Home » फिरोज खान यांच्या प्रवेशावर पाकिस्तानात लावली होती बंदी, तर एअर होस्टेससाठी पत्नीला दिला होता घटस्फोट

फिरोज खान यांच्या प्रवेशावर पाकिस्तानात लावली होती बंदी, तर एअर होस्टेससाठी पत्नीला दिला होता घटस्फोट

by Team Gajawaja
0 comment
feroz khan death anniversary
Share

बॉलिवूडमधील दिग्गज, श्रेष्ठ आणि जेष्ठ अभिनेते म्हणून फिरोज खान ओळखले जातात. आपल्या अभिनयासोबतच त्यांनी आपल्या लुक्सने तुफान वाहवा मिळवली. फिरोज खान म्हणजे अतिशय आकर्षक आणि चार्मिंग व्यक्तिमत्व फॅन्स तर फॅन्स बॉलिवूडमधील अभिनेत्री देखील त्यांच्या व्यक्तिमत्वाने आणि दिसण्यामुळे घायाळ व्हायच्या. चित्रपटांसोबतच फिरोज खान त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तुफान गाजले. आज फिरोज खान यांची पुण्यतिथी (feroz khan death anniversary) आहे, त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याबद्दल अधिक माहिती. 

फिरोज खान यांचा जन्म २५ सप्टेंबर १९३९ रोजी कर्नाटकमधील म्हैसूर येते झाला. त्यांचे वडील अफगाणिस्तानमधून भारतात आले आणि इथेच कायमचे वास्तव केले. त्याचे मूळ घर अफगाणिस्तानमधील तनोली, गजनी इथे होते. तर त्यांची आई इराणच्या होत्या. यामुळे अफगाणी, इराणी आणि भारतीय अशा तिन्ही संस्कृतींचा प्रभाव त्यांच्यावर पडला. आपल्या स्टायलिश अंदाजमुळे त्यांनी बॉलिवूडमध्ये एक वेगळीच ओळख निर्माण केली. त्यांना त्यांच्या लुक्समुळे बॉलिवूडमध्ये कॉऊबॉय म्हणून ओळखले जायचे. आपल्या अभिनयाच्या करिअरमध्ये त्यांनी चॉकलेट हिरोपासून खलनायकपर्यंत अनेक भूमिका साकारल्या आणि यश मिळवले. फिरोज खान यांनी त्यांच्या काळातील सर्वच अभिनेत्रींसोबत काम केले. (feroz khan death anniversary)

फिरोज यांनी १९६० साली आलेल्या ‘दीदी’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या दरम्यानच त्याची भेट एका आकर्षक अशा ‘सुंदरी’ या युवतीसोबत झाली आणि त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. जवळपास पाच वर्ष त्यांनी डेटिंग केले आणि नंतर लग्न करण्याचा निर्णय घेत १९६५ साली लग्न केले. लग्न झाल्यानंतर त्यांना लैला खान आणि फरदीन खान ही दोन मुलं झाली. दोन मुलांचे वडील झाल्यानंतरही त्यांचा जीव एका एयरहोस्टेसवर जडला. लग्नाच्या वीस वर्षांनी अर्थात १९८५ साली त्यांनी सुंदरी यांच्यापासून घटस्फोट घेतला. (feroz khan death anniversary)

पुढे त्यांनी त्या एयरहोस्टेससोबत बंगळुरूमध्ये लिव्ह इनमध्ये राहण्यास सुरुवात केली. बराच काळ ते दोघं लिव्ह इनमध्ये राहिले. मात्र, दुर्दैवाने त्यांचे नाते संपुष्टात आले. फिरोज खान यांच्याबद्दल असे देखील म्हटले जाते की, त्यांना अभिनेत्री मुमताज देखील खूप आवडायच्या. त्यांना मुमताज यांच्यासोबत लग्न करण्याची खूप इच्छा होती. मात्र नशिबाला काही वेगळेच पाहिजे होते. पुढे त्यांचा मुलगा असलेल्या फरदीन खानने मुमताज यांच्या मुलीशी नताशाशी लग्न केले आणि फिरोज खान मुमताज व्याही झाले. (feroz khan death anniversary)

 

फिरोज खान त्यांच्या ‘ताजमहाल’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी पाकिस्तानमध्ये गेले होते, तेव्हा त्यांनी बिनधास्तपणे पाकिस्तान विरोधात वक्तव्य केले होते. फिरोज खान यांनी लाहोरमध्ये भारताचे कौतुक करताना म्हटले होते की, “भारत हा एक सेक्युलर देश आहे. तेथील मुस्लिम वेगाने प्रगती करत आहे. पाकिस्तानला इस्लाम नावावर तयार करण्यात आले. मात्र इथे परिस्थिती खूपच खराब आहे. इथे लोक एकमेकांचेच शत्रू बनले आहे.” फिरोज यांच्या या वक्तव्यांनंतर पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती असलेल्या जनरल परवेज मुशर्रफ यांनी फिरोज खान यांच्या पाकिस्तानमध्ये येण्यासाठी बंदी घातली. (feroz khan death anniversary)

आपल्या अभिनयासोबतच फिरोज खान त्यांच्या मैत्रीसाठी देखील ओळखले जायचे. त्यांची विनोद खन्ना यांच्यासोबत असलेली मैत्री खूपच प्रसिद्ध होती. या दोघांची जोडी चित्रपटात दिसणार म्हणजे सिनेमा हिट होणार असेच समजले जायचे. १९८० साली ‘कुर्बानी’ सिनेमाने विनोद खन्ना यांना यशाच्या शिखरावर नेले. या सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शक फिरोज खान होते. सोबतच त्यांनी सिनेमात एक भूमिका देखील साकारली होती.  यादरम्यानच त्यांची मैत्री घट्ट झाली.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.