उद्या सर्वत्र दीप अमावस्या साजरी केली जाणार आहे. आषाढ महिन्याचा शेवट आणि श्रावण महिन्याची सुरुवात असेलेली ही अमावस्या खूपच महत्वाची आणि खास असते. तसे पाहिले अनेक लोकं अमावस्या ही तिथी अशुभ असल्याचे मानतात. मात्र अमावस्या दिवस चांगला असून तो भगवान विष्णूंना समर्पित असतो. त्यातही दीप अमावस्या खूपच चांगली समजली जाते. या दिवशी घरातील सर्वच दिवे काढले जाते. सर्वच दिव्यांना स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते. घरातील चांदीचे, लोखंडी, पितळी, नवे आणि जुने दिवे बाहेर काढले जातात त्यांना स्वच्छ करून मग संध्याकाळी किंवा सकाळी या दिवसाची पूजा करतात आणि त्यांना नैवेद्य दाखवतात. (Marathi News)
मात्र यासोबतच दीप अमावास्येला जर कणकेचा दिवा बनवून तो लावला तर फारच शुभ समजले जाते. ही अमावस्या चातुर्मासातील पहिली अमावस्या तिथी आहे. यानंतर श्रावण महिना सुरू होतो. यंदा ‘ ‘ २४ जुलैला आहे. हिंदू धर्मात अमावस्या तिथी भगवान विष्णूला समर्पित आहे. त्यामुळे अमावस्येला भगवान विष्णूची पूजा करणे चांगले समजले जाते. याशिवाय पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी या दिवशी तर्पणही करण्याची प्रथा आहे. अमावस्या तिथीला पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचं विशेष महत्त्व आहे. नदीत स्नान केल्यानंतर पितरांना नैवेद्य दाखवला जातो. (Deep Amavasya News)
दीप अमावस्या तिथी मुहूर्त
दीप अमावस्येची सुरुवात गुरुवार, २४ जुलै रोजी पहाटे २.२८ वाजता होणार असून, याची समाप्ती शुक्रवार, २५ जुलै रोजी दुपारी १२.४० वाजता होईल. यावेळी दीप पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त सकाळी ५.३८ ते सकाळी ७.२० पर्यंत असेल. ‘चर’ मुहूर्त सकाळी १०.३५ पर्यंत राहील. त्यामुळे अमावस्या तिथी गुरुवार, २४ जुलै रोजी आहे. दीप अमावस्येला हर्ष योगासह अनेक शुभ योगायोग तयार होत आहेत. त्यापैकी गुरु पुष्य योग, अमृत सिद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि शिववास योग हे प्रमुख योग तयार होणार आहेत. यावेळी दिव्यांची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. (Todays Marathi HEadline)
मुख्य म्हणजे दीप अमावस्या हा पितृ तर्पण म्हणजेच पितरांसाठी देखील एक उत्तम दिवस आहे. या दिवशी पितरांची पूजा केली जाते आणि त्यांना नैवेद्य अर्पण केले जाते. ज्यामुळे घरात जर पितृ दोष असेल तर घरातील पितृदोष नाहीसा होतो अशी मान्यता आहे. काहीजण आपल्या घरातील मुलांचे देखील दिव्यांनी औक्षण करतात. याचे कारण म्हणजे आपल्या घरातील वंशाच्या दिव्याला यादिवशी पुजले जाते. घरातील मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली जाते. (Top Trending News)
दीप अमावास्येच्या दिवशी घरातील सर्वच दिवे तुम्ही देवासमोर लावले तरी या दिवशी कणकेच्या दिव्याचे महत्व जरा जास्त असते. या दिव्यांची पूजा खास गोड कणकेच्या दिव्यांनी पूजा करण्याची परंपरा आहे. यादिवशी कणकेच्या दिव्यांना अतिशय महत्त्व असतो. यादिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी दानधर्म आणि कार्य केले जाते. यादिवशी कणकेचा किंवा ज्वारीचा दिवा करुन घरातील दक्षिण दिशेला लावला पाहिजे. कारण दक्षिण दिशा ही पितरांची मानली जाते. हा कणिकेचा दिवा गुळाच्या पाण्यापासून बनवला जातो. त्यामुळे पितरांना प्रसन्न करण्यासाठी आणि पितृदोषापासून मुक्तीसाठी दीप अमावस्येला एक कणकेचा दिवा दक्षिण दिशेला लावा. अनेक ठिकाणी कणकेमध्ये थोडीशी हळद टाकून पाण्याने भिजवून मग त्याचा दिवा बनवून देखील लावला जातो. यंदाच्या दीप अमावास्येला तुम्ही देखील तुमच्या पूर्वजांची दिवा तयार करून लावा. (Latest Marathi News)
==========
हे देखील वाचा : Shravan : श्रावण महिना कधीपासून सुरु होतोय? पहिला श्रावणी सोमवार कधी?
