एखाद्या व्यक्तीवर मृत्यू कधी ओढावेल हे कोणालाच माहिती नसते. प्रत्येक व्यक्तीला एक ना एक दिवस तरी आपला संसार, घर, मुलं-बाळ मागे सोडून जावेच लागते. अशातच वैज्ञानिकांनी काही मृत्यूसंदर्भात संशोधन केले. परंतु अद्याप हे रहस्य आहे की, मृत्यूनंतर व्यक्तीसोबत नक्की काय होते. त्यांच्या डोक्यात आयुष्याच्या अखेरच्या क्षणावेळी नक्की काय सुरु असते हे जाणून घेण्यासाठी अद्याप ही काही संशोधने केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर वैज्ञानिकांनी मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या चार अशा व्यक्तींच्या डोक्यांत नक्की काय चालले आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान त्यांच्या डोक्यात एक वेगळीच अॅक्टिव्हिटी सुरु असल्याचे कळले. डोक्यात गामा वेब्चा स्तर अधिक असल्याचे दिसले. गामा वेब्स जुन्या आठवणींसह डोक्यात होण्याऱ्या वेगवान प्रक्रियेशी संबंधित आहे. (Death Mystery)
यापूर्वी झालेल्या शोधात ‘नीयर डेथ एक्सपिरियंस’ च्या कथा फार चर्चेत आल्या होत्या. या कथांमध्ये मरणाऱ्या व्यक्तीला एका भोगद्यासारखे काहीतरी दिसत होते. दुसऱ्या बाजूने लख्ख प्रकाश येण्यास काही ओळखीचे चेहरे सुद्धा दिसल्याचा दावा करण्यात आला होता.
आता युएस मिशिगन युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी असे म्हटले आहे की, त्यांना या व्यक्तींच्या डोक्यात काय चालले आहे यावर अभ्यास केला. सर्वजण वेंटिलेटवर होते आणि कोमात गेले होते. वेंटिलेटरचा सपोर्ट काढल्यानंतर इसीजी आणि ईईजी सिंग्नल तपासले. या शोधात वैज्ञानिकांना असे दिसून आले की, दोन व्यक्तींच्या शरिरात अचानक ऑक्सिजनचा स्तर खाली आला. त्याचसोबत दोघांमध्ये गामा अॅक्टिव्हिटी वेगाने होऊ लागली.याआधी सुद्धा झालेल्या शोधात असे समोर आले होते की, ब्रेन डेडच्या केसमध्ये लख्ख प्रकाश व्यक्तीला दिसतो. याचसोबत काही परिचित चेहरे ही दिसतात. मृत्यूनंतर विजन क्रिएटची क्षमत डेवलप होते. (Death Mystery)
हेही वाचा- बुद्ध पौर्णिमेला असते अनन्यसाधारण महत्त्व
हे तर वैज्ञानिक दृष्टीकोनातून झाले. पण गरुड पुराणात सुद्धा मृत्यूवेळी व्यक्तीला नक्की कसे अनुभव येतात या बद्दल ही सांगितले गेले आहे. त्यात असे म्हटले आहे की, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा व्यक्तीला दिव्य दृष्टी लाभते. त्या व्यक्तिला जग अधिक विस्तृत असल्याचे दिसते. त्याला आपल्या संपूर्ण आयुष्यातील घटना आठवतात. काही क्षणासाठी का होईना त्याच्या डोळ्यांसमोर संपूर्ण आयुष्याचे एक चित्र उभं राहते. त्यानंतर तो आपल्या नव्या आयुष्याच्या प्रवासाला सुरुवात करतो.
