हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला फार महत्व असते. मार्गशीर्ष महिन्यात विविध व्रत-सण येतात. अशाच प्रकारे प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. दत्ताला त्रिदेवांचे अवतार मानले जाते. या दिवशी दत्ताची विशेष पुजा केली जाते. तर काही ठिकाणी भजनाचे कार्यक्रम, भंडारा आयोजित केला जातो. तसेच पालखी ही निघते. दत्ताची आजच्या दिवशी केली जाणारी पूजा ही त्रिदेव ब्रम्हा, विष्णु आणि महेश यांना सपर्मित असते. तर दत्त जयंती का साजरी केली जाते आणि त्याचे काय महत्व आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊयात. (Datta Jayanti)
भगवान दत्तात्रेय याची पौराणिक कथा
पौराणिक कथेनुसार, एकेकाळी माता पार्वती, लक्ष्मी आणि सरस्वती यांना आपल्या पतिव्रत धर्माचा अभिमान झाला होता. नारद मुनींना त्यांचा हा अभिमान तोडायचा होता. त्यासाठीच तिघींच्या समोर माता अनसूया हिच्या पतिव्रत धर्माचे त्यांनी गुणगान केले. यामुळे तिन्ही देव्यांना माता अनसूया हिचा राग येऊ लागला आणि त्यांनी त्रिवेदांना माता अनसूया हिचे पतिव्रत धर्म तोडण्यासाठी सांगितले.

त्रिदेव माता अनसूया हिचे व्रत तोडण्यासाठी पोहचले पण त्याबद्दल माता अनसूया हिला कळले. जेव्हा त्रिदेव अनसूया हिच्या येथे गेले असता मातेने त्यांच्यावर अत्रि ऋषींच्या चरणांचे जल शिंपडले. त्यामुळे तिन्ही देव हे बाल अवस्थेत आले.माता अनसूया ही त्यांना आपल्या मुलांप्रमाणे सांभाळू लागली.(Datta Jayanti)
हे देखील वाचा- 2025 च्या महाकुंभ मेळाव्याची जोरदार तयारी
‘या’ कारणास्तव साजरी केली जाते दत्तजयंती
त्यानंतर तिन्ही देव्यांना आपली चुक कळली आणि माता अनसूया हिच्याकडे येत त्यांनी माफी सुद्धा मागितली. माता अनसूया यांनी असे म्हटले की, या तिघांनी माझे दूध प्यायले आहे. त्यामुळे त्यांना बालरुपातच रहावे लागेल. त्यानंतर तिन्ही देव्यांनी आपल्या-आपल्या अंशातून एक नवा अंश तयार केला. ज्याचे नाव दत्तात्रय असे ठेवले. अशा प्रकारे दत्ताचा जन्म झाला. अशी मान्यता आहे की, दत्ताचा जन्म हा मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला झाला होता. याच कारणास्तव दत्त जयंती साजरी केली जाते.
तर दत्त जयंती निमित्त पूजा करण्यासाठी दत्ताच्या मुर्तीला किंवा प्रतिमेला गंगेच्या पाण्याने अभिषेक करावा. त्यानंतर धूव, दिवा, फुले आणि नैवेद्य दाखवावा. तर दत्ताला पांढऱ्या रंगाची फुल अर्पण करावीत. आजच्या दिवशी अवधूत गीतेचा पाठ केल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते असे सांगितले जाते.