एण्ड टीव्हीवरील मालिका ‘एक महानायक – डॉ. बी. आर. आंबेडकर’ मध्ये उच्चभ्रू व निम्न जातीमधील चाळीवरून सुरू असलेला वाद आणखी एक अनपेक्षित वळण घेणार आहे. उच्चभ्रू जातीमधील लोक निम्न जातीमधील लोकांना आणखी एक मोठे आव्हान देतात, ज्यांच्याकडे ते आव्हान स्वीकारण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नसतो.
हे आव्हान जिंकल्यास त्यांना चाळीमधून बाहेर काढल्यानंतर गमावलेले त्यांच्या डोक्यावरचे छत पुन्हा मिळेल. भीमराव (अथर्व) यांनी घरे परत मिळवण्यासाठी आणि उल्हास सेठच्या (फारूख खान) दुष्ट योजना धुळीस मिळवण्यासाठी आव्हान जिंकण्याकरिता सर्वकाही करण्याचा निर्धार केला आहे. पण त्यांच्या प्रयत्नांना फळ मिळेल का की ते आणि चाळीमधील रहिवाशी आणखी एका दुष्ट योजनेला बळी पडतील?
या एपिसोडबाबत सांगताना अथर्व ऊर्फ भीमराव म्हणाले, ”भीमराव आणि चाळीमधील सहकारी रहिवाशांना चाळीमधून बाहेर काढण्यात आले आहे आणि त्यांनी डोक्यावर छत असण्यासाठी लढा देणे गरजेचे आहे. आणि आता उच्चभ्रू जातीमधील लोकांनी त्यांना आणखी एक मोठे आव्हान दिले आहे, ज्यामुळे त्यांच्यासमोर त्यांच्या चाळीच्या संरक्षणासाठी सर्व विषमतांना झुगारून लढण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही.
====
हे देखील वाचा: ‘रूप नगर के चीते’ लवकरच झळकमार रुपरे पडद्यावर
====
हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा क्षण असणार आहे. आता हार किंवा जीत ठरवणार चाळीबाबतचा निर्णय!” पाहत राहा ‘एक महानायक – डॉ. बी. आर. आंबेडकर’ दर सोमवार ते शुक्रवार रात्री ८.३० वाजता फक्त एण्ड टीव्हीवर!