प्रत्येक व्यक्तीला आपल्या कामामुळे आपली वेगळी ओळख निर्माण करावी असे वाटत असते. त्यामुळे लोक दिवसरात्र मेहनत करताना दिसतात. त्यामुळे त्यांना ऑफिसमध्ये प्रमोशन मिळतेच आणि आणखी अधिक जोमाने काम करण्याची त्यांची इच्छा होते. परंतु तुम्ही केलेली मेहनत जर एखादा तुमचा सहकारी घेऊन जात असाल तर खुप वाईट वाटते. कारण तुम्ही याबद्दल तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला किंवा कोणत्याही सहकाऱ्याला सांगू शकत नाही. परंतु अशी गोष्ट तुमच्यासोबत वारंवार होत असेल तर तुमचे प्रमोशन थांबू शकते. त्यामुळे काही गोष्टींची काळजी घेत आणि त्यांच्याशी गोडगुलाबीने वागल्यानंतर तुम्हाला सामना कराव्या लागणाऱ्या या काही गोष्टी कमी होऊ शकतात.(Deal with credit takers)
ऑफिसच्या लोकांसोबत कशा प्रकारे वर्तवणूक कराल
-हताश होऊ संतप्त होऊ नका
जर तुम्ही तुमच्यावरील ताबा सोडल्यास तर तुमची इमेज ही इतरांसमोर वाईट होऊ शकते. अशाच कोणत्या ही गोष्टीवर संतप्त होण्यापासून थोडे दूर रहा. राग येणे स्वाभाविकच आहे. पण प्रोफेशनल इमेज कायम ठेवण्यासाठी तुम्ही स्वत:च्या भावनांवर नियंत्रण ठेवणे ही गरजेचे आहे.
-वरिष्ठांची मदत घ्या
जर तुमच्या कामाचे श्रेय एखादा दुसराच घेऊन जात असेल तर विश्वासू वरिष्ठासोबत यावर चर्चा करा आणि त्याला या बद्दल समजावून सांगा. ऐवढेच नव्हे तर तुमच्या कामात तुम्ही किती प्रगती करत आहात ते सुद्धा सांगण्यास विसरु नका. कारण जेव्हा तुमचा सहकारी तुमच्या कामाचे श्रेय लाटण्यचा प्रयत्न करेल तेव्हा तुमच्या वरिष्ठांना तुम्ही केलेल्या कामांबद्दल अधिपासूनच माहिती असेल.

-प्रत्येक गोष्ट सांगण्यापासून दूर रहा
काही लोक आपले काम पूर्ण होण्यापूर्वीच सर्व प्लॅन आणि अजेंडा लोकांसोबत शेअर करता. त्यामुळे एखाद्या सहकाऱ्याला तुमच्या कामाजी सर्व माहिती मिळतेच. पण तो तुमची आयडिया सुद्धा चोरतो आणि त्यानुसार काम करत तुमचे क्रेडिट घेऊन जातो. त्यामुळे प्रोफेशन लाइफ मध्ये व्यावहारिक व्हा आणि सर्व गोष्टी सांगण्यापासून दूर रहा.(Deal with credit takers)
हे देखील वाचा- स्वत: ची बेवसाइट तयार करताना ‘या’ गोष्टी जरुर लक्षात ठेवा
-मीटिंगमध्येच विचारा प्रश्न
जर एखादा काम करतोय तर त्याला त्याची पूर्ण माहिती असते. अशातच तुमच्या समोरील व्यक्ती तुमचे क्रेडिट घेऊ पाहत असेल तेव्हाच त्याला तुमच्या कामासंदर्भातील बरीक बारीक गोष्टी विचारा. त्यामुळे त्याचा खोटारडेपणा समोर येईल आणि तुम्हाला तुमच्या कामाचे श्रेय नक्कीच मिळेल.
तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे श्रेय एखादा लाटत असेल तर या गोष्टी जरुर लक्षात ठेवा. पण तुम्ही सुद्धा एखाद्याच्या कामाचे श्रेय घेण्यापासून दूर रहा. जर तुम्ही ऑफिसमध्ये एक टीम म्हणून काम करता तेव्हा त्याचे श्रेय हे एकट्याचे नसते तर सर्वांचेच असते हे लक्षात ठेवा. अशातच तुमच्यासोबत इतरांचीही ग्रोथ होईलच पण तुम्हाला ही काही चार नव्या गोष्टी समजतील.