मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला श्री सद्गुरू दत्तात्रयांचा जन्मोत्सव अर्थात दत्त जयंती साजरी केली जाते. ४ डिसेंबर रोजी दत्त जयंतीचा उत्सव साजरा होणार आहे. पौर्णिमा तिथी ४ डिसेंबरला सकाळी ८:३७ वाजता सुरू होऊन ५ डिसेंबरला पहाटे ४:४३ वाजता संपत आहे. दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि शिव या त्रिमूर्तींचे एकत्रित रूप आहे. भगवान दत्तात्रेयांना मानणारा आणि त्यांची पूजा करणारा मोठा समाज आहे. याला अनेक लोकं दत्त संप्रदाय देखील म्हणतात. दत्त जयंतीच्या निमित्ताने ‘श्री गुरुचरित्र’ या पोथीचे पारायण करण्याची मोठी परंपरा आहे. ५२ अध्याय असलेल्या या पोथीचे अनेक लोकं पारायण करतात आणि दत्त जयंतीला त्याचे पारणे करतात. (Datta Jayanti 2025)
‘श्री गुरुचरित्र’ या ग्रंथाचे ५२ अध्याय आहेत तर काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत. श्री दत्तात्रेय महा प्रभूंनी नामधारकास अती सामान्यांना गुरुप्रणीत मार्ग मिळावा म्हणून श्री गुरु चरित्र सांगितले आहे. श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो. श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे, असे सांगितले जाते. श्री गुरुचरित्र इसवी सनाच्या १४व्या शतकात श्रीनृसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्रीगुरूंच्या शिष्यपरंपरेतील श्रीसरस्वती गंगाधर यांनी १५व्या शतकात लिहिला. श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. संकल्प-पूर्तीसाठी श्रीगुरुचरित्र-वाचनाची एक खास पद्धती आहे. जे त्याप्रमाणेच आपण त्याचे वाचन केले, पारायण केले तर नक्कीच आपल्याला आपले इच्छित फळ मिळते. मात्र या ग्रंथाचे पारायण करण्यासाठी काही कठोर नियमांचे पालन करावे लागते. याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहेत. हा ग्रंथ सात दिवसांतच किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे. मग गुरुचरित्र ग्रंथ पोथीच्या पारायणाचे नक्की कोणते नियम आहेत, चला जाणून घेऊया. (Marathi News)
श्रीगुरुचरित्र या ग्रंथाचे ५२ अध्याय असून ओवीसंख्या ७,४९१ इतकी आहे. काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत. त्याची विभागणी ज्ञानकाण्ड, कर्मकाण्ड, भक्तिकाण्ड यांचा समन्वय यात साधला आहे. या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या लीलांचे चमत्कृतिपूर्ण वर्णन रसाळपणे केले आहे. इतकेच नव्हे तर श्रीगुरुंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लीलांचे कथात्मक निरुपण अतिशय सुबोध व प्रासादिक भाषेत केले आहे. अतिशय प्रसिद्ध आणि दैवी शक्तींनी परिपूर्ण असा हा ग्रंथ वाचण्याची संधी खूप कमी लोकांना मिळते. या ग्रंथामधून मनुष्याला पडणाऱ्या सर्वच प्रश्नांची उत्तर अगदी सुटसुटीत पद्धतीने देण्यात आली आहे. या ग्रंथाचे दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर अनेक घरांमध्ये पारायण केले जाते. (Todays Marathi Headline)

=========
Lord Vishnu :भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा वास असलेल्या केळीच्या झाडाचे धार्मिक महत्त्व
=========
गुरुचरित्राचे पारायण करणे मोठी भाग्याची बाब आहे. या पारायणामुळे आपल्या आयुष्यावर अनेक सकारत्मक परिणाम होतात. घरामध्ये गुरूचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते. पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात. विशिष्ट समस्यांवर जसे लग्न, शिक्षण,करिअर, आरोग्य, यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो. आपल्या कुंडलीतील ग्रह-नक्षत्रे, पितृ दोष, प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार सांगतात. (Top Marathi Headline)
गुरुचरित्राचे पारायण करताना खालील गोष्टी लक्षात ठेवा
– श्री गुरु चरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी. कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदगमनाचा दिवस आहे. (Latest Marathi News)
– श्री गुरु चरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैव्यद्य खाऊ घालावा
– श्री गुरु चरित्र चे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे. वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र, एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. व श्री गणपती अथर्वशीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी.