===========
दीप अमावस्या कथा १
पूर्वी एका नगरीमध्ये एक राजा राहत होता. त्या राजाची एक सून होती ती दररोज देवपूजा करीत असे, नित्य नियमाने ती दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजा करत असे आणि त्यांना नैवेद्य अर्पण करत असे. एक दिवस राणीने गुपचूप अन्न ग्रहण केले आणि त्याची राणीला विचारणा केली असता राणी नाही म्हणाली आणि त्याचा आरोप राणीने उंदरांवर टाकला. उंदरांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी राणीला अद्दल घडवायचे ठरवले. उंदरांनी राणीची चोळी रात्री गुपचूप पाहुण्यांच्या अंथरुणामध्ये नेऊन टाकली त्यामुळे राणीची बदनामी झाली, घरातील सर्वांनी राणीवर आरोप केले आणि राणीला हाकलवून दिले. (Top Marathi HEadline)
पुढे एके दिवशी राजा शिकारीवरून येत असता रात्री गावाबाहेर एका ठिकाणी थांबला. त्याला गावातील सर्व दिवे एक झाडावरती बसलेले दिसले आणि सर्व दिवे एकमेकांना घरी काय गोड नैवेद्य भेटला आणि कशी पूजा झाली त्याबद्दल सांगत होते परंतु राजाचा दिवा म्हणाला मला नैवेद्य मिळाला नाही माझी पूजा झाली नाही कारण राणीवर खोटा आरोप झाला आणि तिला काढून दिले. त्यांचे हे संभाषण राजाने ऐकले. तो दिवस होता दीप अमावसेचा. राजा घरी गेला त्याने परत सर्व प्रकरणाची तपासणी केली. राणी निर्दोष अढळल्यावर त्याने तिची क्षमा मागितली आणि तिला सन्मानाने राज्यात परत आणले. राणीने केलेल्या दीप पूजेमुळे तिच्यावरील आळ टळला. राणीला दिवा पावला. (Top Stories)
दीप अमावस्या कथा २
दीप अमावास्येची अजून एक कथा सांगितली जाते. तमिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला विनीत व गौरी अशी दोन मुलं होती. लहानपणीच दोघांनी असं ठरविले की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनीतच्या मुलांना द्याव्या. पुढे गौरीला तीन मुली व विनीतला तीन मुले झाली. गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुणा होते. गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती. (Marathi Top News)
परंतु विनीतचे दैव फिरल्याने तो दरिद्री झाला. भाऊ गरीब झालेला पाहून ती वचन विसरली व पहिल्या दोन मुलींची लग्न श्रीमंतांच्या घरात केली.नंतर सगुणेचा विचार करू लागली. गौरीने (आईने) भावाला दिलेले वचन मोडले ही गोष्ट ऐकून सगुणेला वाईट वाटले. तिने विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचे ठरविले. गौरी तिच्यावर संतापली. परंतु तिने हेका सोडला नाही. लग्न होऊन ती विनीतच्या घरी आली.गरिबीतच संसार सांभाळू लागली. (Latest Marathi HEadline)
एके दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी गेला असता त्यांची रत्नजडीत अंगठी जी कट्ट्यावर ठेवली होती ती एका घारीने उचलून नेली. अंगठी घेऊन घार सगुणेच्या घराच्या छपरावर येऊन बसली. ती खाद्यवस्तू नाही असे समजून तिथेच टाकून उडून गेली. नंतर ती सगुणेला मिळाली. ती राजाची आहे हे समजताच तिने ती राजाला नेऊन दिली. राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काही हवे तर माग, असे सांगितले. सगुणेने मागितले की, ‘फक्त येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असावे व दुसर्या कोणाच्याच घरात ते दिवे लावू नयेत असा हुकूम काढा.’’ राजाने तसे केले. (Social Updates)
==========
हे देखील वाचा : Deep Amavasya : ‘तिमिरातुनी तेजाकडे’ जाण्याचा संदेश देणारी दीप अमावस्या
===========
मग शुक्रवारी सगुणेने सर्व घरभर दिवे लावले. तिने उपवास केला. राज्यात कोणाच्याच घरात दिवे नव्हते. आपल्या दोन्ही दीरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले व येणार्या सवाष्ण बाईकडून परत जाणार नाही अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने जाणार्या बाईकडून परत येणार नाही अशी शपथ घाल. त्याप्रमाणे त्यांनी केले. अशा रितीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व अलक्ष्मी घरातून निघून गेली. या घटनेमुळे सगुणेच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरात धनधान्य खूप झाले. राज्यातले लोक सगुणेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics