Home » Deep Amavasya : ‘तिमिरातुनी तेजाकडे’ जाण्याचा संदेश देणारी दीप अमावस्या

Deep Amavasya : ‘तिमिरातुनी तेजाकडे’ जाण्याचा संदेश देणारी दीप अमावस्या

by Jyotsna Kulkarni
0 comment
Deep Amavasya
Share

आपल्याकडे कायमच अमावस्या तिथीला अशुभ समजले जाते. अमावस्या म्हटले की या तिथीला कोणतेही शुभ काम केले जात नाही. मात्र आषाढ महिन्यातील अमावस्या ही तिथी अपवाद आहे. आषाढ महिन्यातील अमावास्येला मोठे महत्व असते. या दिवशी पूजा केली जाते आणि घरात गोडधोडाचा स्वयंपाक होतो देवाला नैवैद्य दाखवला जातो. मग नक्की असे काय खास आहे या महिन्यातल्या अमावस्या तिथीमध्ये? का तिला एवढे महत्व आहे? चला जाणून घेऊया आषाढ महिन्यातल्या अमावास्या तिथीबद्दल. (Deep Amavasya)

आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी येणाऱ्या अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असे म्हणतात. आषाढ अमावस्या ही चातुर्मासातील पहिली अमावस्या असते. याच अमावास्येच्या दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिन्याला सुरुवात होते. या अमावास्येच्या दिवशी दीपपूजनाला मोठे महत्व आहे. या अमावास्येला दीप अमावस्या असे देखील म्हटले जाते. महाराष्ट्रात या अमावस्येला गटारी अमावस्या नावाने देखील ओळखले जाते. या दिवशी स्नान, दान आणि पूजाविधीला खास महत्त्व असते. यंदा २४ जुलै गुरुवार रोजी दीप अमावस्या साजरी केली जाणार आहे. (Marathi News)

दीप अमावस्या म्हणजेच आषाढी अमावस्या होय. या दिवशी घरातील सर्व दिव्यांची पूजा केली जाते. घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजा केली जाते. या दिवशी दिवे लावणे अत्यंत शुभ मानले जाते. “तमसो मा ज्योतिर्गमय”चा संदेश देणारी ही दीप अमावस्या “अंधारातून प्रकाशाकडे”चा संदेश देते. दिव्यांच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी होते आणि घरात समृद्धी, सकारात्मकता येते. (Todays Marathi Headline)

Deep Amavasya

आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला अनन्यसाधारण महत्व आहे. दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर दिवा लावण्याची पद्धत प्रत्येकाच्यच घरी असते. दिवा, दीपक हे शुभ प्रतीक आहे. घरात जेव्हा दिवा लावला जातो तेव्हा या दिव्याच्या शांत आणि शीतल प्रकाशामुळे घराला एक वेगळीच झालेली मिळते. एक वेगळीच सकारात्मकता आणि पॉझिटिव्ह एनर्जी घरात जाणवते. म्हणूनच दीप अमावास्येचा दिवस हा संपूर्ण दिवस दिव्यांसाठी, त्यांच्या पूजनासाठी खास असतो. या दिवशी, घरातील सर्व नवे जुने दिवे बाहेर काढले जातात. (Trending Topics)

ते धुऊन स्वच्छ, चकचकीत करून पाटावर मांडून ठेवले जातात. पाटाभोवती सुरेख रांगोळी काढली जाते. फुलांची आरास देखील केली जाते. सर्व दिव्यांमध्ये तेल वात घालून त्यांना प्रज्वलित केले जाते. या सर्व दिव्यांसोबतच कणकेचे गोड दिवे सुद्धा बनवले जातात. ओल्या मातीचे दिवेही बनवून पूजेत मांडतात. या सर्वांची हळद कुंकू , फुले, अक्षता वाहून मनोभावे पूजा करावी. गोडाचा नैवेद्य दाखवावा. दिव्यांना लाह्या-फुटाण्यांचा, पक्वान्नांचा नैवद्य दाखवून प्रार्थना करतात, ‘हे दिव्या, तू सूर्यरूप आहेस. अग्निरूप आहेस. माझ्या पूजेचा स्वीर कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.’ (Top Marathi News)

दिव्याची पूजा करताना म्हणावयाची प्रार्थना

दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजस: तेज उत्तमम ।
गृहाणं मत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भव:॥

दीप अमावास्येच्या दिवशी आपल्या घरातील सर्व नवीन आणि जुन्या दिव्यांसोबतच कणकेचे दिवे तयार करून त्यांची पूजा देखील करावी. या दिवशी कणकेच्या दिव्यांची पूजा करण्याला देखील विशेष महत्व असते. कणकेचा दिवा लावल्यामुळे इच्छापूर्तीसह पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभते. शनी आणि मंगळ दोष दूर होतात. शुभकार्यात कणकेचा दिवा असतो याचाच अर्थ असा आहे, हा दिवा शुभ असून तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा आहे.(Top Trending News)

आजच्या काळात दीप अमावास्येची ओळख गटारी अमावस्या अशी झाली आहे. मात्र ही ओळख अतिशय चुकीची आणि आपल्या संस्कृतीच्या विरोधातली आहे. दीप अमावास्येच्या दुसऱ्या दिवसापासून हिंदू लोकांचं अपवित्र असा श्रावण महिना चालू होतो. हा अतिशय पवित्र आणि शुद्ध महिना असल्याने या महिन्यात बहुतकरून लोकं नॉन व्हेज खात नाही. त्यामुळे अनेक लोकं दीप अमावसेच्या दिवशी नॉन व्हेज खातात, मद्यपान करतात परंतु ही दीप अमावस्या साजरी करण्याची चुकीची प्रथा आहे. जी अमावस्या आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देते, त्याच अमावास्येच्या दिवशी लोकं चुकीच्या प्रथा पाळताना दिसतात. (Top Marathi Headline)

Deep Amavasya

दीप अमावस्या कथा

ऐका दीपकांनो, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला एक सून होती. तिनं एके दिवशी घरांतला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला.

इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाच आळ आला आहे, तेव्हां आपण तिचा सूड घ्यावा, असा सर्वांनी विचार केला. त्यांनीं रात्रीं हिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसरे दिवशी हिची फजिती झाली. सासू-दिरांनी निंदा केली, घरांतून तिला घालवून दिली. हिचा रोजचा नेम असे, रोज दिवे घांसावे, तेलवात करावी, ते स्वतः लावावे, खडीसाखरेनं त्यांच्या ज्योती साराव्या, दिव्यांच्या अंवसेचे दिवशीं त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. त्याप्रमाणं ही घरांतून निघाल्यावर तें बंद पडलं. (Latest Marathi News)

पुढं ह्या अवसेच्या दिवशीं राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखालीं मुक्कामास उतरला. तिथं त्याच्या दृष्टिस एक चमत्कार पडला. आपले सर्व गांवातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांपाशी गोष्टी करीत आहेत. कोणाचें घरीं जेवावयास काय केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली, वगैरे चौकशी चालली आहे. सर्वत्रांनी आपाआपल्या घरीं घडलेली हकीकत सांगितली.  त्यांच्यामागून राजाच्या घरचा दिवा सांगूं लागला. बाबांनो, काय सांगू ? यंदा माझ्यासारखा हतभागी कोणीं नाहीं. मी दरवर्षी सर्व दिव्यांत मुख्य असायचा, माझा थाटमाट जास्ती व्हायचा, त्याला यंदा अशा विपत्तींत दिवस काढावे लागत आहेत. इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं. असं होण्याचं कारण काय ? (Marathi Top News)

===============

हे देखील वाचा : Jai Singh : मुघलांचे मन जिंकणारा जयसिंह, पण औरंगजेबाचा रोष ओढवून घेणारा राजा

===============

मग तो सांगूं लागला. बाबांनो, काय सांगूं ? मी ह्या गांवच्या राजाच्या घरचा दिवा. त्याची एक सून होती, तिनं एके दिवशीं घरांतला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरानें विचार केला, हा आपल्यावर उगाच आळ घातला आहे, तेव्हां आपण तिचा सूड घ्यावा. असा सर्वांनी विचार केला. रात्रीं तिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणांत नेऊन टाकली. दुसरे दिवशी तिची फजिती झाली. सासू-दिरांनीं निंदा केली, घरांतून तिला घालवून दिली. म्हणून मला हे दिवस आले. ती दर वर्षी माझी मनोभावं पूजा करीत असे. जिथं असेल तिथं खुशाल असो ! असं म्हणून तिला आशीर्वाद दिला. (Top Stories)

घडलेला प्रकार राजानं श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाहीं अशी त्याची खात्री झाली. घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिलें आहे काय म्हणून चौकशी केली. तिला मेणा पाठवून घरीं आणली. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. साऱ्या घरांत मुखत्यारी दिली. ती सुखानं रामराज्य करूं लागली. तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो ! ही सांठा उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण. (Social Updates)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.