Home » मालिकेतून प्रथमच बगाड यात्रेचं दर्शन

मालिकेतून प्रथमच बगाड यात्रेचं दर्शन

by Team Gajawaja
0 comment
बगाड
Share

मालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच झी मराठीवरील मन झालं बाजिंद या लोकप्रिय मालिकेत सातारा – वाई या भागातील प्रसिद्ध बगाड यात्रा दाखवण्यात येणार आहे. वाई येथील फुलेनगर – शहाबाग येथील अनेक वर्षांची परंपरा असलेले बगाड या मालिकेच्या निमित्ताने सगळ्यांना पाहायला मिळेल.

‘मन झालं बाजींद’कलाकारांनी बावधन सारखेच बगाडं फुलेनगर वाई येथे ही होते हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याचे कार्य अगदी उत्तम रित्या पार पाडले आणि याची प्रचिती प्रेक्षकांना २५ मार्च ते २९ मार्च पर्यंत होईल.

हि मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे आणि प्रेक्षकांनी नुकतंच मालिकेत पाहिलं कि कृष्णाचा जीव वाचवण्यासाठी तिला घटस्फोट द्यायचा हा निर्णय रायाने घेतला. त्याच दरम्यान गावाची बगाड यात्रा जवळ आली आहे रायाला समजते आणि तो ठरवतो की देवीला नवस करायचा आणि बगाड घ्यायचे.

====

हे देखाल वाचा: ‘स्वरलता… तुला दंडवत’ कार्यक्रमातून गानसम्रज्ञी लता मंगेशकर यांना मानवंदना

====

पण ज्या लोकांचा नवस पूर्ण होतो त्यांनाच बगाडाचा मान मिळत असतो. या मुद्द्यावर गावकरी त्याला विरोध करतात पण या विरोधाला न जुमानता तो कौल लावतो आणि यंदाचा बगाड्याचा मान रायभान विधाते याला मिळतो.

याच दरम्यान कृष्णाची जन्मपत्रिका रायला सापडते तो ती गुरुजींना दाखवतो आणि गुरुजी सांगतात की येत्या ७ दिवसात तिचा मृत्यूयोग आहे त्यावर राया त्यांना सांगतो मी माझ्या कृष्णाचा मृत्यू टाळेन आणि तो बगाड्या म्हणून उभा राहतो. रायाची भक्ती वाचवू शकते का कृष्णाचे प्राण हे पाहण्याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे.

बगाड यात्रेच्या विशेष प्रसंगाबद्दल बोलताना राया म्हणजेच अभिनेता वैभव चव्हाण म्हणाला, “आम्ही वाईमधील फुलेनगर-शहाबाग येथे हा प्रसंग चित्रित केला. हा प्रसंग चित्रित करणं सोपं नव्हतं, पण या गावातील रहिवासींनी आम्हाला खूप सहकार्य केलं.

====

हे देखील वाचा: नात्यातल्या गोडव्याची मजेशीर नोकझोक, सारखं काहीतरी होतंय!

====

‘बगाडं’म्हणजे काय आणि त्यासाठी लागणारी मेहनत काय असते? हे सगळं आम्हाला इथल्या स्थानिकांनी सांगितलं. त्यामुळे आम्हाला देखील या परंपरेची ओळख झाली आणि आता प्रेक्षकांना सुद्धा हि बगाड यात्रा पाहायला मिळेल व हे आगामी भाग प्रेक्षकांना खूप आवडतील याची मला खात्री आहे.”

तेव्हा पाहायला विसरू नका मन झालं बाजींद बगाड यात्रा विशेष भाग २५ ते २९ मार्च संध्याकाळी ७ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.