– श्री गुरु चरित्राचे वाचन पहाटे ०३ ते सायंकाळी ०४ या दरम्यान करावे. दुपारी १२ ते १२.३० ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्या वेळेस पारायण वाचन बंद ठेवावे. (Top Stories)
– श्री गुरु चरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये. आपली आई, पत्नी व बहीण यांच्या हाताचे अन्न खाण्यास हरकत नाही. उपवास करू नये. दोन्ही वेळेस (सकाळ ..संध्याकाळ) एक धान्य फराळ करावा. काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही.
– श्री गुरु चरित्र वाचण्याच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये, स्वतः च्या हाताने दाढी करावी. तसेच या काळात चामड्या ऐवजी नॉयलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे. श्री गुरु चरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रम्हचर्य पाळावे. (Top Marathi News)
– श्री गुरु चरित्र वाचनाच्या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये. स्वतः च्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेस श्री गुरु चरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करावे, अर्धवट सोडू नये. वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे.
-सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरु चरीत्राच्या पोथीस नैव्यद्य दाखवून आरती करावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे. (Latest Marathi Headline)
– सप्ताहवाचनापुर्वी विधियुक्त संकल्प सोडावा. त्या सात दिवसात ब्रम्हचर्य पाळावे. संध्याकाळी उपवास करावा. शक्यतो सोहळ्याने वाचावे. रात्री भुमीशायी देवाजवळच चटईवर झोपणे. डाव्याकुशीवर झोपले असता संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात.
– सप्ताहपुर्ण झाल्यावर, सुपारीतुन दत्त महाराजांचे विसर्जन करणें. आणि नैवेद्य दाखवुन समाराधना करणें. वाचनास बसल्यावर मधेच आसन सोडुन ऊठु नये. त्यावेळी ईतरांशी बोलु नये. सप्ताहकाळात हविष्यान्न घ्यावेत. सप्ताहाचे सात दिवस नित्य प्रातःकाळी काकड आरती, संध्याकाळी प्रदोषारती व रात्री शेजारती करावी. दुपारच्या महापूजेत पोथीची पुजा करताना शक्य तर महानैवेद्यात घेवड्याची भाजी असावी. (Top Trending News)
– श्री गुरु चरित्र सप्ताह हा सात दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करावयाचा असतो. परंतु २१ दिवसात ३ पारायण ,४९ दिवसात ७ पारायण करावयाच्या देखील पद्धती आहेत.
– सात दिवसाच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करावी. सांगतेच्या दिवशी सकाळी १०.३० वाजता श्री दत्त महाराज, श्री कुलदेवता, श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरु चरित्र ग्रंथ करिता नैव्यद्य मांडावा. ग्रंथाचा नैव्यद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा आणि मगच आपण भोजन करावे.
– श्री गुरु चरित्र वाचनाच्या कालावधी मध्ये सुद्धा आपल्या नित्य सेवेत खंड पडू देऊ नये. शक्य तोवर जमिनीवर झोपावे, पलंगावर झोपू नये. (Social News)
==========
Banana Tree : विवाह पंचमीला केळीच्या झाडाची पूजा का केली जाते?
Prayagraj : माघमेळ्यासाठी प्रयागराज सज्ज !
==========
श्री गुरु चरित्र वाचण्याची पद्धत
पहिला दिवस – अध्याय १ ते ९
दुसरा दिवस – अध्याय १० ते २१
तिसरा दिवस – अध्याय २२ ते २९
चौथा दिवस – अध्याय ३० ते ३५
पाचवा दिवस – अध्याय ३६ ते ३८
सहावा दिवस – अध्याय ३९ ते ४३
सातवा दिवस – अध्याय ४४ ते ५३
(टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. आम्ही त्याची हमी देत नाही.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
