Home » Religious : ‘या’ मंदिरात आजही भगवान श्रीनृसिंह सरस्वती यांनी जेवलेले खास ताट मिळते पाहायला

Religious : ‘या’ मंदिरात आजही भगवान श्रीनृसिंह सरस्वती यांनी जेवलेले खास ताट मिळते पाहायला

by Jyotsna Kulkarni
0 comment
Religious
Share

आपल्या सर्वच लोकांची देवावर कमालीची श्रद्धा आहे. अगदी मोजके लोकं असे असतील ज्यांची देवावर श्रद्धा नसेल आणि जे नास्तिक असतील. मात्र बहुतकरून आपण सर्वच लोकं देवावर अपार श्रद्धा असणारे लोकं आहोत. आपल्या पुराणानुसार अनेक दैवी अवतार या पृथ्वीवर आजपर्यंत होऊन गेले आहेत. याचे अनेक पुरावे अनेक खुणा आजही आपल्याला पाहायला मिळतात. आजही अनेक अशी मंदिरं किंवा धार्मिक ठिकाणं आहेत, जिथे आपले देव देवता राहून गेले आहेत असे सांगण्यात येते. यातलेच एक मंदिर म्हणजे शिरोळमधील दत्त मंदिर. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या मुख्य तीन देवतांचे एकत्रित रूप म्हणजे दत्त. श्री दत्त यांनाच त्रिमूर्ती असे म्हटले जाते. (Religious)

श्री दत्तगुरूंना मानणारा आणि त्यांना फॉलो करणारा मोठा समुदाय आपल्याला आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतो. यालाच दत्त संप्रदाय असे म्हटले जाते. दत्त संप्रदायातच नाही पण सर्वच हिंदू धर्मातील लोकांसाठी श्री दत्त गुरु म्हणजे आराध्य दैवत आहे. दत्ताचे आजवर झालेले सर्वच अवतार भक्तांसाठी कायम वंदनीय आहेत. आजही सर्वच भक्त श्री दत्तांच्या ठिकाणांना कायम भेट देतात आणि ते स्वतः ते असल्याची अनुभूती घेतात. असेच एक दत्त ठिकाणांमधील महत्त्वाचे ठिकाण म्हणजे कोल्हापुरातील शिरोळ जिल्ह्यातील ‘भोजनपात्र मंदिर’. श्री दत्तात्रयांचा मुख्य अवतार असलेल्या भगवान नृसिंह यांच्या हाताचे ठसे या मंदिरात आजही आपल्याला पाहायला मिळतात. (Marathi)

कोल्हापूरातल्या शिरोळ तालुक्यात दत्त महाराजांचे अनंत काळ वास्तव्य होते. नृसिंहवाडी हे ठिकाणही त्यापैकीच एक. महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली शिरोळची भूमी देवभूमी म्हणूनच ओळखली जाते. दत्त गुरूंच्या दर्शनासाठी गर्दी करणाऱ्या अनेकांना नृसिंहवाडी माहिती आहे. पण, तिथून जवळच असलेल्या दत्त गुरूंच्या भोजनपात्र मंदिराविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. आज आपण याच खास मंदिराबद्दल माहिती जाणून घेऊया. (Todays Marathi Headline)

Religious

दत्त पुराणातील गुरूचरित्रात या ठिकाणाचा उल्लेख आढळतो. शिरोळच्या नृसिहवाडी मंदिरापासून ६ किमी अंतरावर हे मंदिर आहे. तिथे असलेल्या एका गंगाधर नामक ब्राह्मणाच्या दारात दत्तगुरू भिक्षा मागण्यासाठी गेले. त्या ब्राह्मणाच्या पत्नीने आपल्या गृहद्वारी स्वामी महाराज भिक्षेस आलेले पाहिले. त्यांची आपुलकीने चौकशी करून त्यांना पाय धुवायला पाणी दिले. घरात केवळ जोंधळ्याच्या कण्या शिजलेल्या होत्या. पण, त्या वाढायच्या कशावर या गोंधळात ती माऊली पडली होती. (Top Marathi News)

कारण, घरात काही भांडी शिल्लक नव्हती. तिचा गोंधळ लक्षात घेऊन दत्त महाराजांनी दारात पडलेला एक दगड उचलून आणला. तो स्वच्छ करून त्यावरच कण्या वाढण्यास सांगितल्या. त्या गृहिणीने महाराजांच्या आज्ञेनूसार दगावरच कण्या वाढल्या. महाराजांनीही अगदी मिटक्या मारत चवीने त्या खाल्ल्या. घास उचलताना त्या दगडावरून महाराजांची बोटे फिरत होती. त्या बोटांचे व महाराजांनी हातात घातलेल्या माळेत असलेले शंक, चक्र, पद्य चिन्हे दगडावर उमटली. (Latest Marathi HEadline)

महाराजांनी कण्या खाल्ल्या आणि ते अदृश्य झाले. त्या शिळेवर महाराजांची पाच बोटे आणि चिन्हे आजही त्या पाषाणावर दुध घातल्यावर पूर्णपणे दिसतात. हा काळ शके १३६४ ते १३७६ चा तेव्हा पासून आजतागायत ही पूजा अर्चा सुरू आहे. याकाणी श्री नृहसिंह सरस्वती स्वामींनी माध्यांन काळी भोजन केले. म्हणून या मंदिरास भोजन पात्र मंदिर म्हणतात. (Top stories)

=========

Chaturthi : जाणून घ्या माघ महिन्यात येणाऱ्या द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीचे महत्त्व

=========

सांप्रत भगवान दत्तमहाराज अर्थात श्री नृसिंहसरस्वतींची बोटे उमटलेली ती भोजनपात्ररुपी शिळा त्या ब्राम्हणांच्या वंशजाकडे आहे. तेव्हापासून त्या ब्राम्हणाच्या वंशावर श्रीलक्ष्मीची कृपा आहे. घरी पात्र नसल्यामुळे स्वामी महाराजांनी त्यांच्या अंगणातील एका पाषाणावर अतिप्रेमाने मिटक्या मारून त्या कण्या खाल्या व त्या पाषाणावर आपल्या हाताची शंक, चक्र, पद्य चिन्हानी युक्त अशी पाच बोटे उमटविली ती आजही पाषाणावर दुध घातल्यावर पूर्णपणे दिसतात. स्वामी महाराजांनी त्या साध्वी स्त्रीस या पाषाणाची नित्य त्रिकाळ पूजा अर्चा करण्यास सांगितले. हा काळ शके १३६४ ते १३७६ चा तेव्हा पासून आजतागायत ही पूजा अर्चा सुरू आहे. म्हणूनच श्री नृहसिंह सरस्वती स्वामींनी माध्यांन काळी भोजन केले. म्हणून या मंदिरास भोजन पात्र मंदिर म्हणतात. (Social News)

( टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.