्र दहा वर्षांपूर्वी याचा वापर मनोवैज्ञानिक अवस्थांसाठी केला जाऊ लागला आहे. मेंटल हेल्थ केअर अॅक्टनुसार ,साइको सर्जरी तेव्हाच केली जाऊ शकते जेव्हा रुग्णाला एग्रीमेंटची पूर्ण माहिती दिली जाते. त्याचसोबत खास रुपात बनवण्यात आलेल्या स्टेट मेंटल हेल्थ बोर्डाची सुद्धा परवानगी घेतली पाहिजे.